Skip to main content

नलेश पाटील गेले.....

लेखक उदय ४२ यांनी गुरुवार, 08/09/2016 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
मुसळधार गुंत्यातून सोडवून आणलेला माझ्यापाशी आहे एक दोरा पावसाचा... धुक्यातल्या दिवसाचा, आभाळाच्या नवसाचा विणत राहीन म्हणतो, एक शेला झऱ्याचा... घेईल जो अवतार कधी काळी नदीचा आशय ज्याचा असेल कबीराच्या दोह्याचा... - नलेश पाटील कवी नलेश पाटील कालवश झाले. आदरांजली

मोगरा आणि गुलाब

लेखक निखिल निरगुडे यांनी गुरुवार, 08/09/2016 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाहत होत्या. तो तिला जवळ घेऊन समजावत होता. पण ती हट्ट सोडेना. जणू तिला काहीतरी अपेक्षित होतं, ते तिला मिळेना. आणि तिला काय हवंय हे त्याला कळेना. म्हणून त्याने शब्दांच्या सुंदर जाळ्यात तिला अडकवण्याचा प्रयत्न सुरु केला, म्हणजे गोंधळून तिची तीच सावरेल. हुंदके देत ती म्हणाली, "ठीकेय. मला मान्य आहे तुझं प्रेम मानसीवर आहे. पण म्हणून मला तुझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार नाही?" तो शांतपणे हसत होता. त्याचा हसणं तिला बोचत होतं. तो तिचे डोळे पुसत तिला उत्तर देऊ लागला, "श्रावणी, प्रेम आणि मैत्री दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. जसा गुलाब आणि मोगरा.

दुर्गमदुर्गवनदुर्ग किल्ले गुमतारा

लेखक योगेश आलेकरी यांनी बुधवार, 07/09/2016 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गमदुर्गवनदुर्ग किल्ले गुमतारा जुलै मधील एक रविवार, बाहेर मुसळधार पाऊस चालूय, गाडी काढून कुठेतरी नवीन ठिकाणी जाण्याचे वेध लागलेत. साम्याने उत्तर कोकणातील एक मजबूत किल्ला सुचवला , उत्तर कोकणात जायचे तर प्रचंड रहदारीचा सामना व त्यामध्ये पाऊस तर आणखी मंद गतीचा प्रवास. इति- योगेश आलेकरी. पश्चिम-मध्य महाराष्ट्राकडे माझा कल.

स्टार्ट अप्स - व्यवसाय कल्पना मंथन

लेखक निनाद यांनी बुधवार, 07/09/2016 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
सायकल सायकल या समुहावर चर्चा करताना मोबाईल चार्जींग साठी सायकला जोडून काही उपकरण बनवता येईल का अशी चाचपणी चालली होती.विषय हा प्रकल्प कसा करता येईल यावर फिरू लागल्यावर असे वाटले की यामध्ये तर व्यावसायिक शक्यता आहेत. हा सुचलेला प्रकल्प विचार असा आहे: सुमारे २ किंवा ३ सेमी आकाराचे छोटे पंखे हँडप्रेस मशिनवर बनवायचे. त्याला एक चुंबक असलेली मोटार जोडायची. हवे ने पंखा फिरला की विज तयार होईल. करंट आपल्या मोबाईलच्या गरजे नुसार रेग्युलेट करायचा. आणि त्याला एक यु एस बी सॉकेट जोडायचे. हे सगळे एका सिल्ड खोक्यात बसवायचे (पाणी जाऊ नये म्हणून). आता वार्‍याने उर्जा देणारा मोबाईल चार्जर तयार.

लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग २)

लेखक पाटीलभाऊ यांनी बुधवार, 07/09/2016 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग १) आज चौथा दिवस.  सकाळी सकाळी हॉटेलवरून निघतानाच सुंदर दृश्य नजरेस पडले. आज आम्ही कीलॉंग वरून काझा ला जाणार होतो. छतरु, बातल पार करून कुंझुम पास जवळ पोहोचलो. कुंझुम पास हा १५०६० फूट उंचीवर आहे. तो पार करून रस्त्यातच कुंझुम देवीचं मंदिर आहे, तिथे नमस्कार करून देवीचं दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ निवांत पडून राहिलो.

हि(लरी) अमेरिकन दुर्गा आता मागे वळून बघायची नाय.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 07/09/2016 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
"काय रे भाऊ वाजपयीनी इंदिरा गांधीना दुर्गाची उपाधी दिली होती ना?” "अगदी बरोबर.इंदिरा गांधीने,बंगलादेश निर्माण करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते.” “मग तू हिलरीला अमेरिकन दुर्गा असं संबोधून काय सांगयला बघतोयस रे भाऊ?” “अरे,ज्यावेळी एखादी स्त्री आपली मर्दूमकी दाखवून देशाला आपला नैतिक आदेश आणि प्रामाणिकपणाची कृती दाखवण्याच्या प्रयत्नात असते तेव्हा तिला दुर्गा असं संबोधतात.” “पण दुर्ग म्हणजे एखाद्या किल्ल्यासारखी जागा जी संरक्षीत असते आणि दुसरा त्या ठिकाणी पोहचूं शकत नाही.असंच ना रे भाऊ?” "अरे,एव्हडंच नाही तर अशी स्त्री की जी,अरेरावी,मत्सर,पूर्वग्रह,तिरस्कार,क्षोभ,लालसा आणि स्वार्थ अशा ग

न्यू यॉर्क : ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 06/09/2016 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
=============================================================================== न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...               ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर...

हे बुद्धिच्या ईशा

लेखक फुंटी यांनी मंगळवार, 06/09/2016 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
कानही बधीर आणि सहवेदनाही नवसाचा बोगस क्लेम मोदकांच अपचन मंत्रजागराची तीनपत्ती आणि मिरवणूकीत सैराटच्या गाण्यांवर बेधुंद नाचणारा समाज पाहून विकट हसलो तुझ्या दैवत्वावर की माझ्या या बांधवांच्या उन्मादावर समजेनासे झालंय हल्ली सार हे बुद्धीच्या ईशा ,तुझ्या असण्यात तरीही हवहवस वाटत काही उत्सवातली शांतता असेल उज्वल भविष्याची नांदी हे उमजेल तो दीन उगवू दे

प्रेमकविता...विडंबन.

लेखक चिनार यांनी मंगळवार, 06/09/2016 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
एका मित्राचे नुकतेच लग्न ठरले आहे. सध्या प्रेमरसात न्हाऊन निघत असल्यामुळे ट ला ट जुळवून रोज तो एक प्रेमकविता करतो. मला कवितेतलं खूप काही कळतं असा त्याचा समाज असल्यामुळे तो आधी मला पाठवतो मग तिला..आज सकाळी त्याने पाठवलेल्या कवितेचे विडंबन करण्याचा मोह मी टाळू शकलो नाही..