Skip to main content

बोचरी संध्याकाळ

लेखक अश्विनी वैद्य यांनी मंगळवार, 04/10/2016 01:14 या दिवशी प्रकाशित केले.

बोचरी संध्याकाळ

मुंबई हून निघताना विमानाची चाकं take off च्या वेळी जेव्हा जमीन सोडतात ना, तो एक क्षण श्राव्याला नेहमी अस्वस्थ करतो. त्या क्षणी एक हुरहूर उगाच दाटून येते. "सगळं घेतलंस ना गं नीट…काही विसरू नकोस बाई… तू येणार म्हणून तुझ्यासाठी महिनाभर आधी पासूनच लक्षात येतील तशा गोष्टी घेवून ठेवत होते गं…तू आल्यावर मग खूप धावपळ होते ना, वेळ पण नाही पुरत…तिकडे मिळतंच म्हणा हल्ली सगळं, तरी उगाच आपलं माझं समाधान गं…" श्राव्याच्या आईची अशी सगळी मायेची वाक्यं take off च्या त्या क्षणी तिच्या कानांत तिला परत परत ऐकू येत होती.

मिपाराज्य, ठाणे येथे गांधी जयंतीनिमित्त बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या मंत्रिमंडळ सभासदांचा वृत्तांत लिहिणेबाबत.

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 03/10/2016 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा शासन आहार, आरोग्य आणि मनोरंजन विभाग ठाणे उपविभाग ठाणे बैठक ठिकाण - हॉटेल अँब्रोसिया, ओवळे गाव, घोडबंदर रोड ठाणे दि . ०२ ऑक्टोबर २०१६ वेळ सायंकाळी ७ वाजता वाचा :- दि . ३०/०९/२०१६ रोजीची आमंत्रणपत्रिका http://www.misalpav.com/node/37535 प्रस्तावना :- सन २०१६-१७ या वर्षांमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या मिपाचे आहार तसेच उद्योगमंत्री श्री प्रभाकरराव पेठकर यांच्या झंझावाती ठाणे दौऱ्याच्या निमित्ताने दि २ ऑक्टोबर २०१६ रोजी म्हणजेच गांधी जयंतीनिमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

झड श्रावणाची

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 03/10/2016 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
झड श्रावणाची अचानक श्रावणाची झड ती आली अंग अंग भिजवून गेली ओल्या केसातून बट ही ओघळली चिटकून बसली गोऱ्या गाली मोहक हालचाल सुखावून गेली नकळत डोळे विस्फारून गेली कवेत घेता काया ही थरथरली चित्तवृत्ती मोहरून गेली त्रेधातिरपीट उडवून गेली यौवनास माझ्या खिजवून गेली जेव्हा जेव्हा आठवते रात्र ती ओली श्रावणात होते पापणी ही ओली राजेंद्र देवी

!! सैनिक मरतो देश राहतो !!

लेखक कवि मानव यांनी सोमवार, 03/10/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
दोन राष्ट्रांच्या वादामध्ये, निष्पाप बिचारा अपराधी ठरतो, आणि उगाच कारण नसतानाही, सैनिक का सीमेवर मारतो ? !!१!! त्यास न ठाऊक कारण युद्धाचे, पालन करी तो आदेशांचे, तरी बुद्धिबळाच्या खेळा मधला, सहज मरणारा तो प्यादा ठरतो !!२!! डॊकावूनी पहा त्या गणवेशातून, आपल्या सम तो ही माणूस असतो, सौख्य-सोयरे मागे टाकून, कुणास ठाऊक तो कसे राहतो !!३!! लढत मरावे, मरत लढावे, ध्यास घेउनी जीवनभर जगतो, अन तारुण्याच्या उंबरटयावर, अकारण मृत्युच्या शैयेवर चढतो !!४!! युद्ध खरेतर राज्यकर्त्यांचे, तो तर केवळ साधन ठरतो, वाढे यादी हुतात्म्यांची कदाचीत, एक घर मात्र - मुलगा, नवरा वा बाप गमवतो !!५!!

नो...आय डोंट..!!

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी सोमवार, 03/10/2016 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारची वेळ. नेहा काहीबाही करत त्या डेस्कवरच्या कॉम्प्युटरमधे आपलं डोक खुपसुन बसली होती. चेहर्‍यावर कामचं टेन्शन ओळखता येत होतं. कपाळावरच्या आठ्या व्यवस्थित दिसत होत्या. एका निवांत क्षणी चेहर्‍यावर आलेली बट सावरत, डोळ्यांवरचा चश्मा वर डोक्यावर ठेवत आपल्या रोलिंग चेअरवर मागं रेंगाळत जरा कुठे आराम करायच्या तयारीत असतानाच डेस्कवरच हाताशेजारी ठेवलेला॑ तिचा मोबाईल वाजला. अगदी त्रासिक चेहर्‍यानं तिनं मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिलं. कॉल आईचा होता. "हॅलो..." नेहा. "हां हॅलो, अगं नेहा ऑफिसमधेच आहेस ना? बिझी नाही ना आहेस?

बहुचर्चित "सैराट"

लेखक १००मित्र यांनी सोमवार, 03/10/2016 09:54 या दिवशी प्रकाशित केले.

बहुचर्चित "सैराट"

बहुचर्चित "सैराट" काल बघितला. इतका उशीरा का ? असं काहींच्या मनात आलं सुद्धा असेल, खास करून , माझे काही मित्र मैत्रिणी , ज्यांना हा सिनेमा खूपच भिडलाय. असो. खरं म्हणजे कुठलाही सिनेमा ...अगदी सुपरेस्ट हिट ही का असेना , मला लग्गेच थेटरात जाऊन पहावा असा उत्साह बिलकुल नव्हता, अजूनही नाही. घरात , रविवारी वगैरे , तो पण सैराट किंवा गेल्या रविवारचा मुं-पुणे-मुंबई :२ वगैरे अगदी गाजलेले चित्रपट असतील तर मात्र घरात , हाफ चड्डी घालून , ऐस पैस बसून मला पाहायला आवडतात. मध्ये मध्ये चहा - खाणं चालूच. जाहिराती ? नो प्रोब्लेम man !