Skip to main content

अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 18/10/2016 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते.

अपहार...

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 18/10/2016 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
अपहार... तीर तुझा घुसला आरपार घाल तूच फुंकर हळुवारं झाले असतील घायाळ बहू मीच झालो तुझी शिकार झंकारल्या तारा हृदयिच्या सांग कसा देऊ नकार भ्रष्ट या दुनियेत झाला माझ्या हृदयिचा अपहार राजेंद्र देवी

इंग्लंड भटकंती भाग ५ - पूल

लेखक अभिजीत अवलिया यांनी मंगळवार, 18/10/2016 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागाची लिंक इंग्लंड भटकंती भाग 4 - लंडन लंडनपासून अंदाजे १९० की.मी दूर डोर्सेट कौंटीमधे असलेले अंदाजे दीड लाख लोकसंख्येचे एक छोटेसे शहर 'पूल'. इंग्लंड म्हटले की लंडन, मँचेस्टर, लिव्हरपूल अशी प्रसिद्ध शहरे लगेच आठवतात. त्यामुळे पूल सारख्या तितक्याश्या माहीत नसलेल्या ठिकाणी कंपनीने ऑफिस का काढले असावे हा प्रश्न इकडे जाण्याअगोदर डोक्यात होता. पण इथून परत जाताना मात्र इथे ऑफिस काढल्याबद्दल आभारच मानले. ह्या शहराला एक ऐतिहासिक महत्व आहे.

तरी मैत्रीण का आवडे मला ती?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 18/10/2016 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
* चेह~यावर रेशमी बटा रुळती का इतकी सुंदर दिसते ती? * नवनवे फोटो अपलोड करते ती प्रत्यक्षात कितीे मोहक असेल ती * धवल गुलाबी साडी नेसती ती जणू गुलाबास पाकळ्यांत लपेटती ती * च्याटिंग चा प्रयत्न जरी केला मी तरी सारखी बिझी का असते ती? * कधी ड्रेस,कधी जिनटॉप वापरे ती पण साडीत अती सुंदर दिसते ती * किती गोड कविता लिहिते ती, त्यात दुखा:चे रंग का भरते ती? * भेटलो नाही कधी तिला मी तरी ओळखीची का वाटते ती ? * नाही जरी दोन शब्द बोललो मी अनामिक ओढ का लावते ती?

परीकथा - भाग बारा - फेसबूक स्टेटस २.५ - २.७ वर्षे

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 18/10/2016 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
५ सप्टेंबर २०१६ पॉडर लगाना कोई बच्चोंका खेल नही है ! आंघोळ घालण्याचे काम बाथरूमपर्यंतच माझ्या हद्दीत येते. पण आज सारे गणपतीच्या नैवेद्याच्या तयारीत व्यस्त असल्याने अंग पुसून पावडर लावायचे कामही माझ्याकडेच लागले. टॉवेल खेचत अंग तिने स्वत:च पुसून घेतले, त्यामुळे हे एक त्रासदायक काम वाचले. अन्यथा तिच्या इच्छेविरुद्ध अंग पुसणे एक दिव्य असते. त्यानंतर पावडर कशी, कुठे, आणि किती लावायची याच्या सूचना मी तिच्या मम्मीकडून घेईस्तोवर ईथे ही पावडरचा डब्बा घेऊन सुरूही झाली होती. मानेला पावडर स्वत:च लावून झाली होती.

चिव काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 17/10/2016 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक होती चिवताई इटुकली-पिटुकली. चिव-चिव करत आंगणात यायची, चिवताई ये दाणा खा, पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. आजी! चिवताई खरंच असते का? कशी दिसते? हुशार ग माझी सोनुटली, तुझ्या बाबांना सांगते, चिवताईचा फोटू आणायला.... एक होता काऊ, काळाकुट्ट, मोठे मोठे पंख, नेहमी चिवताईला त्रास द्यायचा. हा! हा! हा!, आजी किती ग!खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते व्हाईट-व्हाईट, लांग-लांग टेल, मोठी-मोठी शिंग. बाबा म्हणतात, काऊचे दूध हेल्दी-हेल्दी, गोडंगोड. बाबा माझ्या साठी काऊचे दूधच आणतात. आजी ग, खोट्ट बोलणार्याला गाॅड, पनीशमेंट देतो. एक विचारू आजी, गाॅडने तुझे दात तोडले का?

मक्केतील उठाव ५

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 17/10/2016 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचा भाग ४ उलेमा मंडळींनी सौदी सरकारला प्रतिहल्ला करायची परवानगी दिली खरी पण त्याकरता कुराणामधील एका परिच्छेदाचा संदर्भ त्यांनी वापरला त्यात असे म्हटले होते की "त्या पवित्र मशिदीत लढाई करू नका जोवर ते तुमच्याशी लढत नाहीत, पण त्यांनी सुरवात केली तर मात्र तुम्ही त्यांना सोडू नका, अश्रद्ध लोकांना असेच शासन मिळते." आता इथे असे सुचवले आहे की मशिदीत उपस्थित अतिरेकी हे अश्रद्ध असले पाहिजेत. आता ह्या अतिरेकी लोकांना अश्रद्ध, धर्मभ्रष्ट ठरवणे हे मोठेच आव्हान होते. कारण त्यांचे अतिरेकी धार्मिकपण सगळ्यांना व्यवस्थित माहीत होते.

मुलगी आता इकड़चि झालेली आहे

लेखक वैभव.पुणे यांनी सोमवार, 17/10/2016 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
मुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच! लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम! नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल! नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण!

दिसत जावं माणसानं

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 17/10/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मोबाईल आणि सोशल मिडियामुळे भेटीगाठी अधिकच दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. याच विषयावर एका मित्राने आज एक सुंदर हिंदी कविता पाठवली आणि विषय जिव्हाळ्याचा असल्यानं चटकन मराठी रुपांतर/भाषांतर सुचलं. आधी मराठी आवृत्ती आणि मग त्याची मूळ हिंदी कविता असं देतो आहे. हिंदी कवी कोण ते मात्र समजू शकलं नाही.