सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ३)
सुम्याच्या लहानपणातल्या प्रेमासंबंधाच्या सतावणार्या त्या आठवणी
सुम्या,तिची मुलगी आणि नवरा घाईगर्दीने कोकणात गेली होती कारण,सुम्याची आई बरीच आजारी होती.एक महिना तीं कोकणात राहिली.आईला मुंबईला आणून चांगल्या डॉक्टरला दाखवायचं असा त्यांचा विचार होता.पण हा विचार ऐकून आई खूप नाउमेद झाली.आणि दोन दिवसातच तिचा अंत झाला. सुम्याला आता बेत बदलावा लागला.म्हातार्या वडीलाना आपल्याबरोबर मुंबईला घेऊन जाण्याचा विचार त्यांनी केला.आणि त्याप्रमाणे कोकणातलं घर बंद करून वडीलांना घेऊन मुंचईला आले.
मिसळपाव