मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

केसरिया बालमा

चुकलामाकला · · लेखमाला
केसरिया बालमा p3 हळूच खुणवे  लिहिता लिहिता कोपर्‍यातला  हिरवा ठिपका  दोन दिशांना दोघे आपण नव्हती ओळख  नव्हते नाते ऑर्कुटवरुनी संवादाचे  इथेच रुजले हिरवे पाते  व्हर्च्युअल जरी भांडण अपुले किती अबोले  लटके रुसवे पण केसरिया तो  हिरवा होता  अंतर सारे  क्षणात मिटवे   रंग बदलला जगण्याचा मग, फूलपाखरू झालो आपण, नवीन क्षितिजे नवीन नाती नवरंगातच न्हालो आपण ..... ..... ..... अजूनही सय  दाटून येता लॅपटॉप मी  उघडून बसतो केशर हिरवे  होण्याची मी पुन्हा नव्याने वाट पहातो  

वाचने 9789 वाचनखूण प्रतिक्रिया 11

पैसा Mon, 10/31/2016 - 16:49
चॅट विंडोतला केसरिया हिरवा झाला! :) कविता आवडलीच!