अंबरनाथ ते कल्याण-माझा पहिला लोकल प्रवास
(रेस-पार्ट-टू)
‘तिकिट...’
‘दादा जवळ मागच्या डब्यांत आहे...’
‘फर्स्टक्लास चं आहे कां...?’
‘सॉरी, मी मध्यप्रदेशातून आलोय, मला माहीत नव्हतं की लोकल मधे देखील फर्स्टक्लास असतो...’
‘पकडलं गेल्यावर लोक असंच काहीतरी सांगतात...’
-------------
वराती सोबत पुण्याहून परतलो...त्या लग्नाची पार्टी रात्री साडे बारा ला संपली. घरी येऊन झोपलो तर दीड वाजला होता. सकाळी नवरया मुलाच्या मोठ्या भावाने मला उठवलं, म्हणाला-‘चल, राम काकांना स्टेशनपर्यंत सोडून येऊं. तू साइकिलीवर त्यांची सूटकेस ठेवून घे.’
मी तसाच पैंट-शर्ट घालून निघालो. पर्स बैग मधेच राहून गेली (त्यांत रेलवेचा फ्री पास होता).
मिसळपाव