गट्टे के चावल : खास मारवाडी पेशकश
अस्मादिकांचे सासर मारवाड प्रांत राजस्थान येथे असून जातिवंत खवय्ये लोकांचा हा भाग आम्हाला साहजिकच एकदम आवडतो, त्यात जावईबुआ (स्थानिक भाषेत पावणेसा) म्हणजे आम्ही जरा जास्त स्पेशल असतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर नाश्त्याला प्याज कचौरी अन काजूकतली असले मजबूत आयटम ते डिनरला खास मारवाडी गट्टे के चावल अन कढी हे प्रकार व्हाया लंच मध्ये तुपात पोहणारी दलाबाटी-चुरमा, बिकानेरी भुजिया सब्जी, पापड सब्जी असे सगळे असते. मारवाडी + जैन संस्कृती त्यातही १२ महिने कांदा लसूण न खाणारे बहुसंख्य लोक आजूबाजूला असणे ह्यामुळे मारवाडी जेवणात कांदा लसूण अजिबातच नसतो किंवा फार कमी असतो.
(पडुन आहे नोट अजुनी)
पडुन आहे नोट अजुनी, राजसा थकलास का रे?
एवढ्यातच रांग सोडुन, तू असा बसलास का रे?
अजुनही सरल्या न गड्ड्या, त्या हजारापाचशेंच्या
अजुन बँका सरल्या कुठे रे, हाय तू हरलास का रे?
सांग, नोटा शोधणाऱ्या पंटरांना काय सांगू?
उगवले एजंट सारे, आणि तू निजलास का रे?
बघ तुला दिसतील नंतर मॉरिशसच्या चोरवाटा
गोरगरिबांच्या अकाउंटांस वापरलास का रे?
उसळती खोक्यांत साऱ्या पाचशेच्या बंद नोटा
आयटीच्या रेडला तू आज घाबरलास का रे?
- स्वामी संकेतानंद
काव्यरस
मनाच्या खिशात...
समर्थकांच्या देशात
सर्वत्र मंगल वातावरण आहे,
प्रत्येक माणूस अतिशय आनंदात आहे,
देशप्रेमाची लाट आहे,
विजयाचा जयघोष आहे!
विरोधकांच्या देशात लुटालूट, दंगे,
अराजक माजलय, लोक मरत आहेत,
पोरं उपाशी, रुग्ण रस्त्यावर आहेत,
सर्वत्र फक्त आक्रोश आहे!
आपण आपलं चाचपून बघावं,
खिशात किती कॅश आहे,
मनात किती संतोष आहे,
किती असंतोष आहे!
काव्यरस
ये तू मैदानात : शेतकरी गीत
ये तू मैदानात : शेतकरी गीत
ये तू मैदानात, ये तू मैदानात
ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात
काळ्या आईचा एल्गार
बिगूल फुंकण्या हो तय्यार
उलवून फेकू गुलाम बेड्या
जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||
गोरे गेले, काळे आले
शस्त्राचे रंगांतर झाले
काळी आई खितपत पडली
विझल्या अंधारात
विझल्या अंधारात, विझल्या अंधारात
विझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, ये तू मैदानात
ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात
काळ्या आईचा एल्गार
बिगूल फुंकण्या हो तय्यार
उलवून फेकू गुलाम बेड्या
जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||
गोरे गेले, काळे आले
शस्त्राचे रंगांतर झाले
काळी आई खितपत पडली
विझल्या अंधारात
विझल्या अंधारात, विझल्या अंधारात
विझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात
काव्यरस
एक पत्र "पप्पा"साठी
प्रिय पप्पा,
मुळात आधी एकाच घरात राहत असताना पत्र लिहिलचं का?हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.6 नोव्हेंबरला माझा वाढदिवस झाला. पण तेव्हा तुम्हाला सांगितलच नाही की तुम्ही बनवलेली बिर्याणी मस्त झाली होती.
दुसर्याच दिवशी अंकिताने message केला की "कऊ तुझे पप्पा किती भारी आहेत ग,अस वाटलचं नाही की त्यांना आम्ही पहिल्यांदाच भेटलो."
माझ्या वाढदिवसाला तुम्ही खूप काही केलं.पण आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही तो साजरा नाही करणार हे माहित आहे.त्यापेक्षा गणपतीच्या मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घ्यायला तुम्हाला आवडत पण पप्पा मला हे माहिती आहे की तुम्ही स्वतः साठी काही मागत नाही.
हिलरी क्लिन्टन जिंकली असती तर..... मी हे असं लिहीलं असतं!
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे अमेरिकेकडे
अखेर अमेरिकेची दुर्गा-हिलरी(आज्जी), अमेरिकेची ४५ वी आणि पहिली स्त्री प्रेसिडेंट झाली.
ही बातमी ऐकून बहुतांश जगाला आणि विशेषकरून अखील जगातल्या बहुतांश स्त्रीवर्गाला आनंद झाला असेल नाही का रे भाऊ?
तुला खरंच असं वाटतं? पण ते जाऊदे.कोकणीत एक म्हण आसां. "झंय गाव आसां थंय म्हारवड असतलोच."
हिलरी खरीच जीद्दीची स्त्री आहे असं तुला वाटतं कारे भाऊ?
म्हणूनच मी तिला दूर्गा म्हणतो ना रे?
जसा आपला चितळे तसा टेनसीचा जॅक डॅनियल्स !
तसे अल्कोहोल आणि माझे तसे जुने नाते आहे. पिण्याच्या निमिताने किंवा अभ्यासाच्या निमित्ताने हे केमिकल माझ्या आयुष्यात येतच गेले. थर्ड इअरला असताना distillary डिझाईनचे फक्त प्रश्न सोडवून मी plant technology चा पेपर सोडवला होता.
जेडीला तर मी पुण्यात ओळखतच नव्हतो, आपले मित्र सुरवातीचे मित्र म्हणजे white mischief आणि ओल्ड मोन्क (हा मित्र अजून टिकून आहे.)!
पत्थर
जवळ जवळ अडीच तास मी त्या बसस्टँडवर उभा होतो. कोणतीही बस आली की पळत जाऊन बोर्ड वाचणे हे माझे कामच होऊन बसले. अतिशय अवजड अशी सुटकेस मी एका बाकड्याच्या शेजारी ठेऊन दिली होती. तीही कोणीतरी उचलून चोरुन घेऊन जाईल म्हणून मी मोकळ्या पटांगणातून तिच्यावर नजर ठेऊन होतो. कोल्हापूरला जायच्या सतरा बस येऊन गेल्या. एकाही बसमध्ये नीट उभा राहायलाही जागा नव्हती. वरच्या दांडक्याला धरुन अडिचशे तीनशे किलोमीटरचा प्रवास एका पायावर उभा राहून करायच्या विचारानेच कडमडायला झाले होते. आता इथे दिवसरात्र बसून राहिले तरी हाती काय फारसे लागणार नव्हते.
सरळ सुटकेस उचलली आणि हायवेवर आलो.
ग्रंथ परिचय - ग्रामगीता भाग 2
भाग 2 पुढे चालू...
विविध पंचक योजनाकरून गीतेचे विषयानुरूप आठ विभाग पाडले आहेत, ते असे -
पहिल्या सद्धर्म पंचकात देव, धर्म, आश्रम, संसार-परमार्थ आणि वर्णव्यवस्था यावर भाष्य आहे.
दुसऱ्या लोक वशीकरण पंचकात संसर्ग-प्रभाव, आचार-प्राबल्य, प्रचार-महिमा, सेवा सामर्थ्य, आणि संघटना-शक्ती याचा विचार केला आहे.
तिसऱ्या ग्रामनिर्माण पंचक
मिसळपाव