Skip to main content

कडव्या मोदींचा बलुचिस्तानात हस्तक्षेप नको

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 27/11/2016 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
कडव्या मोदींचा बलुचिस्तानात हस्तक्षेप नको! (हा ले़ख नुकताच ईसकाळच्या पैलतीर या सदरात प्रकाशित झाला आहे) (वाचकांना एक खास विनंती! हा लेख लिहिलेले लेखक माझ्या ई-मेलद्वारा परिचयाचे झाले आहेत. सध्या ते वॉशिंग्टन येथे काम करतात. "बलोच हाल' या वृत्तपत्राचे ते मुख्य संपादकही आहेत. एके काळी ते ज्या पोटतिडिकेने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यावर लिहीत; ती पोटतिडीक काहीशी कमी झाली आहे, असे हा लेख वाचून मला वाटते. या लेखातील बरेच मुद्दे मला न पटणारे आहेत व ते वाचून मला आश्‍चर्यही वाटले.

अरण्यानुभव

लेखक रुस्तुम यांनी शनिवार, 26/11/2016 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मित्राचा मेसेज आला की मे महिन्यात ते व्याघ्रगणती साठी नागझिरा अभयारण्यात जात आहेत आणि मी थोडा अस्वस्थ झालो. ओमान मध्ये आल्यापासून मी एक गोष्ट फार मिस करतोय ती म्हणजे भ्रमंती. भारतात असताना दर २-३ महिन्यातून कुठे न कुठे जाणे व्हायचेच,मित्रांबरोबर म्हणा, कुटुंबासमवेत म्हणा. पण इथे त्या गोष्टीना आळा बसलाय.एक तर फिरण्यासारखं फार नाही आणि दुसरं म्हणजे स्वतःच वाहन नाही अजूनपर्यंत तरी. असो.तर तो मेसेज वाचून फक्त पुढच्या वर्षी आपण परत जाऊ रे असं म्हणून समाधान करून घेण्याविषयी पर्याय नव्हता.

गुप्तधनाचे रहस्य

लेखक jp_pankaj यांनी शनिवार, 26/11/2016 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
"आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ...हॅ हॅ हॅ..आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ हॅ.हॅ..हॅ.. " "गपये.." "आंऊऊऊऊऊऊऊऊ...हँ..हँ..हँ... " आत गप्तो का ?. उगाच ओरडायला जनावरासारखा." पल्लवीने समोरील पटावरील एक प्याद उचलुन हातात पकडल्,पुढली चाल करायच्या आधी पार्थ कडे एक नजर टाकली. "ताई ते तर आहेच जनावर्, डुकरासारखा लोळतय मगापासुन आणी आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊ.....

तू फक्त.....

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 26/11/2016 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
तू फक्त चल म्हण मी कधीची तयार आहे बेगडी समाजाच्या बेड्या तोडायला आतुर आहे तू फक्त बोल म्हण मी सांगायला तयार आहे न उल्लेखलेल्या घटनांची आज फुटणार माळ आहे तू फक्त हो म्हण सगळं मी निभावणार आहे संगत-सोबत असेल तुझी तर समाजाला अंगावर घेणार आहे तू फक्त.... फक्त.... आहे मी म्हण....... म्हण मात्र ... जोवर अंगात प्राण आहे... कलेवरा जवळ बसून राडण्यापेक्षा जोवर तू अन् मी आहे तोवर 'जहां हें'
काव्यरस

मनाचा एकांत - सरोवरातील नाव

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 26/11/2016 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे. सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या, त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)] पहाडातला जख्ख दद्दू सरोवरात नाव सोडून पलीकडे निघून गेला तेव्हापासून, नाव हलत नाही, डुलत नाही, पण जराशीही कुजत नाही! सरोवरात कुणाला येऊ देत नाही, सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही! सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर.... भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी, . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! शिवकन्या

मायग्रेन साठी सहज सोपी योगासने

लेखक जयन्त बा शिम्पि यांनी शनिवार, 26/11/2016 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
सहज सोपी योगासने मूळात योगासने ही संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी उत्तम असतातच, पण काही विशिष्ट आजारांसाठी, काही ठराविक आसने थोडा अधिक काळ केल्यास, त्यांचा त्या व्याधीपासून आराम मिळण्यासाठी फायदा होतो. अशा काही आसनांची येथे माहिती दिली आहे. डोकेदुखी व मायग्रेन मनावर येत असलेला वा घेत असलेला प्रमाणाबाहेरचा ताण, तणाव यातून डोकेदुखी उद्भवते. नियमित वेळेवर जेवण न घेणे, पुरेशी झोप न होणे, शरीराला पुरेशी विश्रांती न मिळणे, ही सुद्धा कारणे आहेत. डोकेदुखी जास्त व वारंवार होत असली तर मायग्रेनचा त्रास सुरु होतो.

२६-११शतशब्दकथा

लेखक शब्दानुज यांनी शनिवार, 26/11/2016 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजचाच दुर्देवी दिवस होता तो.. मी आणि माझी लाडकी लेक इथेच या स्टेशनच्या बाकावर बसलो होतो , आणि अचानक आम्हाला गोळ्यांचा आवाज एकू येऊ लागला. काही कळण्याच्या आधिच एक गोळी छकूलिच्या आरपार निघून गेली. क्षणार्धात माझ्या छकूलिला मी गमावलं होतं दहा मिनिटात प्रतिहल्ला करणा-यासाठी पोलिसांची एक टिम आलेली होती. थोड्याच वेळात त्यातल्या इनस्पेक्टरलाही गोळी लागली. बदला घेण्यासाठी मी पळत जाऊन त्याची पिस्तुल उचलली आणि त्या नराधमाकडे रोखली. र्िटगर दाबताच गोळीचा जोरदार आवाज कानी घुमला. पण..पण ती गोळी माझ्याकडुन सुटलेलीच नव्हती.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ८)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 26/11/2016 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या काळजी वाटण्याच्या आठवणी फोनवर म्हटल्याप्रमाणे सुम्याची मुलगी थोड्या दिवसासाठी कोकणात आली होती.तिचा मुलगा आता कॉलेजात जात असल्याने तो आपल्या आपण स्वतंत्रपणे रहात होता.नवर्‍याला आणि मुलाला तिने सांगीतलं की,मी आईकडे असे पर्यंत तुम्ही दोघं संभाळून रहा. इकडे कोकणात आल्यावर आईची प्रकृती पाहून तिची मुलगी खूपच अचंबीत झाली.आपली आई जास्त दिवस काढणार नाही असं तिला वाटूं लागलं.एकदा तिच्याशी सवित्सर बोलून तिला विचारावं की तू आणि गुरूकाका मुंबईला माझ्याबरोबर यायला तयार अहात का?माझ्या डोळ्यासमोर तुम्ही रहाल आणि मलाही माझी कामं करता येतील.नाहीतर तुमची काळजी करून माझं लक्ष कामापासून सतत विचलीत ह