Skip to main content

एका लग्नाची ऐकीव गोष्ट.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 09/01/2017 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
(गद्य,पद्य वेचे.) तू मला पहायला आला होतास सफेद प्यॅन्ट अन सफेद फुल शर्ट काळा सावळा असलास तरी दिसलास स्मार्ट तू नेसली होतीस अंजरी साडी ब्लाऊझवर होती नक्षी वाकडी तिकडी गोरीपान होतीस अन दिसलीस फाकडी मी कांदेपोहे घेऊन आले होते तू मान खाली करून बसला होतास दोन चमचे खाल्यावर वर बघून हसलास उजव्या गालावरच्या खळीमुळे मोहक दि़सलास जाताना मी गेलो पोपटाच्या पिंजर्‍या जवळ तुच पोपटाला विचारत होतीस कोण रे तो? पोपट मला म्हणाला चोर चोर ते ऐकून तू जोरात हसलीस मी मनात म्हणाले होते माझं हृदय चोरणारा तूच तो चोर तुझा चेहरा पाहून माझ्या हसण्यावर माझा मीच घातला चटकन आवर मी रागावलो नसतो अजीबात तुझ्यावर का नाही
काव्यरस

बर्फाळलेले आईसलँड भाग १ – तोंडओळख

लेखक विहंग३००७ यांनी रविवार, 08/01/2017 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
आईसलँड म्हटले की डोळ्यासमोर येतो बर्फाने भरलेला वस्तीर्ण, वैराण प्रदेश. कधीतरी Man Vs Wild या कार्यक्रमात इथल्या रौद्र निसर्गाची ओळख झालेली असते. जगातल्या कोणत्याही भागाचे तसेही अतिरंजित चित्रीकरण करणारा हा कार्यक्रम तर आईसलँडसारख्या देशाला निसर्गाच्या रौद्रतेची कमाल मर्यादा असे घोषितच करून टाकतो. एरवी जगातल्या विविध घडामोडींत कुठे नावही न दिसणारा हा देश अचानक एखाद्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अर्ध्या जगातली विमानवाहतूक उद्ध्वस्त करून टाकतो आणि बरेच दिवस ठळक बातमी बनून राहतो. अशा प्रकारे माध्यमांतून ओळख झालेला हा देश प्रत्यक्षात कसा असेल याबद्दल कमालीची उत्सुकता मनात होती.

दस दस की मॅच - उत्तरार्ध - कथा ( काल्पनीक )

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 08/01/2017 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
दस दस की मॅच - उत्तरार्ध - कथा ( काल्पनीक ) पहिल्या भागाची लिंक - सुरुवातीला मैदानातच पडलेला एक छोटा दगड घेउन ओली सुकी झाली . ती गबन्याच्या टिमने जिंकली . "आम्ही बॅटिंग करणार ..." सगळी एका सुरात ओरडली . त्यांच्या टीममधली पहिली दोघे फळकुटं फिरवत बॅटिंगला आली. गबन्या आणी बाकीची मंडळी बाजुच्याच एका कट्ट्यावर बुड टेकवुन बसली . आपला नंबर येईपर्यंत तिथे बसुन दुस-या टिमला नावं ठेवायची आणी आपल्या टिमला चीअर करायचं हा उद्योग सुरु झाला .

पैसा झाला खोटा…

लेखक इरसाल कार्टं यांनी रविवार, 08/01/2017 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
पैसा झाला खोटा… मागच्या दोन महिन्यांपासून भारतभर नोटबंदीचा विषय ट्रेंडींग आहे, जवळ असलेले पैसे असे रातोरात गेलाबाजार झाले. कोणीही ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारेनसे झाले. पण मागच्या दोन वर्षाच्या काळात कामानिमित्त भारतभर(खासकरून उत्तर भारत) फिरताना मला नोटबंदी नसतानाही असले अनुभव आले होते, त्यातील काही… लखनऊ ला जात होतो, रेल्वेने. हि माझी दुसरी फेरी होती लखनऊ ला. सगळं व्यवस्थित पॅक केले आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन निघालो. रेल्वेने प्रवास करायचा म्हणजे मी जवळ कमीत कमी रोकड बाळगत असे. ए.टी.एम. आता बर्यापैकी स्टेशन्स वर उपलब्ध असल्यामुळे डेबिट कार्ड वापरणे मी सोयीस्कर मनात होतो.

इ-नामकरण विधीनंतर माझा मिपा शिशुशाळा प्रवेश

लेखक लीना कनाटा यांनी रविवार, 08/01/2017 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
इ-नामकरण विधीनंतर माझा मिपा शिशुशाळा प्रवेश बरेच वर्ष मिपावर वाचन मात्र राहिल्यानंतर विचार केला नुसतेच निष्क्रिय मनोरंजन (पॅसिव्ह एंटरटेनमेंट) काय कामाचे, थोडेसे सक्रिय मनोरंजन (ऍक्टिव्ह एंटरटेनमेंट) करूयात. मग मिपाचे सदस्यत्व घेतले. तत्पूर्वी आंतर जालीय स्व नव नामकरणासंबंधी चिंतन मनन चालू होते. पूर्वी शिक्षण घेताना ऍपल शास्त्रींनी प्रत्येक कृतीला इक्वल अँड अपोझिट वि-कृती असते (म्हणजे विरुद्ध-कृती बर्रर्र का) असे काहीसे सांगितल्याचे आठवत होते. तसेच या विश्वा सारखे प्रति विश्व कि काय असते, मटेरियल आणि अँटी मटेरियल ( अँटी, अँटी मटेरियल, आंटी-मटेरियल कोण म्हणतोय तो?

आणि आपण सगळेच

लेखक चंद्रकांत यांनी शनिवार, 07/01/2017 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
समाजाचं वास्तव झपाट्याने बदलत आहे. काही बदल टाळता येत नाहीत, हे मान्य. ते राजकीय असोत की आर्थिक, सांस्कृतिक; त्यांना मर्यादांची सीमा असावीच लागते. माणसाचे बंधमुक्त जगणे सीमित अर्थाने आवश्यकच; पण सर्वबाजूंनी बंदिस्त जगणं कसे समर्थनीय असेल? जागतिकीकरण, संगणक, मोबाईल, माहितीचे मायाजाल जगाच्या सीमा आणखी लहान करीत आहे; पण त्यामुळे संवादाचे सेतू उभे राहण्याऐवजी संकुचितपणाच्या भक्कम भिंती बांधल्या जातायेत. आत्मकेंद्रित अभिमान वाढतो आहे. येथेही समान विचारांचे अनुसरण करणाऱ्यांचे कळप तयार होतात. ते दुसऱ्या कळपाच्या भूमिकांना तपासून पाहतात, नाहीतर नाकारतात. आणि दुसरे पहिल्यांच्या भूमिका झिडकारतात. यात मजा अशी की, यातल्या प्रत्येकाला आपणच समाजशील, प्रयोगशील, प्रगत वगैरे असल्याचे प्रत्यंतर येत असते. विज्ञानतंत्रज्ञानाने माणसांना समानस्तरावर आणून उभे केले आहे. विज्ञानतंत्रज्ञानात कोणताही आपपर भाव नसतो. पण वापरणाऱ्यांच्या विचारांमध्ये तो नसेल कशावरून? बऱ्याचदा अभिनिवेशाने वागणारे एकतर समर्थनाच्या तुताऱ्या फुंकतात किंवा विरोधाचे नगारे बडवत असतात. माध्यमांमध्ये सहज संचार करणे सर्वांसाठी सुलभ असले, तरी समाजात सगळ्यांचा वकुब तेवढा असतो का? नाहीच, कारण अद्यापही ज्या समाजाची रचना विषमतामूलक पायावर उभी असेल, तेथे समानता स्थापित करणे सहज, सुगम कधीच नसते. म्हणूनच समाजात समानता किती आली आहे, या प्रश्नाचं उत्तर सहज हाती लागणं अवघड असतं.

स्ट्रॅटेजी

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 07/01/2017 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
आठ - दहा दिवसांपूर्वी व्हाट्सॲपवर आंतरसोसायटी हापपिच क्रिकेट स्पर्धेच आवतान आल. आणि गेलं नाही तर आपल्या सोसायटीची काय इज्जत राहिल? हा प्रश्न प्रत्येक सोसायटीच्या क्रीडाप्रेमी, हौशी क्रीडापटू इ. लोकांना पडला. आणि बघता बघता स्ट्रॅटेजीजना सुरुवात झाली. आमच्या सोसायटीचे हौशी क्रीडापटू कसे मागे राहतील? फक्त क्रिकेटचेच खेळाडू संघात निवडायचे या महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीपासून आम्ही सुरूवात केली. त्याचं शेवटच्या दिवसापर्यंत काय झालं विचारू नका! शेवटी मॅचच्या दिवशी कॅरम किंवा बुद्धिबळ खेळायला आलं तरी चालतंय ओ, तो पण खेळाडूच असतोय की!

प्रीत भेटेल का गं...

लेखक सुर्यान्श यांनी शनिवार, 07/01/2017 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
हरवलेले गीत भेटेल का गं प्रथम नेत्रीची प्रीत भेटेल का गं बघ भावनांचा कल्लोळ झाला आज तरी वेळ भेटेल का गं ।। व्यवहारी विचारी पेलून सारी ह्रद्याशी ह्रद्य खेटेल का गं ।। तु ग्रृहलक्ष्मी मी अन्नदाता तु मायाममता मी इःकर्तव्यता मेळ दोघांचा होईल का गं ।। गलित तन झाले मन न झाले आज तरी चांद उगवेल का गं ।। -सुर्यांश
काव्यरस

भक्ष (भयकविता)

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 07/01/2017 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात चालले, चार तरुण मित्र रस्त्यावर नव्हतं, कुणी काळं कुत्रं. त्यांना नाही दिसलं, एकजण फसलं अंधारात चालले, तिन तरुण मित्र चालले होते मस्तीत,आपल्याच बेफिकर एकजण नव्हता, त्यांना नव्हती खबर दोनजण उरले, दोघेही घाबरले "कोण आहे तिकडे?" भेदरून ओरडले अंधारात कोलमडला, एक तरुण मित्र उरलं नाही भान पुटपुटायचं स्तोत्र काय होणार आता,त्याने लगेच ताडलं, चावलं फाडलं अंधारात चालले, चार तरुण मित्र, शोधत होते भक्ष, आठ लाल नेत्र --------------------