Skip to main content

आपला आवाज आपली ओळख - (कांचन कराई)

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी गुरुवार, 19/01/2017 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
*/

ही चित्रफीत अनेक कारणांसाठी आम्हाला ह्या उपक्रमात आयोजक म्हणून स्पेशल आहे. एक तर ह्या क्षेत्राबद्दल अधिकाराने लिहिणारे कमीच. त्यामुळे एका वेगळ्या विषयावर चित्रफीत मिळणं आवश्यक होतंच. पण त्यांहूनही महत्त्वाचं म्हणजे कांचनताईंच्या जबड्यावर चालू असलेल्या शस्त्रक्रिया. इतक्या त्रासातही त्यांनी ही चित्रफीत बनवली.

एक निर्णय (भाग 1)

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 18/01/2017 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
एक निर्णय भाग १ हॉलच्या दाराच्या एका बाजूला प्रशांत अस्वस्थपणे उभा होता. शाळेच्या वर्गाच गेटटूगेदर करण्याच ठरलं तेव्हा बिझी असूनही प्रशांतने वेळ काढला होता आणि एकूण हे गेटटूगेदर घडवून आणण्यासाठी खूप मेहेनत केली होती. त्याला फक्त एकच कारण होत. जे फक्त त्याच्या मनालाच माहित होत............................. अचानक सुनिलने; त्याच्या शाळेतल्या खास दोस्ताने टोकल. "आली ती... बघ.. बघ... साल्या हाक तर मार..." आणि प्रशांतची तंद्री तुटली..... समोरून मीनाक्षी येत होती. जवळ-जवळ 12 वर्षानंतर प्रशांत तिला बघत होता. ती खरच समोरून येते आहे याची त्याला खात्री नव्हती. पण ती तिच होती... तशीच शांत...

अव्यक्त भावना ही, शब्दांविनाच बोले

लेखक खग्या यांनी बुधवार, 18/01/2017 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
अव्यक्त भावना ही, शब्दांविनाच बोले, अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले .. डोळ्यांमधून स्वप्ने, आरास आज झाली.. स्वप्ने तुझीच मजला, माझ्यामध्ये मिळाली .. ओठी फुलून आले, माझे अबोल गाणे.. अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले .. कित्येक चांदण्यांचे नक्षत्र आज झाली .. रात्रीस स्वप्न पडूनी, उषा तिथे मिळाली जणू शिंपल्यात मजला मोती नवे मिळाले .. अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले .. डोळयात आसवांची दाटी घडून आली कृत-अर्थ जीवनाची, त्रिज्या मिटून गेली .. मृत्यूस अमृताचे, वरदान जे मिळाले .. अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..

बाप फितूर झाला.........

लेखक किरण कुमार यांनी बुधवार, 18/01/2017 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनात दूखा:ने डोळ्यात पूर आला तू हासला जरासा ,थकवा दूर झाला तू जन्मलास अन मी जगलो असा नव्याने प्रारब्ध गवसला जो, निशब्द सूर आला उचलता हात बाळा, दिधला जरी धपाटा काहूर मनी माझ्या, भरुनी उर आला इवले हात रेखिती आभाळावर नक्षी तू रागावला कधी, चंद्रास खूर आला तूझी पावले उन्ही,बघता या मेघांनी भिजवण्या धरणी,पाऊस आतूर झाला तूझी ओढ इतूकी, कामास दूर सारी तूज भेटाया रोज बाप फितूर झाला

देवघर - मला स्फूर्ती देणारा पवित्र कोपरा!

लेखक सिंधू वडाळकर यांनी बुधवार, 18/01/2017 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
आपुलकी, जिव्हाळा, दया, माया आणि आल्हादाच्या रेशमी धाग्यांनी नटलेली वास्तू म्हणजे आपले घर असते. अशा घरास गंगेचे पावित्र्य लाभलेले असते. माझे घर छोटे आणि दोन मजली आहे. वरच्या घरात एका कोपऱ्यात माझी एक आवडती खास जागा आहे. ती म्हणजे माझे देवघर! देवघरात मोजकेच देव आहेत. त्यात गणपती हे माझे आराध्य दैवत आहे आणि रेणुका देवी ही माझी कुलस्वामिनी आहे. या देवांची मी रोज उपासना करते. रोज तीन तासांची माझी उपासना असते. सुख दु:खाला मोकळीक करून देण्याची ही माझी जागा आहे. देवघरात गणपतीची छोटी आणि सुबक अशी मूर्ती आहे. त्याची मी आवर्तने करते. तसेच देवघरासमोर मी ध्यान धारणा करते. त्यामुळे मला शांती लाभते.

वडील

लेखक वृंदा१ यांनी बुधवार, 18/01/2017 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.

"लीके"(एक माध्यम धार्मिक शिकवणीचं)

लेखक बाजीप्रभू यांनी बुधवार, 18/01/2017 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
*/

आपल्या पैकी बरेचजण एखाद आठवड्यासाठी का होईना थायलंड देशात नक्कीच येऊन गेला असाल. एक बजेट फॉरेन टूर म्हणून पूर्वेकडील या निसर्गरम्य छोट्याश्या देशाला थोडे थोडके नव्हे तब्बल ६० लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात. पटायातला एक बीच आयलँड, एक कॅबरे शो, रेड लाइट एरियाची व्हिजिट, झालंच तर एक जंगल सफारी आणि बँकॉकच्या मॉल्समधे शॉपिंग, हि मुख्यत्वे भारतीय पर्यटन कंपन्यांची स्टॅंडर्ड आयटीनरी.