देवघर - मला स्फूर्ती देणारा पवित्र कोपरा!
आपुलकी, जिव्हाळा, दया, माया आणि आल्हादाच्या रेशमी धाग्यांनी नटलेली वास्तू म्हणजे आपले घर असते. अशा घरास गंगेचे पावित्र्य लाभलेले असते. माझे घर छोटे आणि दोन मजली आहे. वरच्या घरात एका कोपऱ्यात माझी एक आवडती खास जागा आहे. ती म्हणजे माझे देवघर!
देवघरात मोजकेच देव आहेत. त्यात गणपती हे माझे आराध्य दैवत आहे आणि रेणुका देवी ही माझी कुलस्वामिनी आहे. या देवांची मी रोज उपासना करते. रोज तीन तासांची माझी उपासना असते. सुख दु:खाला मोकळीक करून देण्याची ही माझी जागा आहे. देवघरात गणपतीची छोटी आणि सुबक अशी मूर्ती आहे. त्याची मी आवर्तने करते. तसेच देवघरासमोर मी ध्यान धारणा करते. त्यामुळे मला शांती लाभते. त्यामुळे जीवन जगण्याची स्फूर्ती येते आणि जीवन जगण्याला उभारी येते आणि एक प्रकारचे स्थैर्य अनुभवास येते. आपण एक लक्षात घेतले पाहिजे की भक्तीशिवाय जीवनाला रंग नाही. भक्ती करून मन शुद्ध होते. मग त्या मनात ईश्वराचे प्रतिबिंब पडते आणि जीवनात अनेक चांगले अनुभव येतात आणि ईश्वरावरील श्रद्धा आणखीनच दृढ होते.
समर्पणवृत्ती आणि सात्विक भाव परावर्तीत होण्यासाठी ही जागा म्हणजे देवघर खूप चांगली आहे. उपासना करतांना आपण जी नामजपाची आणि मंत्रांची आवर्तने करतो त्यातून ज्या ध्वनिलहरी उप्तन्न होतात त्यामुळे मनाला नक्की स्फूर्ती आणि शांतता मिळते, हे नक्की! अशा या पवित्र कोपऱ्यातमी सकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळेस रमते.
गणपतीच्या सहवासात असल्याने आपल्या अंगी नम्रता येते आणि अंगी विनयशील वृत्ती बाणावते. तसेच आपला अहंकार दूर होतो. २५ वर्षे साधना करून पवित्र झालेला हा कोपरा मला नवचैतन्य प्राप्त करून देतो. कोपराच नव्हे तर संपूर्ण परिसर पवित्र होतो. श्रद्धेमध्ये सामर्थ्य आहे. म्हणून श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे, "अनन्य भावाने जो मला (म्हणजे सर्वोत्तम परमेश्वराला) शरण येतो त्याचा योगक्षेम मी चालवतो! इतर कोणाही देवाची उपासना केली तरी ती मलाच पोहोचते!" हे लक्षात घ्या की, "न मी भक्तं प्रणश्यति" अशी गोपाळकृष्णाची आन आहे.
साधना करून मला जो आनंद मिळतो त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही. "आनंदाचे डोही, आनंद तरंग!" देणारी अशी ही माझी स्फूर्तीदायी जागा आहे.
- लेखिका: शरयू वसंत वडाळकर, मालेगाव, जि. नासिक
वयः ६६
वाचने
3268
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
छान लिहिलेय. पुलेशु.
खुशीबाईंनी प्रदीर्घ परिक्रमा घडवली होती त्याची आठवण झाली .
छान लिहीला आहे निबंध.
In reply to छान लिहीला आहे निबंध. by सतिश गावडे
मुपी वाटतोय का?
In reply to मुपी वाटतोय का? by संजय पाटिल
मिपा प्रेरित मुपी !
चांगलं लिहिलंय. माझ्या घरातील देवघरासमोर बसल्यावर मलाही पवित्र अनुभवाची अनुभूती येते.
सिंधूताई,
तुम्ही मोजकंच लिहिलंय पण अंत:करणाच्या तळापासून लिहिलेलं वाटतंय. जशी तुम्हांस सगुणातून अनुभूती येते तशीच निर्गुणाचीही येवो.
आ.न.,
-गा.पै.
अवांतर : तुमचं नाव सिंधू की शरयू?
In reply to मोजकं पण तळापासून by गामा पैलवान
सहमत. अगदी साध्या शब्दांत पण मनापासून लिहिलेलं आहे.
In reply to मोजकं पण तळापासून by गामा पैलवान
लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद!
देवावर विश्वास असला की त्या लोकांचं आयुष्य बरंच सुखाचं असतं. बर्याच काळज्या आणि कटकटी दुसर्याकडे ट्रान्सफर करून निवांत रहाता येतं.
In reply to मनापासून लिहिलंय by पैसा
बर्याच काळज्या आणि कटकटी दुसर्याकडे ट्रान्सफर करून निवांत रहाता येतं.
बालपणी बहुतेक जण देवाला परीक्षेत पास करायला सांगतात.In reply to . by संजय क्षीरसागर
आपण आभ्यास केल्याशिवाय पास होणार नाही हे कळतं.
In reply to आणि थोडं मोठं झाल्यावर by संजय क्षीरसागर
सगळ्यांनाच नाही कळत. अज्ञानात सुख.
निर्गुण निराकाराची उपासना करणाऱ्यास "आनंदाचे डोही, आनंद तरंग" या अवस्थेचा अनुभव घेण्यासाठी ना देवघर लागते ना विशिष्ट वेळ पाळावी लागत.
"न मी भक्तं प्रणश्यति"म्हणजे?
In reply to "न मी भक्तं प्रणश्यति" by सूड
मेरे भक्त का कभी विनाश नहीं होता है |
तो एक टिपी दिलासाये.
In reply to म्हणजे by संजय क्षीरसागर
नाही, म्हणजे ही भाषा कोणती आहे? संस्कृतात 'मी' वापरलेलं पाहण्यात नाही म्हणून ज्ञानात भर घालून घ्यायचा केविलवाणा प्रयत्न करतोय.
ओके
छान लिहिलेय. पुलेशु.
छान लिहिलेय. पुलेशु.