माझी नर्मदा परिक्रमा : इंद्रावती नदीत गोमातेकरवी वाचवले प्राण
( याच नावाचा आधीचा लेख अपूर्ण आहे तो कृपया वाचू नये . संपूर्ण लेख इथे पुन्हा टाकत आहे . तसदीबद्दल क्षमस्व )
आवली घाटाच्या पुढे रस्ता नसल्यामुळे मोठ्या शिताफीने वरच्या एका शेतात शिरलो . शक्यतो नदीचे वळण जोपर्यंत आहे तोपर्यंत उभा कडा असतो . नंतर पुन्हा पाय ठेवण्यासारखी जागा निर्माण होते . अशी जागा दिसली रे दिसली की मी वरून खाली उडी मारत असे . कारण माझा अनुभव असा होता की अजून चांगली जागा शोधायच्या नादात आपण नर्मदेपासून हळूहळू लांब लांब निघून जातो . त्यापेक्षा जीवाला किमान धोका असलेली कुठलीही जागा उत्तम समजून खाली उतरणे श्रेयस्कर असते . जेणेकरून मैया चा काठ सुटणार नाही .
मिसळपाव