Skip to main content

आई घरात असतां घर,घरासम भासले

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 05/05/2024 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
क्षीण आवाज ऐकून किती पहारे ठेवावे आजचा श्रावण पाहून किती चेहरे रंगवावे आई घरात असतां, घर घरासम भासले आता मुलांनी,घराचे बहूत विभाग केले आशेचे खूले गगन अमूचे बाबा होते आता सगळे स्वप्न हळुवार भंग झाले सर्व नातीगोती तुकडे तुकडे होऊन विभागली कुणास ठाउक दुःख्खें किती हिश्शात विभागली एक नियम नाही हर एका मध्ये हर रूपांवर दुसरे रूप विभागले आई घरात असतां घर,घरासम भासले
लेखनविषय:

वाचने 574
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया