Skip to main content

अनबॉक्सिंग ऑडियो टेक्निका ATH-M20X

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 17/03/2017 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष भरा पूर्वी अनबॉक्सिंग सेनहायजर सी एक्स ३.० या धाग्यात इन In-Ear Canal Headphone बद्धल लिहले होते. सेनहायजर च्या एचडी २०२ आणि सी एक्स ३.० अनुभव घेउन झाल्यावर काही अनुभवलेल्या गोष्टी शेअर करतो. १} एचडी २०२ अजुनही उत्तम चालतोय, पण डोक्याला घट्ट बसणार्‍या स्पंजवर असलेले आवरण अगदी हलक्या दर्जाचे निघाले ! काही काळातच ते निघुन गेले.बाकी काही त्रास नाही. २} सी एक्स ३.० हा मी वापरलेला सगळ्यात कानात अगदी सुखदायक रित्या आरामात बसणारा In-Ear हेडफोन ठरला, पण काही काळापूर्वी त्याची सिलिकॉन टिप्स निघण्याचा त्रास जाणवु लागला !

खिडकी पलीकडचं जग भाग 3

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 17/03/2017 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ : http://www.misalpav.com/node/39159 भाग 2: http://www.misalpav.com/node/39179 खिडकी पलीकडचं जग भाग ३ मात्र खोल मनात गौरीला कुठेतरी खात्री वाटत होती की तिने त्या मैदानावर मुलांना बघितले होते. ती दुस-या दिवशीच्या संध्याकाळची वाट पाहात होती. साधारण पाचची वेळ झाली आणि तिची आई आणि ती खिडकीतून त्या मैदानाकड़े डोळे लावून बसल्या. पाचचे साडे पाच झाले... साडे पाचचे सहा. पण त्या मैदानावर चिटपाखरुही दिसले नाही. गौरी खूपच हिरमुसली.

Tokyo – A visit to remember

लेखक हृषिकेश पांडकर यांनी शुक्रवार, 17/03/2017 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
शरीराचे एखादे अंग निकामी असेल किव्वा त्याला व्यंगत्व असेल तर त्या व्यक्तीची बाकीची इंद्रिय इतरांपेक्षा जास्त सक्षम असतात हा निरीक्षणातून आलेला निष्कर्ष आहे.आणि या निष्कर्षाला पूर्णत्वाची पावती मिळते ती जपानला भेट दिल्यावर. काठोकाठ भरलेल्या बशीत बिस्कीट सोडावे तसे चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला निमुळता भूप्रदेश,आपल्याकडे लाईट जावी त्या सहजतेने होणारे भूकंप.हिरोशिमा,नागासाकी येथील हल्ल्यानंतर उध्वस्त झालेले जपान.

प्रासंगिक भटकंती वार्ता

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 17/03/2017 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
ढाक बय्राचजणांनी ट्रेकमध्ये उत्सुकता दाखवल्याने एक ट्रेक ठरवला आहे. एक दिवसाच्या ट्रेकला जाण्याचे ठरत आहे. रविवार दि १९ कर्जत-वदप-ढाक गाव-कर्जत सकाळी सहा ते संध्याकाळी आठला परत. वाट सोपी ,दरी नसलेली, अवघड चढाई नसलेली, ढाकचे गाववाले वापरत असलेली आहे. आपण ढाक बहिरीला जात नाही. ढाक गावाकडे जाणार आहोत. थोडी भटकंती आणि वनभोजन. ट्रेन + ओटोरिक्षा ( अंदाजे प्रवास खर्च रु ८० अथवा कमी ) ( ढाक बहिरी गुफा अथवा ढाक गड नाही) उन्हाळ्यातला दिवसा ट्रेक जमत असेल त्यांनी यावे. ( cst karjat fast train.

उत्तुंगतेचा प्रवास...||२||

लेखक यांनी शुक्रवार, 17/03/2017 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटेचे चार वाजले मी आणि माझा मित्र घड्याळाच्या गजराने उठलो रोजचे सोपस्कार उरकून,रूम च्या बाहेर आलो,अजून बाहेर पहाटेचा अंधार आणि हवेत आल्हाददायक गारवा होता बाहेर पडल्यावर ढाबा वजा हॉटेल वर सकाळचा चहा घेतला आणि त्याच धाब्यावर रुपये 20 प्रति काठी ह्या दराने मी व मित्राने 2 काठ्या घेतल्या,कि जेणे करून आमचं ट्रेकिंग सोपं होईल आता आम्ही ओम नमः शिवाय म्हणत,तृतीय केदार असलेल्या तुंगनाथ आणि चंद्राशीला ट्रेक ला सुरवात केली घनदाट जंगला मधून जाणारा तो रस्ता फारच सुंदर होता,तुंगनाथ मंदिरा पर्यंत चा रास्ता उत्तराखण्ड सरकारने सिमेंट चा बनवुन यात्रेकरूंची चांगली सोय केली आहे , आज पर्यंत एवढ्या सुंदर रस्त

कथा आणि व्यथा बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....

लेखक परशु सोंडगे यांनी शुक्रवार, 17/03/2017 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!! चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची . "सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा. थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? " धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ." रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला.

टकटक

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 17/03/2017 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
"मी पोलिसांना फोन करीन, असा माझ्या मागे का येतोय?" अचानक माधवी संतापून मागे वळत म्हणाली. तिने एक हाक दिली असती किंबहुना किंचाळली असती तरी आजूबाजूच्या बिल्डींगमधले कोणी ना कोणी पळत आले असते. तिचा स्वर कापत होता मात्र ती ठाम दिसत होती. "न..नाय वो म्याडम, मी घराकडं निघालोय.." तो गुटखा खाणाऱ्या पोऱ्या या अनपेक्षित हल्ल्यानं बावचळून गेला. मोबाईलवर वाजणारं "भीगे होंट तेरे.." नामक गाणं त्यानं घाईघाईनं बंद केलं. "मी तसला नाय वो" काकुळतिला येऊन तो म्हणाला. एव्हाना त्याला घामही फुटला होता. "चालता हो इथून आधी" तप्त सुरात माधवी म्हणाली. गेले बरेच दिवस तो पुलाखालच्या टपरीवर उभा असलेला तिला दिसायचा.

दृष्टीकोन

लेखक संदीप-लेले यांनी गुरुवार, 16/03/2017 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
नेत्रभिंग बसवले नवीन, पण कोन तोच दृष्टीचा, वैद्यकीय प्रगती अफाट, उपयोग काय हो त्याचा ! लांबले आयुष्यमान, भर शून्य कर्तुत्वाचा, तगले जीव अनेक, उपयोग काय हो त्याचा ! जल, रस्ते, हवाई मार्गे, आक्रसला भूगोल जगाचा, वेळ नाही घरी थांबायाला, उपयोग काय हो त्याचा ! वसविली आडवी नगरे, गाठला कळस उंचीचा, निसर्ग नाहीसा केला, उपयोग काय हो त्याचा ! लडबडला, मग गडबडला, भाव अहो तेलाचा, अर्थशास्त्रात खुलासे अनेक, उपयोग काय हो त्याचा ! महागाई आली गेली, झगडा चालूच आयुष्याचा, सुगी जगाच्या बाजारी, उपयोग काय हो त्याचा ! उपसुनी खनिजं बेसुमार, गल्ला भरती बाजाराचा, मिटे ना दारिद्र्यरेषा, उपयोग काय हो त्याचा ! खुळखु