Skip to main content

[खो कथा] पोस्ट क्र. ६

लेखक चॅट्सवूड यांनी शुक्रवार, 24/03/2017 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
[खो कथा] पोस्ट क्र. १ [खो कथा] पोस्ट क्र. २ [खो कथा] पोस्ट क्र. ३ [खो कथा] पोस्ट क्र. ४ [खो कथा] पोस्ट क्र. ५ पोस्ट क्र. ६: या दोघांची भांडण बघून मला कंटाळा आला होता. मी एक जांभई दिली, मान, बोट, पाठ मोडली आणि उठलो.

दांडी मारणे - एक विलक्षण कला

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 24/03/2017 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

विहार…भाग ३

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 24/03/2017 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या दोन भागांची लिंक, http://www.misalpav.com/node/39239 http://www.misalpav.com/node/39266 अहमद आता उठून बसला होता. आपल्यासमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ह्याची त्याला आता पूर्ण कल्पना आली होती !! रात्रभर अहमदला झोप लागली नाहीच. सकाळी उठल्यावर तो इरफानला भेटायला गेला. इरफानला रात्री थोडा त्रास झाला होता. तिथल्या डॉक्टरने पेनकिलर देऊन त्याला झोपविले. डॉक्टरने अहमदला काही औषधं लिहून दिली. हॉस्पिटलच्या आवारात संस्थेचेच एक औषधांचे दुकान होते जे चोवीस तास सुरु असायचे.

विहार…भाग ३

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 24/03/2017 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या दोन भागांची लिंक, http://www.misalpav.com/node/39239 http://www.misalpav.com/node/39266 अहमद आता उठून बसला होता. आपल्यासमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ह्याची त्याला आता पूर्ण कल्पना आली होती !! रात्रभर अहमदला झोप लागली नाहीच. सकाळी उठल्यावर तो इरफानला भेटायला गेला. इरफानला रात्री थोडा त्रास झाला होता. तिथल्या डॉक्टरने पेनकिलर देऊन त्याला झोपविले. डॉक्टरने अहमदला काही औषधं लिहून दिली. हॉस्पिटलच्या आवारात संस्थेचेच एक औषधांचे दुकान होते जे चोवीस तास सुरु असायचे.

'किनी'-'मिनी' चमचा 'धरा' (लघुत्तम कथा)

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 24/03/2017 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट शहर होत, त्या आटपाट शहरात किनई एक 'किनी' रहात असे. त्याच्या जिवाभावाच्या मैत्रिणीचं नाव होत, 'धरा'. एक दिवस 'किनी' मोठा झाला, नौकरीसुद्धा करु लागला. तसं 'धरा'नी त्याला प्रोपोज केलं; पण त्यावेळी 'किनी'ला आवडली होती 'मिनी'. 'किनी'ने 'मिनी'ला प्रोपोज केले, 'मिनी' हो म्हणाली, पण त्या आधी 'मिनी'ने विचारलेच होते तुझ्या आधीच्या मैत्रिणी कोण ? 'किनी'ने 'मिनी'ची 'धरा'शी ओळख करुन दिली.

(नेक्स्ट) गॉन गर्ल

लेखक एमी यांनी शुक्रवार, 24/03/2017 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
चांगली-वाईट, सुष्ट-दुष्ट, काळ्या-पांढर्या अशा एकाच रंगातल्या व्यक्तिरेखांच्या गर्दीत अचानक कधीतरी करड्या व्यक्तिरेखा सापडतात आणि मी चौकस होते. त्या जर स्त्रिया असतील तर अपील जरा जास्तच. अॅना केरनीना, स्कार्लेट-ओ-हारा, लिजबेथ सेलँडर... यांना ननायिका म्हणतात. यांच्यात काही सद्गुण सहजपणे सापडतात म्हणून त्या नायिका. पण तेवढेच दुर्गुणदेखील असतात त्यामुळे ननायिका. अँटीहिरोइन. पण कधीकधीमात्र अश्श्या बायका भेटतात की बस्स! धक्काच बसतो! काय चांगलं काय वाईट याची जाण यांच्यात भीषणपणे गंडलेली असते. या बायका स्वतःहून कुठल्याही चांगल्या व्यक्तीला त्रास देत नाहीत.

कथाकथी

लेखक पुंबा यांनी गुरुवार, 23/03/2017 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, आजच अस्मादिकांना मिपागावाचे रहीवासी झाल्याला एक वर्ष पूर्ण झाले. इतके दिवस धागा लिहिण्याला धीर होत नव्हता पण आज आदूबाळ म्हटले धागा काढा. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून, हा धागा काढून मिपावाढदिवस साजरा करत आहे. आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकाच्या वाचनाची सुरूवात कथांपासूनच झाली असेल. याला कारण म्हणजे, मराठी, हिंदी, इंग्रजीच्या पुस्तकांतील धडे. या धड्यांमध्ये मातब्बर लेखकांच्या छोट्या कथा असत/असतात. पुस्तक घरी आलं की सगळ्यात आधी पुस्तकाचा वास घ्यायचा आणि वेष्टणं पण घालायच्या आधी सगळे धडे वाचून टाकायचे असं केल्याचे कित्येकांना आठवत असेल. आपल्यापैकी कित्येकांची प्रेमचंद, दि. बा.

विहार...भाग २

लेखक चिनार यांनी गुरुवार, 23/03/2017 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागाची लिंक http://www.misalpav.com/node/39239 चोवीस तास इरफानच्या शरीरात त्याची एक किडनी स्वछंद विहार करत होती !! हे सगळं आठवल्यावर अहमदच्या अंगावर शहारे आले. भानावर येताच आपण होडीवर असल्याचे त्याच्या ध्यानात आले. अहमदने त्याच्या बायकोला जास्त तपशील न सांगता फक्त नडियाडला जावे लागेल एवढेच सांगितले. तिला त्याचे गांभीर्य पूर्णतः: कळले नसले तरी ती चिंतातुर झालीच. नाडियाडला तिचा लांबच्या नात्यातला एक भाऊ राहायचा. त्याच्याकडे उतरता येईल असे तिने अहमदला सांगितलं. अहमदला या गोष्टीची काळजी नव्हतीच.

प्रमोशन

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 23/03/2017 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
माॅर्निंग ब्रेकची वेळ. ब्रेकफास्ट काऊंटरवर मार्निंग शिफ्टच्या एम्प्लाॅईजची तुरळक गर्दी होती. बेनमेरीमधल्या स्टीलच्या ट्रेमधून अनेक पदार्थांचा संमिश्र असा वास दरवळत होता, पण त्यातूनही रस्समचा वास ब-यापैकी नाकाला ठसका देत होता. मधूनच बाजूला टांगलेल्या निळ्या रंगाच्या फ्लाय किलरमध्ये माश्या चिकटल्याबरोबरचा 'चट..चट' आवाज काही नवख्या एम्प्लाॅईजचे लक्ष वेधत होता. लॉगईन करून दोन चार कामाचे मेल चेक केल्यानंतर रोहन आणि मिंजल कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्टसाठी आले होते.