Skip to main content

सत्यमेव न जयते, कल्याणमस्तु!

लेखक arunjoshi123 यांनी शुक्रवार, 14/04/2017 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारताचं ब्रीदवाक्य आहे - सत्यमेव जयते. या ब्रीदवाक्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याचा अवमान मला सोसवत नाही हे प्रथम नोंदवतो. आजपावेतो लोकांनी माझ्या विधानाचा असा अर्थ घ्यावा, तसा घेऊ नये असं डिस्क्लेमर मी कधी टाकलं नाही, पण इथे विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन लेखातील चिकित्सेचा अर्थ राष्ट्रद्रोह इ इ नाही असे पुन्हा नमूद करतो. ============================================================== सत्यमेव जयते चं शब्दशः भाषांतर "सत्यच जिंकते" असे आहे. सत्यम् = सत्य, एव = च जयते = जिंकते. च वर जोर.

मूर्खांची लक्षणे !

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 14/04/2017 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
नाही नाही...हुरळून जाऊ नका..हे माझं आत्मचरित्र नव्हे.आतमध्ये काहीही लिहिलं तरी नावं त्याला साजेसं देऊ नये इतपत समज आलीये एव्हाना.आता आत्मचरित्र नसलं तरी ही लक्षणं माझी आणि माझ्यासारख्याच इतर अनेकांची आहेत हे लक्षात येईलच! रविवारचा दिवस! म्हणजे झी सिनेमा आणि सेट मॅक्सवर अनुक्रमे हम आपके है कौन आणि सूर्यवंशम पाहण्याचा दिवस! त्यातल्या त्यात सूर्यवंशम हा कुठल्याही समीक्षेच्या पलीकडे पोहोचलेला सिनेमा आहे.

चकवा

लेखक उपेक्षित यांनी शुक्रवार, 14/04/2017 16:58 या दिवशी प्रकाशित केले.

चकवा

खरे तर वाचन म्हणजे माझा जीव कि प्राण, अगदी लहानपणापासून मला हे वेड आहे जे आजपर्यंत टिकून आहे. साधा भेळीचा कागद सुद्धा पुरतो मला वेळप्रसंगी... ‘त्या’ विलक्षण घटनाक्रमाला पण अशीच वरवर पाहता साध्या गोष्टीने सुरवात झाली होती. आपल्या आयुष्यातपण अशा बर्याच चांगल्या-वाईट गोष्टी असतात ज्या वर-वर पाहता साध्या, शुल्लक वाटत असतात पण त्याच शुल्लक गोष्टी वेळ आली कि किती महत्वाच्या होऊन जातात नाही का ? ‘त्या’ दिवशी घरी कोजागिरीनिमित्त मसाला दुध आणि भेळ असा साधासा बेत ठरला.

श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ भाग १

लेखक aanandinee यांनी शुक्रवार, 14/04/2017 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ हरिः ॐ अध्याय १, भाग १. भावार्थ- नेहमी केल्या जाणार्या या गणेशवंदनेतसुद्धा हेमाडपंतांचे सद्भक्त असणे उठून दिसून येते. त्यांनी केवळ गणपतीला वंदन केले नाही तर गणपतीमध्येच त्यांनी त्यांच्या सद्गुरू साईनाथांना पाहिले. हिंदू धर्मात आपल्या अनेक वेगवेगळ्या देवता, त्यांचे वेगवेगळे सण , साजरे सर्व काही केले जाते पण मग त्यामध्ये कधीकधी "आपली निष्ठा नक्की कुठे आहे? मग बाकीच्या गोष्टी मानायला हव्यातच का ? बाकीच्या देवांना नमस्कार करायलाच हवा का? न केला तर काही होईल का?

देव्हारा...४

लेखक विनिता००२ यांनी शुक्रवार, 14/04/2017 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या दिवशी आदेश आणि तनू नेहमीप्रमाणे क्लासरुममधे आले. पहिल्या बेंचवर बसून अभि त्यांचीच वाट पहात होता. तो रोज लेक्चर अटेंड करु लागला. वेळ वाया घालवणे त्याने बंद केले होते. त्यातला हा बदल तनूसाठी खुप सुखावह होता. त्याला पाहिले की तिचे मन प्रेमाने जास्तच गहीवरुन यायचे. सहा महीने या प्रेमालापात कसे गेले ते दोघांनाही कळले नाही. पण आदेशला त्यांनी एकटे पडु दिले नव्हते. त्याला सोडुन ते दोघे कधीच कुठे ऐकटे गेले नाहीत. दोघांना एकत्र पाहुन आदेशला खुप आनंद व्हायचा. तनूसाठी अभि परफेक्ट आहे हे त्याने जाणले होते. देव्हारा...४ दार वाजले म्हणुन आदेशने दार उघडले.

करवंद सरबत

लेखक अनन्न्या यांनी शुक्रवार, 14/04/2017 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळा सुरू झाला तसा रानमेवा पण खूपच देसू लागलाय! निसर्गाने उन्हापासून आपली काळजी घेण्यासाठी अनेक पर्याय देलेत. आज करूया करवंद सरबत! साहित्यः दोन वाट्या करवंद, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार. sarbat कृती: करवंदांचा चीक जाण्यासाठी गरम पाण्यात दहा मिनिटे बुडवून ठेवा. पाण्यातून काढून घ्या. दोन भाग करून बिया वेगळ्या करा. करवंदाचा गर, साखर, मीठ आणि एक वाटी पाणी ज्युसर जारमधे एकत्र करा.
Taxonomy upgrade extras

ट्रोलिंग वर कायदेशीर उपाय.

लेखक संदीप डांगे यांनी शुक्रवार, 14/04/2017 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
खालील इंग्रजी परिच्छेदाचे मराठी भाषांतर करून हवे आहे. कोणाला इच्छा असल्यास मदत करावी. Social media has given people a platform to air their views but it has also left them vulnerable to slander, character assassination, intimidation and defamation. Supreme Court lawyer Virag Gupta blames the brazenness of trolls on the high threshold of tolerance among web users.

दिवस....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 13/04/2017 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या दिवसांचं काही कळतच नाही बुवा...कधी शेवरीच्या कापसासारखे आपसूक उडतात,कधी लोखंडी रोलरसारखे ढकलावे लागतात.... कँलेंडरमधे दिसणारे दिवस दिसतात त्यापेक्षा अधिक जवळ असतात... प्रत्येक उगवणारा दिवस मावळतोच...उद्याचा दिवस दिसेलच याचीही काही खात्री नसते..... काही लोक दिवस मोजत असतात ...

आज तु आठवलीस...

लेखक Pradip kale यांनी गुरुवार, 13/04/2017 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज तु आठवलीस आज तु आठवलीस अन् डोळे अासवांनी ओघळले कधी खंत तर कधी आनंद दोहोंमध्ये बरसत राहीले खंत यासाठी की, मी व्यक्त नाही झालो कधी तुझ्यापाशी गुज करीत राहीलो स्वत:च स्वत:शी भीती नव्हती बोलण्याची, हो भीती नव्हतीच मुळी बोलण्याची भीती होती ती नकाराची, आणि हो कदाचीत संस्कारांचीही अन् आनंदाचे यासाठी की, आठवतात ते क्षण, जेव्हा तु पहीली दिसलीस अन् नसेल तुलाही माहीत कदाचीत, पण हे हृदय घेऊन गेलीस, ताल बिघडले मनाचे, हो तालचं बिघडले मनाचे कारण तु सुरचं घेऊन गेलीस आता आजही शोधत असतो फक्त तुला, कधी मोगर्याच्या गंधात कधी फुलांच्या पाकळ्यात कधी सागराच्या लाटेत कधी चंद्राच्या चांदण्यात तर कधी तार्यांच्या
काव्यरस