Skip to main content

प्रतिभा

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी गुरुवार, 20/04/2017 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
खरंतर दोन वर्षांपासून प्रतिभा आमच्या ऑफिसमध्ये काम करीत होती. ती थोडी अबोल होती. फारशी स्वतः हून मिसळत नसे. ऑफिसमधल्या कोणत्याही कार्यक्रमाला मात्र ती न चुकता हजेरी लावीत असे . पण ती बरीचशी निर्विकार होती. तिची प्रतिक्रिया क्वचितच बघायला मिळत असे. माझी सहकारी म्हणून ती उत्तम होती. प्रत्येक कामाची ती अगदी मन लावून आखणी करून ते यशस्वी करून दाखवीत असे. वयाने माझ्यापेक्षा एखादं दोन वर्ष लहान असेल किंवा बरोबरीची पण असेल. तिचा चेहरा थोडा करारी वाटायचा. उभट कपाळ , त्या खाली असलेले स्थिर डोळे तिचा गंभीर पणा उगाचच वाढवीत आहेत असे वाटे.

निखारा

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 20/04/2017 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
सावली ही लांबली चौकटीशी थांबली दूर दिसते मेघमाला वीज कोठे गुंतली धग पून्हा निखा-याला राख ज्याची राहिली .. सागरलहरी

ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 19/04/2017 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन! दि. ३ जुलै २०१६ प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आज सकाळी उठल्यापासूनच लोकेशशी बोलणं सुरू होतं. तेव्हा म्हंटलं चला थोडं सविस्तर बोलू. त्या दिवशी आम्ही भेटलो असतानाही भेटायचं चाललं होतं. तेव्हा आता इथे पत्रातूनच भेटावं म्हंटलं. आणि मला पत्रातून भेटायला खूप आवडतं. जेव्हा प्रत्यक्ष भेटतो; तेव्हा खूप वेळ फॉर्मल बोलण्यात- हाय हॅलोमध्ये जातो किंवा जनरल बोलण्यात जातो.

50x7 सायकलिंग चॅलेंज आणि तीळसे येथील मंदिराला एक भेट.

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 19/04/2017 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज लिहितोय आमच्या(मी, प्रसाद दाते आणि धडपड्या) 50x7 सायकलिंग चॅलेंज बद्दल आणि त्या निमित्ताने माझ्या तीळसे येथील शिव मंदिराच्या भेटीबद्दल. तर नेहमीप्रमाणे ग्रुपातली मरगळ झटकण्याचा रामबाण उपाय म्हणून कुणीतरी पुन्हा एकदा आठवड्याच्या आव्हानाचा मुद्दा 'सायकल सायकल' या समूहात मांडला. आणि पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. लागलीच मोर्चेबांधणी सुरु झाली सगळ्यांची. तर, अस्मादिकांची नुकतीच पुणे ते वाडा घौडदौड कमालीची यशस्वी झालेली आणि चोहोबाजूंनी येणाऱ्या कौतुकाचा परिणाम म्हणून दुणावलेला आत्मविश्वासाच्या भरात आम्हीही लागलीच त्या चर्चेत उडी घेतली.

पानगळती

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी बुधवार, 19/04/2017 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्यातला खाशा म्हातारा मेला तेव्हा स्मशानात फसफस करून काही क्षणात जळून गेलेला त्याचा मेंदू पाहून त्या रात्री मी प्रचंड अस्वस्थ झालो लाकडाच्या ढिगाखाली कित्येक नव्या जुन्या आठवणी सोबत जळणारा त्याचा मेंदू पाहून निषेध केला मी सबंध पृथ्वीतलावरच्या भिकार तंत्रज्ञानाचा. त्याच्या मेंदूचं मेमरी कार्ड बनवून जुन्या आठवणी विकणारं दुकान या देशात अजून कुणी उघडलंच नाही. न्हवे, डोक्यावर बांधलेल्या मंडवळ्या सुटायच्या आधीच नवरा मेल्यावर त्याच्या अश्या कोणत्या आठवणीवर हौसा म्हातारी सत्तर वर्षे नांदली मला माहित नाही इथल्या गावगाडयातल्या पिढ्यानाही ते माहित नाही पण आयुष्यभर पुरुष स्पर्श न झालेला तिचा देह तडतड जळ

ही आगळी कहाणी : एक आगळावेगळा कथासंग्रह

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 19/04/2017 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
जेवणात गुलाबजाम अन वाचनात लघुकथा आवडत नाहीत असा व्यक्ती सापडणे अवघड. नारळीकर, धारप, वपू, मिरासदार, मतकरी वगैरे कथाकारांच्या लिखाणाने कित्येक पिढ्यांची वाचनभूक भागवली आहे. मराठी वाचक नेहमीच उत्तमोत्तम कथांच्या शोधात असतो. आजच्या धकाधकीच्या अन तणावग्रस्त आयुष्यात काही खुसखुशीत वाचायला मिळालं तर ! हीच गरज निलेश मालवणकर यांचा 'ही आगळी कहाणी' हा नवीन कथासंग्रह पुर्ण करतो. सहज म्हणून मी पुस्तक हाती घेतलं आणि संपेपर्यंत हातातून सुटलं नाही. इतक्या सहजपणे आणि विनोदी शैलीत कथाविषय मानण्याचं कसब फार कमी लेखकांकडे असतं. पुस्तकाचं रुपडं चित्ताकर्षक आहे.

देव्हारा...७

लेखक विनिता००२ यांनी बुधवार, 19/04/2017 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
"तो माझ्या घरात राहील. त्याच्या घरचे देव माझ्याच घरचे नाहीत का? तसे पण देव्हार्‍यात एकदा देवाची प्राणप्रतिष्ठा केली की ते हलवता येत नाहीत. हलवले तर त्यांचे विसर्जनच करावे लागते. आई खुप वेळा लग्नाचा विषय काढते पण माझ्या मनाच्या देव्हार्‍यात अभिची मुर्ती विराजमान आहे, ती कशी हलवू?" आदेशने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला, तशी ती वास्तवात आली. तनूकडुन अभिचा पत्ता घेवुन आदेश निघुन गेला. देव्हारा...७ अभिजीतने कार्डवरचे नाव वाचले आणि तो चटकन उठुन बाहेर आला. "आदेशऽ" अत्यानंदाने त्याने पुकारले. आदेश मंदपणे हसत होता. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले.

वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे!

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 19/04/2017 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
कितीक वेळा पाठ फिरवली..खेळ-खेळले डाव रडीचे वसूल केले आयुष्याने..कर्ज दिलेले दोन घडीचे! खडू-फळा खुर्चीही नाही,अता न पाढे तसे राहिले धूळ-जमा झाले डस्टर अन् छम-छमणारे बोल छडीचे! मला न शिकता आली तेंव्हा,व्यवहाराची खरी कसोटी नोट बनावट हाती आली,मोल कळाले मग दमडीचे! अनवाणी फिरल्यावर कळली ऊब मातीच्या स्पर्शामधली खुशाल बनवा मी मेल्यावर,पायताण माझ्या चमडीचे! वारे फिरले लाख परंतू,ऋतू बदलणे जमले नाही वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे! —सत्यजित
काव्यरस

आठवणी

लेखक संदीप-लेले यांनी मंगळवार, 18/04/2017 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी क्षणांच्या क्षणातील भावनांच्या भावनातील स्पंदनांच्या स्पंदनातील आवेगाच्या आठवणी पावसाच्या, पावसातील प्रवासाच्या, प्रवासातील गाण्याच्या गाण्यातील प्रेयसीच्या आठवणी थंडीच्या थंडीतील शेकोटीच्या शेकोटीतील हुरड्याच्या हुरड्यातील गोडीच्या आठवणी उन्हाळ्याच्या उन्ह्याळ्यातील सुट्टीच्या सुट्टीतील पुस्तकांच्या पुस्तकातील जादूच्या आठवणी खेळाच्या खेळातील भांडणाच्या भांडणातील मैत्रीच्या मैत्रीतील ओलाव्याच्या आठवणी कधीकधीच्या आठवणी कुणाकुणाच्या आठवणी कशाकशाच्या साठवणी मनामनांच्या - संदीप लेले

रम्य ते बालपण- आंब्याचा सिझन

लेखक Omkar Bapat यांनी मंगळवार, 18/04/2017 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
रम्य ते बालपण- आंब्याचा सिझन ------------------------------------- आंबा या शब्दांतच मला फार रस आहे. सर्व फळांचा हा राजा. त्यात देवगडचा/रत्नागिरी हापूस म्हणजे जणू चक्रवर्ती सम्राटच. केसरी, तोतापूरी, पायरी, बैंगनपल्ली इ. बाकीच्या आब्यांच्या जाती या सम्राटाचे जणू मांडलिक राजेच. उन्हाळ्यात दिग्वीजयाला निघालेला हा सम्राट पुण्या-मुंबईतच श्रीमंताचा पाहुणचार करत रमायचा. सोलापूरसारख्या कोकणापासून दूर रहाणार्‍या आम्हां सामान्य जनतेला आमच्या लहानपणी याची फारच वाट पहावी लागायची. सामान्य जनतेला हा सम्राट फारच “महाग” होता.