Skip to main content

गती

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 22/04/2017 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
अन्न, वस्त्र, निवारा किंवा “आहार निद्रा भय मैथुनंच” इतक्याच काय त्या जीवनाच्या मूलभूत गरजा असतात, असा आपला समज असतो. तसा तो सततच करून दिला जात असतो. मात्र हे खरे नाही. जीवनाला आवश्यकता असते ती गतीची. ह्याची आपल्याला जाणीवही क्वचितच करून दिली जात असते. काळाची गती अपरंपार असते. काळासारखी गतीमान वस्तू तर जगात दुसरी कुठलीही नसेल. मनुष्य कालवश होतो. मग आपण सांत्वना करत असतो, की ईश्वर मृतात्म्यास सद्-गती देवो. म्हणजेच गतीला आपण हवीशी मानत असतो. मनुष्याच्या पूर्वसुकृतांनुरूप चांगली वा वाईट गती त्यास प्राप्त होतच असते. मात्र गतीविरहित जीवनाची कल्पनाच करता येत नाही. सर्व चराचर सृष्टी सततच बदलत असते.

हीच तर सुरुवात आहे...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 21/04/2017 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
गुदमरावे प्राण अवघे,श्वास इतका कोंडण्याची... होय!मी केली तयारी,वादळांना फुंकण्याची! काय मी केला गुन्हा की सोडले मी मौन माझे... पेटल्या वणव्यास मागा कारणे मी चेतण्याची! आर्त किंकाळीस जेंव्हा वेदनांची साद येते... शर्थ होते थबकलेल्या जाणिवांना रेटण्याची! बोट का छाटू नये ते,या गुलाबाच्या कळ्यांनी... ज्या नखावर खूण नाही,एक काटा टोचण्याची! लाख सजवा वेस तुमची,लक्तरे टांगून माझी... हीच तर सुरुवात आहे,मी दिशांना लांघण्याची! —सत्यजित
काव्यरस

रच्याक्ने कच्ची पोळी हाकानाका

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 21/04/2017 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
चित्तचोरी त्यांची म्हणे फेल झाली वाचकांची फालतू घालमेल झाली ना हिशेब जमला ना उधळपट्टी जमली डोकी नकोत्यात रिकामी खपली दिखाऊ प्रेमबाजांचा गुंताच नुसता कामाचे काम सोडून कशाला वाचता नै सुचत जिलबीसाठी चार ओळी कच्चीच र्‍हैली आमची विडंबनाची पोळी.

डाव - ६ [खो कथा]

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शुक्रवार, 21/04/2017 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
रुपाली : गप्पा चांगल्या रंगात आल्या हुत्या अन तितक्यात वस्ताद्या कडमडला. कोण बेणं मेलंय सांगायलेबी तयार नवता हरामी. फौजदार लागोलाग लटांबर घीऊन निघून गेला. काय त्या चारचार गाड्या, रायफली अन हवालदार. इतक्यात कोणी आपल्याला पहायला यील वाटलंच नव्हतं. आबा म्हणत होते शिक्षण हुदे मग लग्नाचं पाहू. अन काल एकदम बॉम्बच टाकला. सकाळचे जेवणं झाल्यावर त्यांनी डिक्लेयर करून टाकलं की उद्या रुपीला पहायला एक पोरगा येणार हाये. तालुक्यात इन्स्पेक्टर हाये…पक्की सरकारी नोकरी, पाण्याखालची पन्नास एक्कर जमीन, मोक्याच्या जागी दोनचार प्लॉट अन बंगला. तालेवार पार्टी.

अनवट किल्ले ४ : चहाडघाटाचा रक्षक काळदुर्ग (Kaldurg )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 21/04/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत पाहिलेले किल्ले बलदंड आणी सामरीकद्रुष्ट्या महत्वाचे आहेत. पण आज आपण माहिती घेत असलेला काळदुर्ग हा तुलनेने कमी महत्वाचा किल्ला म्हणावा लागेल. पालघरच्या पुर्वेला समुद्राला संमातर उत्तर दक्षिण अशी एक डोंगररांग आहे. या रांगेत तीन किल्ले आहेत, असावा, काळदुर्ग आणि तांदुळवाडी. हि डोंगररांग घनदाट वनश्रीने नटलेली आहे, ईथे किल्ला आणि त्याच्या पायथ्याशी पाझर तलाव अशी रचना आहे. या गडाची उंची ३५० मी. आहे. आज आपण जाणार्‍या काळदुर्ग हा किल्ला पालघर - मनोर- वाडा या रस्त्यावर असलेल्या चहाड घाटावर लक्ष ठेवण्यासाठी उभारलेला आहे.

तो आणि ती

लेखक अक्षय दुधाळ यांनी शुक्रवार, 21/04/2017 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती ( आज ते दोघे भेटणार होते. तसे ते प्रत्येक विकेंडला भेटतात पण आज थोडं विशेष होतं. त्याला player of the tournament भेटलेलं.दोघेही excited होते. तो तिला काय भेटलं ते दाखवायला आणि ती Congrts करायला. रोजच्या कामा मधून वेळात वेळ काढून विकेंडला भेटणा-या प्रत्येकासाठी तो आणि ती ) ती :- हेल्लो कुठे आहेस तू ?? आणि किती वेळ तो :- अग येतोय गं ५ मिनिटांत जाम ट्राफिक आहे ती:- नेहमीची कारण मला नाही लागला ते ट्राफिक मी पण त्याच रोडवरुन आले ना ?? आर्धा तास झाला तुझी ५ मिनिटं काही संपत नाहीये येतो येतो सांगतोयस माझा पुतळा झालाय इकडे. तो :- तुझं नेहमीच आहे हे वेळेच्या आधी येतेसच कशाला ??

(नारंगीभारल्या रात्री होत्या)

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 21/04/2017 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुरापरीच्या वाटेवरती, गटारांगण अंथरले होते... गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते! मी मोकळा..त्यावर संत्रा, नारंगी नखरे,कातिल चखना... फक्त एवढे कळले..नंतर, रोम-रोम मोहरले होते! विरघळलेला बर्फ गारसर,पुन्हा एकदा फसफसलेला... तोच चखना अलगद खिश्यात माझ्या लपवलेला होता मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर? त्याच्या निरागस प्रश्नावरही, चार थेंबे नारंगी उडवले होते घोट घेतानाही क्षणभर, ग्लास अडखळला तेव्हा... पुन्हा नव्याने चुंबण्यास, ओठ माझे थर थरले होते मूळ कवीची क्षमा मागतो, थोडा बहकलो होतो शब्द बदलले एक नवे काव्य गहन रस उमजले ;)
काव्यरस

घोर हा घनघोर आहे!

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 21/04/2017 05:31 या दिवशी प्रकाशित केले.
चोर तर आहेच वर शिरजोर आहे काळजाचा घोर हा घनघोर आहे! जाळतो आहे जिवाला रोज थोडे पावसाचा जोर हा कमजोर आहे! तू नको जावूस माझ्या शांततेवर वेदने,मी वादळाचा पोर आहे! ऐन दुःखाचा पसारा मांडला मी वाह् वा झाली,म्हणाले..जोर आहे! जिंदगी एकाच दुःखावर उधळली मी हिशोबी,फार काटेकोर आहे! वाचण्याआधीच हे लक्षात घे तू मी कुणी नाही कवी,चितचोर आहे! —सत्यजित
काव्यरस

गंधभारल्या रात्री होत्या...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 21/04/2017 03:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नपरीच्या वाटेवरती,तारांगण अंथरले होते... गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते! केस मोकळे..त्यावर गजरा,छत्तिस नखरे,कातिल नजरा... फक्त एवढे कळले..नंतर,रोम-रोम मोहरले होते! विरघळलेली मिठी सैलसर,पुन्हा एकदा अवघडताना... लाज-लाजुनी अलगद कोणी,चंद्र-किरण पांघरले होते! मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर? तिच्या निरागस प्रश्नावरही,शेर गुलाबी स्मरले होते! निरोप घेतानाही क्षणभर,पाय तिचा अडखळला तेव्हा... पुन्हा वेचण्यासाठी चुंबन,ओठ तिचे थर-थरले होते! —सत्यजित
काव्यरस