Skip to main content

" तू "

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी मंगळवार, 23/05/2017 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
येताच तू, किनारा शब्दात व्यक्त होतो बेभान लाट होते वारा अनर्थ करतो पदरावरी तुझ्या ग फुलती फुले अनेक संध्येस धुंदी येते गंधात स्पर्श फिरतो डोळ्यातले तुझे ते निः शब्द भाव भोळे उर्मीत भावनांच्या ओठात शब्द घसरे चढतो असाच कैफ जाणीव भ्रष्ट होते लहरीत भावनांच्या मजसी भुरळ पडते तो काळही थबकतो अंधार पेट घेतो लाजूनी सागरही ओहोटीत मंद हसतो.
काव्यरस

प्रदूषण... (लघुकथा)

लेखक चिनार यांनी मंगळवार, 23/05/2017 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
शहराच्या मधोमध बांधलेला तो फ्लायओव्हर रखडून रखडून शेवटी पूर्ण झाला. उदघाटन,कौतुकसोहळे पार पडले. मुख्यमंत्री स्वतः आले होते उदघाटनाला. काही विरोधकांनी पर्यावरणाच्या वगैरे घोषणा दिल्या मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना. विरोधकांच्या मते, या फ्लायओव्हरसाठी झाडं तोडण्यात आली, सिमेंटच्या अजस्त्र बांधकामामुळे शहराचं तापमान वाढू शकते, वाहतूक वाढल्यामुळे प्रदूषण होईल वगैरे वगैरे. ते काय नेहमीचंच असतं. मुख्यमंत्री स्वतः विरोधक असताना त्यांचंही मत काही वेगळं नव्हतं! पण एकदा सत्तेच्या सागवानी खुर्चीत बसल्यावर जंगलातील सागवानाविषयी आस्था तुटते ती कायमचीच!

शामभट्टाची "युरोप" वारी .. इटली, स्वीस, फ्रान्स लेखांक ४

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 23/05/2017 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस चौथा . सकाळ सकाळी बायकोने एक सुवार्ता दिली. " एक बूट पुढून फाटला आहे. " युरोप सहलीवर अधिक सामान नको म्हणून पर्यायी पादत्राण न नेण्याचा धोका आम्ही पत्करला होता. पण उसना घेतलेला शेजारणीचा बूट इतक्या अचानकपणे धोका देतो आहे या जाणीवेने मी हादरूनच गेलो. कारण आता नवीन शूज युरोपियन देशात विकत घ्यायचे म्हणजे....जिथे कंगवा रूपये ३५० ला मिळतो तिथे शूज ची किंमत काय असेल " याची कल्पना देखील सहन होईना. कोंणत्याही समस्येने पॅनिक व्हायचे नाही असे मनोमन ठरवून देखील आता युरोचा हिशेब चुकतो की काय ? अशी भिती वाटू लागली.

अनफन & अनफेर

लेखक अद्द्या यांनी मंगळवार, 23/05/2017 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
काही काही दिवस असे अति चांगले जात असतात . म्हणजे त्या दिवशी कोणाशी वाद होत नाहीत, पेट्रोल पंप वर हि गर्दी नसते, ३-४ तास गारपिटीसकट पाऊस पडून हि BSNL ची लाईन अगदी व्यवस्थित चालू असते . मागवलेला पिझा ३० मिनिटे उशिरा येतो . आणि त्यामुळे फुकट मिळतो . कॅंटीन वाल्याने अगदी जीव ओवाळून टाकावा असा चहा केलेला असतो, आणि सोबत कांदा भाजी पण दिलेली असते नाश्त्याला . पण तरीहि ऑफिस मध्ये काही तरी चुकल्या सारखं होत होतं. मागचा सोमवार असाच गेला . नेहमी काही ना काही गोंधळ असलेलं ऑफिस . काहीच घडलं नाही सकाळ पासून . जास्ती काम हि नव्हतं , त्यामुळे मी हि गप आपल्या सिस्टम वर सिनेमा बघत बसलो होतो .

दस का बीस

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 22/05/2017 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
तारीख : अशीच कुठलीतरी वेळ : सकाळी पावणे नऊ/नऊ वा. ठिकाण : गडकरी रंगायतनचे अ‍ॅडव्हान बूकिंग काऊंटर 'साखर खाल्लेला माणूस' या नाटकाची अ‍ॅडव्हान बूकिंग सुरू व्हायची होती. सुरूवातीच्या चार-पाच ओळीत जागा मिळावी म्हणून थोडा धावत पळतच गेलो काऊंटरवर. रंगायतनच्या नियमाप्रमाणे सकाळी साडे आठला बूकिंग सुरू होते. मी तिथे पोचलो साधारण पावणे नऊ/ नऊ वाजता. काऊंटर ठेवलेला बूकिंग चार्ट पाहून आश्चर्याचा धक्का बसला, कारण 'A' पासून ते 'R' पर्यंतच्या सगळ्या सीट्स भरल्या होत्या.

सद्गुणाचा पुतळा बनतो विनाशाचा सापळा!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 22/05/2017 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त आहात? तुम्हीं शांत स्वभावाचे आणि मितभाषी आहात? सालस आणि आज्ञाधारक आहात? आणि त्यासाठी तुमचे कौतुक होत आहे? तर मग आजच सावध व्हा! ते कौतुक यासाठी आहे की तुम्ही तसेच सद्गुणाचे पुतळे राहावे म्हणजे जग तुमचे शोषण करू शकेल! तुमच्या अंगात ठाण मांडून बसलेला हा सद्गुणाचा पुतळा निर्धाराच्या घट्ट दोरखंडाने बांधा, एका भक्कम लोखंडी पेटीत टाका, पेटीला भलेमोठे इच्छाशक्तीचे लोखंडी कुलूप लावून ती पेटी हेलिकॉप्टरमधून मिसाईलला बांधून समुद्राच्या मध्यभागी खोल तळाशी भिडेल इतक्या जोरात फेकून द्या आणि चाबी वितळवून टाका.

सुखाची सावली ( लघुकथा ) ( काल्पनीक )

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 22/05/2017 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाची सावली ( लघुकथा ) ( काल्पनीक ) संध्याकाळचे सहा वाजत आले होते . राधाबाई आपल्या घराच्या दारापाशी उभ्या राहुन मोठ्या आतुरतेने शामरावांची वाट पाहात होत्या . थोड्याच वेळात समोरुन संथपणे चालत येणारी कोट , धोतर आणी डोक्यावर टोपी घातलेली शामरावांची मुर्ती त्यांना दिसली तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडला . त्या लगबगीने आत जाउन पाण्याचा तांब्या आणी भांडे घेउन आल्या . आता त्यांच्या मनातल्या उत्सुकतेची जागा एका काळजीने घेतली . शामरावांनी घरात येताच हातातला टिफीनचा डबा राधाबाईंकडे दिला . खुर्चीवर बसुन ते घोटभर पाणी प्यायले .

युएस कॅपिटॉल पूर्वार्ध

लेखक श्रीरंग_जोशी यांनी सोमवार, 22/05/2017 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही राहतो त्या राज्याचे (मिनेसोटा) अन शेजारच्या विस्कॉन्सीन राज्याचे स्टेट कॅपिटॉल पाहिल्यावर युएस कॅपिटॉल पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. या वर्षी युएस कॅपिटॉल पाहायचा योग जुळून आला. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चेरी ब्लॉसम फेस्टिवलच्या निमित्ताने वॉशिंग्टन डिसीकडे कूच केले. वॉशिंग्टन डिसी व भोवतालचा परिसर मेट्रो ट्रेनच्या जाळ्याने अतिशय उत्तमरीत्या जोडलेला आहे व तिथली सिटीबस सेवा देखील या मेट्रो ट्रेनला पूरक आहे.