Skip to main content

माराल काय तुम्ही तयांना ......

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी सोमवार, 29/05/2017 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
माराल काय तुम्ही तयांना हाती त्यांच्या समशेर आहे हात तुमचे बांधलेले क्षमा याचनेची आर्जव आहे निः शब्द मौनता तुमची कमाल आहे भ्याडपणाची त्यांनी किती कुरापती काढल्या परी षंढ तुमचा जागा आहे लाज असे तुमची तुम्हाला सभ्यतेतही भीड भरली काय तुम्ही कराल सामना अशा जनांचा वा मनाचा
काव्यरस

शामराव

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी सोमवार, 29/05/2017 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
बायको बाळंत झाली अन शामराव गायब झाला. कुणी म्हणायचं सोन्या चांदीची दुकानदारी शिकायला परराज्यात गेलाय. कुणी म्हणायचं राजस्थानात दिसला. आता शेठ झालाय. कुणी म्हणायचं त्यानं आता तिकडच बाई ठेवलीय. पण शामराव काय गावाला कधी नजरं पडला नाही. बायकोनं मात्र नुसत्या आठवणीवर पोटाची खळगी भरण्यासाठी गावाचा रोजगार करून पोरगा वाढवला. पुढ कधीतरी त्याच्या पोराचं लग्न पण झालं. शामरावला नातवंडे झाली. एव्हाना काळाच्या ओघात गाव शामरावला विसरून गेला. पण लेकानं न पाहिलेल्या बापाला शोधायसाठी सारी दुनिया पालथी घातली. बाप पाहिलेली भावकीतली लोकं घेऊन मैलोन मैल रल्वेने प्रवास केला.

प्राजक्त

लेखक पिशी अबोली यांनी सोमवार, 29/05/2017 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गातला प्राजक्त त्याने रुजवला म्हणे इथे.. आता तो कृष्णरात्रीत फुलवतो, आणि रात्र संपताच ढाळतो, ती फक्त फुलं?- का त्याच रात्रीत कृष्ण शोधणाऱ्या कुणा वेदनेची आसवं? हे त्याला-तिलाच माहीत ना?

ऋग्वेदातील सुविचार

लेखक माहितगार यांनी सोमवार, 29/05/2017 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
आमची हि प्रस्तावना वाचलीच पाहीजे असे नाही. मेघश्याम पुंडलिक रेगे ((मे.पुं. रेगे) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचे एक वाक्य आहे. "..जे पुस्तक आपण वाचलेले नसेल तरी आपण ते वाचलेले असणार अशी ज्याच्याविषयी आपली समजूत असते त्या पुस्तकाला अभिजात पुस्तकाचा (classic) दर्जा प्राप्त झालेला असतो असे म्हटले गेले आहे..." अशीच काहीशी स्थिती वेदांबाबतही होते का ? नुसताच उदो उदो किंवा नुसतीच टिका पण त्यात प्रत्यक्षात काय लिहिले आहे हे उघडून पहाणारे कमी आणि त्यातलाच मीही एक.

अख्खा मसूर

लेखक सविता००१ यांनी रविवार, 28/05/2017 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक मस्त आणि झटपट होणारा प्रकार केलाय.सगळ्यांनाच आवडलाय खूप. मग तो इथे द्यायलाच हवा ना? तर घ्या आता ;) वाढणी-३-४ व्यक्तींसाठी साहित्यः १ वाटी अख्खे मसूर, १ कांदा, १ टोमॅटो, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, १/४ वाटी सुके खोबरे किसून, १ टीस्पून तीळ, १ टीस्पून गोडा मसाला, १/२ टीस्पून धने-जिरे पावडर , १/२ टीस्पून गरम मसाला, १.५ टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, सजावटीकरिता बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी, फोडणीकरिता तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद. कृती: अख्खे मसूर ५-६ वेळा स्वच्छ धुवून कुकरमधून ४ शिट्ट्या काढून मउ शिजवून घ्यावेत.

माहेरचं 'माणूस'

लेखक भारी समर्थ यांनी रविवार, 28/05/2017 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
"आगं आक्का, खूप कामं आहेत गं ऑफिसात. दोघंजण सुट्टीवर आहेत." जनक काकुळतीला येऊन आक्काची मनधरणी करत होता. "जनु, कुणी नको सोबत. पण तेवढं सुरमंडीच्या गाडीत बसवून दे बाबा." "तिकडं तुझं कोण करणारे का काही? तो शशी स्वतःच्या संसारात नरडीपर्यंत बुडालाय. कधी साधा फोन नाय का हालहवाल विचारायची सवड नाय." "हं" "काल त्याचा फोन काय आला अन् लगीच तुला घाई झाली त्याला भेटायची. मला तर कधी तोंडदेखलंबी बोलत नाय की गावाकडं ये म्हणून." "काय होतय मग. मी काय झाकपाक घिऊन निघाले काय माझा? म्हातारी राहील घराच्या सांदीत दोन दिवस. परत येईन माघारी माझी मीच. काय भार नाय व्हायचा शशीला माझा." "बर ठीकाय.

ताणे-बाणे स्थल-कालाचे..

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 28/05/2017 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
अथांग धूसर भविष्य उडवी तुषार अविरत अधुनाचे(*) क्षणजीवी वर्तमान घडवी स्फटिक अहर्निश अतिताचे (**) उत्पत्ती अन स्थिती,लयाचे रहाट अविरत चालतसे स्थूल, सूक्ष्म, चेतन नि जडाचे पोहोरे माळुनी फिरत असे ताणे-बाणे स्थल-कालाचे तोलुनी धरिती विश्वाला जटिल,चतुर्मित रूप तयांचे गोचर केवळ गणिताला =============================== (*) अधुनाचे = वर्तमान कालाचे (**) अतिताचे = भूत काळाचे
काव्यरस

कॉफी मूस (Coffee Mousse)

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी रविवार, 28/05/2017 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक पटकन बनणारं , कमी साहित्य लागणारं आणि फार पसारा न करता मस्त इम्प्रेसिव होणारं एक डेजर्ट – कॉफी मूस. साहित्य ( ४ जणांसाठी) • २ अंडी • दुध २०० मिली (कोमट) • साखर ३० ग्राम • कॉफी पावडर १ चमचा (Decoction साठी ) • जिलेटीन १ चमचा (अंदाजे १० ग्राम) • विप्ड क्रीम १०० ग्राम • ४ छोट्या वाट्या अथवा सिलिकॉन साचे • एक भांडे व त्यावर ठेवता येईल इतपत आकाराचे भांडे . वेळ : • तयारीसाठी १५-२० मिनिटे • तयार करायला साधारण २५-३० मिनिट • फ्रीजिंग – २ तास (किंवा जास्त , गरजे प्रमाणे ) • १० मिनटे प्लेटिंग व प्रेजेन्टेशन कृती :

लट उलझी सुलझा जा बलमा

लेखक शरद यांनी रविवार, 28/05/2017 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
लट उलझी सुलझा जा बलमा बरेच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.पंडित भीमसेन यांचे गायन ऐकावयास गेलो होतो. त्यांनी सुरवात केली "चतुर, सुदरा बालमवा " . म्हटले "वा, हा चतुर बालम काय करतो ते कळले तर आपल्याला थोडे मार्गदर्शन होईल." पण कसले काय, तानांच्या जोरदार मार्‍यात पंडितजी काय म्हणत आहेत त्याचाच पत्ता लागेना.,बलमा राहिला बाजूलाच ! मग एकदा छॊटा गंधर्व यांची "न च सुंदरी करू कोपा" ची तबकडी ऐकत होतो. नारी मज बहु असती येथ पर्यंत गाडी ठीक चालली होती पण पुढे तानांच्या भेंडोळ्यात शब्दच कळेनात. पण आता ठरवले चतुर बलमा ची चीज शोधणे आपल्याला शक्य नाही पण नाट्यगीत तर मिळेलच की. मिळाले.

आधी नाकाने, मग जीभेने

लेखक सरनौबत यांनी रविवार, 28/05/2017 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
आधी नाकाने, मग जीभेने खाद्यपदार्थांची चव घेताना जीभ ह्या इंद्रियांच्या सिंहाचा वाटा असला तरी डोळे आणि नाक ह्यांचे देखील बरेच महत्व आहे. पुलं नि 'अपूर्वाई' मध्ये फ्रेंच जेवणाचे त्याच्या उत्कृष्ट प्रेझेंटेशन मुळे; 'आधी डोळ्यांनी, मग जीभेने' असे वर्णन केले आहे. भारतीय जेवणात देखील रंगसंगती आणि मांडणीचा विचार करून पान वाढण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे.