Skip to main content

एका माणसाचा कट्टा - फुडोग्राफी २०१७ भेट

लेखक अनुप देशमुख यांनी रविवार, 30/07/2017 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर – जास्त फोटो नसल्याने जळजळ होण स्वाभाविक आहे पण आयोजन कर्त्यांच्या नियमात बसत नसल्याने फोटो काढता नाही आले. तरी सुद्धा मिपा चे नाव वापरून जाण्याची खुण म्हणून चार दोन फोटो काढले आहेत ते गोड मानून घ्या आणि जमल तर प्रदर्शनाला जाऊनही या. मिपा, फोटोग्राफी आणि खाद्य अस आवडत त्रिकुट केदारभाऊंच्या पोस्ट मध्ये दिसलं आणि लागलीच फुडोग्राफी इव्हेंट फेबु कॅलेंडर मध्ये टाकून ठेवला. एका उनाड दिवस म्हणून ठरवूनच आज सकाळी उठलो आणि इतर काम उरकून भल्या दुपारी बालगंधर्वच्या गेटवर जाऊन थडकलो.

मनुस्मृति भाग २

लेखक शरद यांनी रविवार, 30/07/2017 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
मनुस्मृति भाग २ (७) अध्याय ७ (श्लोक २२६) सृष्टीच्या रक्षणासाठी ईश्वराने राजाची निर्मिती केली आहे. कार्यशक्ती, देश आणि काल यानुरूप राजाला वेगवेगळे रूप धारण कराए लागते. त्याच्या प्रसन्नतेत लक्ष्मी, पराक्रमात जय आणि क्रोधात मृत्यू वास करतो.

निलपक्षी

लेखक दशानन यांनी शनिवार, 29/07/2017 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
सगळे रंग विरळ होत होत सर्वत्र शुभ्रतेची चादर समोर पसरत होती, वेडावाकडा मार्ग तुडवत पुढे पुढे जात राहिलो, अनंत अडथळे बाजूला सारत. मनात प्रश्न नाहित ना कुठले विचार. प्रत्येक जिवाला उपजतच ज्ञान होते की, श्वेतवाळवंटाच्या राज्यात कुठेतरी एक झरा आहे, ज्याचे अमृतमय पाणी अक्षय आनंद देतं, चिरंजीवीत्व देतं. हा शोध माझा नाही आहे. प्रत्येक जीव ते अमृत मिळवण्याचा अनंतकाळापासून प्रयत्न करत आहे, अगदी पहिला एकपेशीय जीव ते स्वतंत्र बुद्धी असलेला हा मानव! सर्वांनीच याचा शोध घेतला, घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून निष्पन्न काय झाले माहिती नाही, पण एका गुणसुत्रातून दुसऱ्या गुणसूत्रात ही लालसा जीवागणिक पसरत गेली.

हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ

लेखक मार्गी यांनी शनिवार, 29/07/2017 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ हिंदी चित्रपटगीतांमधल्या काही गाण्यांमध्ये सापडलेला हा अर्थ आहे. हा अर्थ काहीसा व्यक्तिसापेक्ष आहे. एकाला जो अर्थ दिसेल, तो दुस-याला दिसेलच असं नाही. पण त्या गाण्याची पार्श्वभूमी, त्याचे चित्रण, त्याचे चित्रपटातील संदर्भ व आपण कोणत्या काळात ते गाणं ऐकलं, हे थोडं बाजूला ठेवलं तर खूप वेगळा अर्थ सापडतो. काही गाण्यांमध्ये तर पूर्ण धर्माचं सार आहे; काही गाण्यांमध्ये आध्यात्मिक जीवनदृष्टी आहे तर काही गाणी ही जणू गुरू- शिष्य नात्याच्या विविध छटा दाखवतात तर काही अध्यात्मिक दृष्टीची प्रचिती देतात.

BS ४ वाहने आणि त्यांचा सतत पेटलेला दिवा

लेखक हेमंतकुमार यांनी शनिवार, 29/07/2017 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
१ एप्रिल पासून ज्या नव्या BS ४ दुचाक्या बाजारात आल्या आहेत त्यांना पुढचा दिवा चालू/बंद करण्याचे बटनच नाही. त्यामुळे गाडी चालू केली की दिवसा पण दिवा सतत चालू राहतो. या BS ४ निकषामागचे कारण समजेल का? मला ही उर्जेची उधळपट्टी वाटते. भर उन्हाळ्यात अशा हजारो वाहनांचे दिवे दिवसा चालू असताना तापमान् वाढही होणार नाही का? जाणकारांनी खुलासा करावा. मूलभूत वाहन नियमांनुसार दिवसा दिवा लावणे याचा अर्थ " मला खूप घाई आहे, तेव्हा पुढे जाउ द्या" असा असतो. निदान मोटारींना तरी असे काही केले नसावे ही अपेक्षा.

आज केलेली खादाडी..!

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 28/07/2017 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आज केलेला व्यायाम च्या सुपरहिट्ट यशानंतर सादर आहे पुढील भाग.. आज केलेली खादाडी..!!!! (जुनी मिपाकरं - डोळे टवकारू नका, इथे फक्त खादाडीचेच फोटो असणार आहेत) तुम्ही घरी, बाहेर हॉटेलात, गडावर, प्रवासात कुठेही खादाडी केली असेल आणि ते मिपाकरांना सांगायचे असेल तर इथे सांगा. एखादे नवीन ठिकाण सापडले असेल किंवा तेथील एखादा पदार्थ विशेष आवडला असेल तर तसेही सांगा. मी सुरूवात करतो.. भांडारकर रस्त्यावर रेसीपी नामक ठिकाणी चिकन थाळी हादडली.

शामभट्टाची "युरोप" वारी .. इटली, स्वीस, फ्रान्स लेखांक ८

लेखक चौकटराजा यांनी शुक्रवार, 28/07/2017 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस ८ आमच्या युरोप सहलीचा आठवा दिवस उ़जाडला. २ मे २०१७. खरे तर भूतलावर न्यूझीलंड, व्हेनेझुएला, नॉर्वे शिवाय उत्तर ब्रिटन ई असे अनेक निसर्गरम्य देश आहेत. पण स्वीटझरलंड या लहानशा देशाचा नंबर खास करून भारतीय मनांत पहिलाच मानला पाहिजे. इंटरलाकेन हे तर भारतीयांचा स्वीसमधील अड्डाच म्हणावे लागेल.स्वीसमधे बर्न, लूझर्न, झुरीच, इंटरलाकेन, बाझेल व जिनेव्हा ई मोजकीच शहरे आहेत. आपल्या शहर या शब्दाच्या व्याख्येत कदाचित गावेच. पण बहुतेकाना एकापेक्षा अधिक रेल्वेटेशनांचा लाभ झालेला आहे व जवळ जवळ सर्वच ठिकाणी विमानतळ आहेत. स्वीसचे काही भाग केलेले आहेत.

समाधानाचे मुखवटे (भाग - २)

लेखक निशांत_खाडे यांनी शुक्रवार, 28/07/2017 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
समाधानाचे मुखवटे भाग - १ दुपारी साडे-बारा एक वाजायच्या सुमारासास बसवाल्याने समाधानाला रस्त्याच्या शेजारी फूटपाथवर सोडले, त्या फूटपाथला लागून पूर्ण अर्धवर्तुळ आकाराचे एक भले मोठे मोकळे मैदान होते. तो फूटपाथ आकाराने एवढा मोठा की होता त्यावर काही चहावाले, पानटपरीवाले यांनी स्वतःचे धंदे दारूची जाहिरात असणाऱ्या छत्र्यांखाली सुरु केले होते. इथेही मान्सून बहुतेक नुकताच सुरु झाला असावा, असा अंदाज समाधानने त्या मैदानावर नुकताच उगवलेल्या हिरवळीकडे पाहून लावला. वातावरण छानच होते, हलका-हलका पाऊस चालू होता, गडद राखाडी रंगाचे ढग. संथ, आरामदायक आणि थंड हवा.