Skip to main content

जीवाची सावली ....सलील कुलकर्णी

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 20/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
सलील कुलकर्णी हा केवळ गायक. संगीतकार नाही तर त्या बरोबर तो जे निरूपण करतो ते फार विचार करण्यासारखे असते .. हि त्याची मुलाखत नक्की बघा https://www.youtube.com/watch?v=uDVVpe2MRbE या शिवाय त्यांचे स्वतःचे यु ट्युब वरील "कवितेचे गाणे होताना" हा आर्यक्रम पण सुंदर आहे नक्की बघा थकलेला बाप हि कविता गाणे आठवत असले , त्याच पथंडीतले हे गाणे .. विषस म्हणजे याचा कवी सलील स्वतःच आहेत https://www.youtube.com/watch?v=r2I4oDckZic

बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 19/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
"बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?" प्रेरणा: मारवा ह्यांच्या 'दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम' ह्या धाग्यावरच्या धर्मराजमुटके ह्यांच्या 'प्रतिसादातील' लिंक वरील "बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी?" हि बातमी वाचत असताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि व्यावहारिक 'चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि काही तरुणांच्या समूहाने, एका चांगल्या हेतूने केलेल्या ह्या उदात्त कार्याविषयी जे व्यावहारिक प्रश्न पडले त्यांचा उह

अज्ञाताचे लेख

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 19/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा । अज्ञात झऱ्यावर रात्री, मज ऐकू येतो पावा ॥ -ग्रेस मित्रहो अशाच मनस्थितीत गेले काही दिवस चालले होते,चिडचिड होत होती.गदिमांच्या गीतरामायणा मधील प्रभू श्रीरामाच्या तोंडून वदवलेल्या प्रसिद्ध ओळी सांत्वन करण्यास कमी पडत होत्या. "खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा". 'मला भेटलेला कार्व्हर,'प्रभाते चारियासी जाये', 'पावगढ-चंपानेर 'असे तीन लेख अर्धवट लिहीले आहेत पण याच कारणास्तव पुर्ण होत नव्हते. काहीही करावेसे वाटत नव्हते.गाडी जवळ जवळ थांबल्यासारखीच म्हणायचे.

सद्दीत सुमारांच्या ह्या

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 18/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
जटिलाच्या दारावरती दुर्बोध देतसे थाप भेटीत उमजले दोघा, "उभयतांस एकच शाप सद्दीत सुमारांच्या ह्या उ:शाप नसे शापाला अस्वस्थ उद्याची हाक ऐकू ना येई कुणाला" दुर्बोध जटिलसे हसले दुर्बोधून जटिलही गेले अन् विषण्ण होऊनी दोघे आश्रयी कवीच्या गेले :)

शुष्क शब्दचित्र

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 18/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा चित्रगुप्त यांच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा... संपले का रंग तुमचे का कुंचले मोडले किंतान सोडून तुम्हीं अभासी चित्र का काढले? शब्द गुंत्यात भंजाळले , टकांळता कंटाळले का? रंगांत न रंगुनी, शब्द गुंत्यातून रंगीत चित्र कसे साधले? अभिजात कलागुण तुमचा का खुंटीवर टांगला? देवप्रज्ञा सोडून आपण कृ प्रज्ञा सवे खेळ का मांडला? ___________________________________ कल्पनेत मन दंगले कृबू ने ते साकारले लेवूनी शुन्य,एक साज अभासी चित्र ते रंगले शुष्क शब्दांच्या उड्या कल्पना सागरातल्या बुड्या रंग सारे दाटले तरीही नाही उमटल्या भावनांच्या खुणा. जाणतो सारे तरीही नवोन्मेषी गीत मी गातो रात्रीच्या स्वप्ना

'रमलप्रतिमा (भाग २) अर्थात नवीन काही AI चित्रे ( Prompt सह)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 17/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१) दिलेल्या चित्रांनंतर गेल्या काही दिवसात आणखी बरेच प्रयोग केले, त्यापैकी काही चित्रे: चित्र १. . चित्र २. . A cinematic view of a picturesque landscape featuring an ancient castle in greek architectural style.

दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम

लेखक मारवा यांनी सोमवार, 17/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
आज बकरी ईद चा सण आहे. मुस्लिम धर्मियांचा एक महत्वाचा सण याला इद-अल-अधा असे ही म्हटले जाते.या सणामागील परंपरा साधारण अशी आहे. विकीपेडीया मधुन् अब्राहमच्या जीवनातील मुख्य परीक्षांपैकी एक म्हणजे त्याच्या प्रिय पुत्राचा वध करण्याची देवाची आज्ञा स्वीकारणे आणि त्याचे पालन करणे. कथेनुसार, अब्राहमला स्वप्न पडत होते की तो आपल्या मुलाचा बळी देत ​​आहे. अब्राहामला माहित होते की ही देवाची आज्ञा आहे आणि त्याने आपल्या मुलाला सांगितले, जसे कुराणमध्ये म्हटले आहे,"अरे बेटा, मी तुझा वध करतोय असे स्वप्न मला पडत आहे".

देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी?

लेखक माहितगार यांनी शनिवार, 15/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाची चोरी? देशद्रोही दरोडेखोर भारतदेशाचे तुकडे करण्याचे भाषण स्वातंत्र्य मागत उड्या मारत मिरवून घेताना असे कुणि देशद्रोही दरोडेखोर माझा मुलगा मुलगी निघाले तरी उभ्या चितेवर चढवण्याची शिक्षा असावी एवढेही म्हणावयची देशप्रेमींनाच चोरी? देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी? - सात्विक संतत्प्त माहितगार

अरण्यऋषीचं वनोपनिषद

लेखक चक्कर_बंडा यांनी शनिवार, 15/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
'जंगलाचं देणं' जणु 'चकवाचांदणं' 'केशराचा पाऊस' ओते 'शब्दांचं धन' 'नवेगावबांधचे दिवस' जशी फुटे 'चैत्रपालवी' 'निळावंती' उलगडे तशी 'मृगपक्षीशास्त्रा'ची पोथी 'पक्षी जाय दिगंतरा' झाडांच्या कवेतून 'घरट्यापलीकडे' उभा 'रातवा' पाऊसथेंब पिऊन 'आनंददायी बगळे' करविती 'निसर्गवाचन' 'सुवर्णगरुड' झेपावे 'चित्रग्रीवां''च्या गर्दीतुन 'पक्षीकोश' उलगडतो 'पाखरमाये'ची गणितं 'मत्स्यकोशा'च्या जोडीने सुटे 'वृक्षायुर्वेदा'चं कोडं 'जंगलाची दुनिया' ही सारी 'रानवाटां'ची कहाणी अरण्यऋषीच्या साहित्यसोबतीने फळासं पावली... #चक्कर_बंडा रूढार्थाने ही कविता नाही तर एक प्रयोग आहे आपल्या आवडत्या साहित्यिकाच्या सर्व प्रकाशित तथा
काव्यरस

याझिदींसाठी प्रार्थना करा कि स्वप्नात त्यांना बायबलमधील देव भेटो!

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 13/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
इसीसच्या आत्मा आढळून आल्याची अधून मधून वृत्ते असतात तरीही त्यांच्या इराक मधील याझिदी मुर्तीपूजकांवरील जुलमांचे मुख्यपर्व संपल्याला जवळपास दहा वर्षे झाली. त्यांच्यावरील छळ काळात मिपावर एक धागा लेख लिहिला होता. इसीसचा हेतु याझिदी कुराणमधील देव स्विकारत नाहीत तो पर्यंत चक्कचक्क पराजित याझिदींचा गुलाम म्हणून वापर करणे होता, याझिदी स्त्रीया आणि कुटूंबांचे पुढे काय झाले?