Skip to main content

West Melbourne Marathi Ganeshotsav 2017

लेखक फिझा यांनी सोमवार, 28/08/2017 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
West Melbourne Marathi Ganeshotsav 2017 गोष्ट आमच्या गणेशोत्सवाची !!! "प्रथम तुला वंदितो , कृपाळा ........गजानना , गणराया .......". . हे शब्द सकाळी सकाळी रेडिओ वर ऐकून दिवसाची सुरुवात करून आणि तेच गाणे दिवसभर सारखं सारखं गुणगुणत; बालपण सरलेले आम्ही ! आता परदेशात येऊन काही वर्ष झाली तरी ,आपण आपलं “मराठीपण” विसरतो असा मुळीच नाही . आत्ताही हे गाणे कानावर पडले तरी आपला दिवस तसाच जातो . गजानना , गणराया म्हणत म्हणत ....... !!!

श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ३ : फोडणी पहावी टाकून, अर्थात 'संगीत गोईंग डच'

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 28/08/2017 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
एक "कैसा है?" मी मोठ्या उत्सुकतेने विचारलं. मित्राच्या गोरटेल्या आसामी चेहर्‍यावर कसेनुसे भाव आले होते. त्याने मान डोलावली आणि ब्रेडचा तुकडा तोंडात कोंबून घटाघट पाणी प्यायलं. अजून लैच मोठा टप्पा गाठायचाय याची जाणीव झाली. --- दोन सगळं स्थिरस्थावर असताना वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी परदेशात जाऊन उच्चशिक्षण घ्यावं अशी भलतीच कल्पना डोक्यात आली. घरच्यांना पटवणे, वेड्यावाकड्या वेळा असलेली नोकरी सांभाळून युनिव्हर्सिट्यांना अर्ज करणे, पैशाची चिंता वाहणे यात सहा महिने गेले.

बाप्पाचा नैवेद्यः गुरवळी

लेखक सविता००१ यांनी सोमवार, 28/08/2017 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले की लगेच यावेळी आणखी कोणता पदार्थ नैवेद्य म्हणून करता येईल याचा विचार मला वाटतं सगळ्याच घराघरांमधून चालू होतो. निरनिराळे मोदक, लाडू, यांबरोबरच अनेक प्रकारच्या पक्वांन्नांची यादीच मनात उमटत असते. यावेळी मिपासाठी काही नवीन पदार्थ देता येतो का याचा विचार करता करता अचानक लख्ख प्रकाश पडला की माझ्या मनात. वाटलं की आपल्या मराठी पदार्थांपैकी काही पदार्थ तर चक्क हल्ली माहीतही नाहीयेत फारसे कुणाला. त्यातलाच एखादा पदार्थ द्यावा की. तर ही घ्या आमच्या आजीची अशीच एक रेसिपी. आता हळूहळू विस्मरणात चाललेली...

मी आणि लालबागच्या राजाचे दर्शन

लेखक कुटस्थ यांनी सोमवार, 28/08/2017 04:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं यावर्षीसाठी. टीव्ही वरूनच घेतलं. परंतु टीव्ही वरून जेंव्हा त्याचं लोभस आणि गोजिरं रूप पाहिलं तेंव्हा मात्र नकळत का होईना मनातून नमस्कार केला. मुद्दामचं प्रत्यक्ष नाही गेलो. शेवटी गणपती हे परब्रह्माचच रूप. ते सर्वंकडे आहेच. अगदी आपल्याला सर्वात जवळ अश्या आपल्या शरीरात आणि मनातदेखील. अगदीच मनाचं समाधान होण्यासाठी शरीराने देवाचं दर्शन घ्यावे असं वाटलं मग कोणत्याही सध्या गणपतीच्या मंदिरात जिथे खरी मानसिक आणि आत्मिक शांतता लाभेल तिकडे जावे कि अत्यंत गर्दीमध्ये धक्काबुक्कीत राजाकडे जावे असा प्रश्न जेंव्हा मनात येतो तेंव्हा मन साहजिकच पहिल्या पर्यायाकडं झुकतं.

बाप्टिस्ट आणि बुटलेगर : सरकारी नियमनाची एक थेअरी

लेखक साहना यांनी रविवार, 27/08/2017 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्टिस्ट म्हणजे पाद्री आणि बुटलेगर म्हणजे हातभट्टीवाले. ह्या थिअरीचे लेखन अमेरिकेत दारूबंदी होता तेंव्हा अभ्यासकांनी केले म्हणून हे नाव पण आपल्या देशांत किंवा कामाच्या ठिकाणी हा प्रकार आपणाला सर्रास दिसेल. दारू शरीरास कशी अपायकारक आहे हे पाद्री आधी लोकांच्या मनावर बिंबवतो. वर्तमानपत्रातून लिहितो, राजकारणी मंडळींना सांगतो. जे लोक दारू पित नाहीत त्यांना तो जाहीर रित्या दारूबंदीचा पुरस्कार करायला सांगतो. जे लोक पितात ते सुद्धा जाहीर रित्या ह्याच्या विरोधांत बोलत नाहीत. राजकारणी मंडळी आपली पोळी भाजून घेण्यासाठी जनहितार्थ म्हणून दारूबंदी लावतात. आता दारू पिणारे लोक हातभट्टीवाल्या कडे जातात.

सामूहिक अधः पात

लेखक sudhirvdeshmukh यांनी रविवार, 27/08/2017 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
#सामुहीक_अध:पात एक काळ होता साधेपणा, विरक्ती, सभ्य भाषा व उदात्त विचारसरनी ही संतांची लक्षणे समजल्या जायची. आता त्याची जागा भपकेबाजी, पैश्याचे कीळसवाने प्रदर्शन, उग्र भाषा याने घेतली आहे. असे का झाले ? साधी, सरळ राहणी जगणाऱ्या व्यक्तीला पूर्वी समाजात मान होता. आताच्या काळात आपल्या समाजाचे सामुहिक स्खलन झालेले आहे. कुठल्याही मार्गाने धनाढ्य झालेल्या ऐतखाहू माणसाला समाजात जो पर्यन्त डोक्यावर घेतल्या जाईल तोपर्यन्त फक्त 'पैसा' हाच या समाजाचा धर्म राहील. अश्या अध:पात झालेल्या समाजात आदर्श म्हणून स्वीकारावे अशी लोकं अपवादानाचेच निर्माण होतील. आपले आदर्श जर चुकीचे असतील तर ती चूक आपली आहे.

ही

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 27/08/2017 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
ही नवनिर्मितीची अदभुत प्रयोजनकता ही उध्वस्ततेच्या दुख-या पाऊलवाटा ही हैवानाची क्रुर वासना ही मनोमिलनाची हळुवार संवेदना ही नग्न सत्यातील गुप्तता ही गुप्ततेतील गलिच्छ नग्नता ही आनंदपुर्तीचा हळुवार हुंकार ही बुजबुजलेल्या बाजारांचा भडिमार ही पुजनिय लिंगरुपी अवतार ही ब्रह्मचर्याचा अनोखा अविष्कार
काव्यरस

श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक २ : क्ष

लेखक तुषार काळभोर यांनी रविवार, 27/08/2017 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
क्ष. माझा चौथीपासूनचा मित्र. खरं तर तो आमच्या वर्गात आहे, हे सातवीला गेल्यावर कळलं आणि आठवीला आमची ओळख चांगली झाली. मित्र म्हणावा इतपत. हडपसरला एका झोपडपट्टीत पत्र्याच्या दोन खोल्यांचं घर. घरात आई, वडील आणि क्षचे दोन भाऊ. आई दोन-चार घरी घरकाम करायची. वडील लोकसेवा हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर पोतं टाकून चपला व बूट शिवायचा व्यवसाय करायचे. मोठ्या भावाने सहावी-सातवीनंतर शाळा सोडलेली, तो एका गवंड्याच्या हाताखाली जायचा. आमच्या शाळेत चौथीच्या व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं खूप महत्त्व असायचं.