Skip to main content

बोलशील तर मरशील...

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 06/09/2017 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
बंदुकीची गोळी कशी गोल गोल गोल गोल रक्ताचा रंग कसा लाल लाल लाल लाल सोनू, तू माझ्याशी नीट बोल नीट बोल.... पैशाचा झोल कसा गोल गोल गोल गोल सत्तेचा माज कसा खोल खोल खोल खोल सोनू, तू माझ्याशी नीट बोल नीट बोल.. सोनूची केस कशी वायलंट वायलंट सोनूचा आवाज कसा सायलंट सायलंट सोनू, बोलशील तर मरशील मरशील..... सोssssनूssss शिवकन्या #GauriLankesh etc....

कंगना राणवतची मुलाखत आणि भारतीय स्त्रीवाद

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 05/09/2017 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या संपूर्ण देशामधे कंगना राणावतच्या मुलाखतीच्या निमित्ताने वादविवाद आणि चर्चा सुरू आहेत. स्पष्ट सांगायचं तर एखादी महिला पुढे येऊन आपल्या आयुष्यातल्या वादग्रस्त भागावर प्रकाश टाकते तेव्हा अनेक शौकिनांना चघळायला एक विषय मिळतो. पण शौकीन स्पष्टपणे ते कसे मान्य करणार.

मोबाईल पाण्यात पडल्यास काय करावे?

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 05/09/2017 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम हा धागा चुकीच्या ठिकाणी असल्यास क्षमस्व. सदाहरित धागा गूगल वर शोधून बघितला पण सापडला नाही. तसेच प्रश्नोत्तरे सदरात Access Denied असे लिहून आले. काल मोबाईल( मोटो जी ४+) पाण्याच्या बाटली जवळ ठेवला होता. अचानक बाटलीला धक्का लागून पाण्याने मोबाईलला अंघोळ घातली. त्यानंतर मी पहिली चूक (मोबाईल सुरु करून पाहणे) केली. फोन सुरु होत नव्हता. त्याला कोरडे केले. ड्रायर ने वाळवण्याचा प्रयत्न केला. शेवटी तांदुळात ठेऊन दिला. संध्याकाळी दुसरी चूक केली ती म्हणजे चार्जिंगला लाऊन पाहणे. आज सर्विस सेंटर ला घेऊन गेलो. एक तास वाट बघायला लावल्यावर त्याने ७५०० लागतील असे सांगितले.

बाप्पाचा नैवेद्य : खवा-पिस्त्याचे मोदक

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 05/09/2017 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी खवा १/४ वाटी पिस्ते सालं, काढून, ४-५ चमचे दुधात घालून मिक्सरला वाटून घेणे अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्तं पिठीसाखर १ चमचा वेलचीपूड खायचा हिरवा रंग २ थेंब (ऐच्छिक) चांदीचा वर्ख (ऐच्छिक) साजुक तूप मोदकाच्या साच्याला लावण्यापुरतं कृती: नॉन-स्टीक पॅनमध्ये खवा मंद आचेवर परतून घ्यावा. त्यातच पिस्त्याची पेस्ट घालून तूप सुटेपर्यंत परतणे. आता त्यात खायचा हिरवा रंग, पिठीसाखर घालून मिश्रण गोळा

मला आलेला अनुभव -१

लेखक ओरायन यांनी मंगळवार, 05/09/2017 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण ३ वर्षांपूर्वी घडलेली ऐक घटना. मला त्या दिवशी कंपनीत काही कामानिमित्य लवकर सकाळी जायचे होते. त्यामुळे मी कंपनीच्या नेहमीच्या बससाठी न थांबता बाइकवरून जाण्याचे ठरविले. चिंचवड ते मरकळ असा रूट होता. आदल्या दिवशीच नवीन हेल्मेट आणले होते. ते परिधान करून मी निघालो. ऑटो क्लस्टर च्या चौकात आलो. आता तिथे बरेच बदल झाले आहेत. त्यावेळेस तिथे ट्रॅफिक सिग्नल पण नव्हते. परंतु त्यावेळी समोरून येणारा काटकोनातील रस्ता पूर्ण दिसतं नसे. बाईक चा वेग ७० ते ८० च्या घरात होता. चौकात आलो. समोरून काटकोनी रस्तातून त्याच वेळी एक वेगात मारुती कार चाललेली होती. ... एक क्षणात मनात विचार आला कि थांबावे ..

यांगोंमधलं श्री. मोदी यांचं भाषण : भाग १

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 05/09/2017 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
जून २०१६ मध्ये मी यांगोंला आले. तेव्हापासून दोन वेळा इथल्या भारतीय दूतावासात जाणं झालं. २०१६ चा स्वातंत्र्यदिन समारंभ आणि २०१७ चा प्रजासत्ताक दिन समारंभ या निमित्ताने जाणं झालं होतं. बाकी तसा माझा दूतावासाशी काही संबंध येत नाही. दूतावासाला फेसबुकवर ‘लाईक’ केलं होतं, त्यामुळे घडामोडी कळत राहतात. ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात कधीतरी ‘पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी म्यानमा भेटीवर येत आहेत आणि यांगोंमध्ये ते जनतेशी संवाद साधतील’ असं फेसबुकवर कळलं. ‘अधिक माहितीसाठी दूतावासाशी संपर्क साधावा’ असंही एक आवाहन जाहीर झालं.

वस्तरा हरवला आहे म्हणून

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 05/09/2017 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
माझा वस्तरा हरवला आहे म्हणून उगाच रडण्याभेकण्याचे नाटक कुणी करू नये तसंही चंद्राला भिंगातून पाहताना मला ओतावे लागते घागरभर पाणी मग छाटलेली काठी घेऊन हाकारावी लागतात गाढवं मैलोनमैल बघून घेईन मी एकेकाला ज्यांनी पळवले आहेत माझे रद्दीचे पेपर पेन्सिलीला टोक करून माझी शेवींग क्रीम पळवली आहे ज्यांनी कॅलेंडरवर लिहिलीय मी त्यांची तारीख आता चाललोच आहे तर जरा फाट्यावर जाऊन येतो बाकी वस्तरा हरवला आहे म्हणून रडण्याभेकण्याचे नाटक कुणी करू नये -रानातला वेडा

सेकंड लाईफ - भाग ७

लेखक अक्षरमित्र यांनी मंगळवार, 05/09/2017 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वीचे भाग : सेकंड लाईफ सेकंड लाईफ - भाग २ सेकंड लाईफ - भाग ३ सेकंड लाईफ - भाग ४ सेकंड लाईफ - भाग ५ सेकंड लाईफ - भाग ६ ------------------------------------------------------------------------------------------------- दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफीसला गेलो.