Skip to main content

घननीळ वाजवी बासरी

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 07/09/2017 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
ये पुन्हा, छेदून ये त्या काल-पटलाला, इथे ये जरा, समजावया ही शब्दविरहित भाषिते ये जरा, स्पर्शून पुन्हा अद्भुताची ती मिती जी दिसे स्वप्नात सरत्या जागृतीच्या शेवटी ये इथे, ऐकू पुन्हा, घननीळ वाजवी बासरी चल पुन्हा, बरसून येऊ तप्त मरूभूमीवरी
काव्यरस

भू-भू भुंकणारे कुत्रे

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 06/09/2017 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
कुत्र्यांची एक खासियत असते, कुणीही दिसले कि भुंकणे सुरु. एखादा हत्ती सारखा मोठा जनावर दुरून येताना दिसला कि यांचे भू-भू सुरु झालेच समजा. पण जसा-जसा तो जनावर जवळ येईल. कुत्रे भुंकणे सोडून शेपटी टाकून दूर पळून जातात. कुन्त्र्यांचा स्वभावच दुसरे काय. पण कधी एखादा हत्ती स्वकर्माने जमिनीवर पडला कि मग काय म्हणता राव झुंडीच्या झुंडी कुत्र्यांच्या एकत्र होऊन जमिनीवर पडलेल्या हत्ती वर तुटून पडतात. काही क्षणात सर्व कुत्रे मिळून हत्तीच्या शरीराच्या चिंध्या-चिंध्या करतात.

शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे -१

लेखक माहितगार यांनी बुधवार, 06/09/2017 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
हि धागा मालिका शुद्धलेखनवादी ट्रोलांसाठी नाही. शुद्धलेखन समर्थक चर्चा या धाग्यात टाळून सहकार्य करावे, हि विनंती वाचूनही मनमोकळे करण्याची इच्छा झाल्यास शुद्द्धलेखनप्रियकर मिपाकरांच्या या धाग्यावर जावे. ज्यांना शुद्धलेखन नियमात विधायक सुधारणा व्हाव्यात असे वाटते त्यांनी बिरुटे सरांच्या या धाग्यावर आपली मते नोंदवावीत.

सुके प्रॉन्स / कोळंबी मसाला .

लेखक पियुशा यांनी बुधवार, 06/09/2017 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
कोळंबी मसाला .. मी शुद्ध शाकाहारी न नवरा पक्का मांसाहारी आहे :( म्हणून असे उपदव्याप करायला शिकतेय हळूहळू कोळंबीला कधी हात हि न लावलेली मी ,शेंडा कोणता न बुडुख कोणते न कळणारी मी, हे सहज बनवू शकते तर कोणीही बनवू शकेल नक्किच :) साहित्य : सुके प्रॉन्स / कोलंबी ( मी एक डिश भर घेतल्यात ) ३ सुक्या बेडग्या मिरच्या ५-६ लसूण पाकळ्या आले तुकडा एक इंचभर चिंच एक बुटुक ओला नारळ - १ वाटी टॉमॅटो बारीक चिरून -अर्धी वाटी कांदा बारीक चिरलेला - अर्धी वाटी हळद अर्धा छोटा चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा कोथिंबीर सजावटीला मीठ चवीपुरते कृती : ड्राय कोलंबी तव्यावर कोरड्या भाजून घ्याव्यात , त्याच

विद्यार्थ्यांनो...

लेखक पुंबा यांनी बुधवार, 06/09/2017 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
देव, गुरू आणि पालक चिकित्सेच्या पलिकडले आहेत, त्यांना कुठलेही प्रश्न विचारू नयेत, जसे असतील तसे स्विकारावेत. त्यांच्यात दोष असू शकत नाहीत हे मुकाट्याने मान्य करा. जे जे हे सांगतील ते ते नैतिक, महान, अंतिम सत्य, तुमच्या शंका, तुमचे आक्षेप म्यानबंद करून त्यांच्या वाटेने चालू पडा. तुम्हाला दिसू शकतील वेगळ्या वाटा, कुठल्यातरी निराळ्याच सत्याची छोटी शलाका, आम्ही त्याचा बंदोबस्त करू व्यवस्थीत, तुम्ही फक्त ही लेटेस्ट टेक्नॉलॉजीची झापडं बांधा. देव, गुरू, पालक यांचे मातीचे पाय दिसले कधी चुकून जरी तरी तेच पुनःपुन्हा पुजा. तुम्ही सगळे असे प्रश्न न विचारणारे, गुणवान, कधीही बंड करण्याची शक्यता नसणारे व्हाल
काव्यरस

कथा एका कट्ट्याची

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 06/09/2017 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी एका खासगी संस्थेत नोकरीस होतो. संस्थेच्या स्थापनेपासूनच मी तिथे गेलो. यथावकाश तिथे स्थिरावलो. कामाचा व्याप हळूहळू वाढत होता. अनेक सहकारी लाभले होते. सुरवातीच्या एकदोन वर्षांत आम्ही उत्साहाने व जोमाने काम करीत होतो. तेव्हा तेथील व्यवस्थापनाची आमच्याशी वागणूक बरी होती. हळूहळू संस्था विकसित झाली तसेच आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली. आता मात्र व्यवस्थापनाने त्याचे खरे रूप दाखवायला सुरवात केली. सर्वसाधारण नोकरदारांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा आम्हाला जाणीवपूर्वक दिलेल्या नव्हत्या. व्यवस्थापन आमच्याशी चर्चेस उत्सुक नसायचे. क्वचित झालेल्या चर्चा निष्फळ ठरत.

बरं एवढं नि उगीच थोडं ..

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 06/09/2017 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
‘ए आई, दूध गरम करायचंय, मापाचा ग्लास कुठेय ?’ माझा मुलगा विचारतोय. ‘अरे, कशाला हवा ग्लास ? हे एवढं घ्यायचं !’ मी दुधाच्या पातेल्यातून लहान भांड्यात पटदिशी दूध ओतून दिलं. गरम झाल्यावर मुलानं ग्लासात ओतलं. बरोब्बर मापात ! ‘आई, तुला कसं गं समजतं, केवढं घ्यायचं ते, न मोजता ?’ बरोब्बर तीस वर्षापूर्वी मी माझ्या आजीला हाच प्रश्न विचारलेला ! आजी मला गरगट्टं करायला शिकवत होती तेव्हा !! आजी माझी, सुगरण. तिच्या बोटातून रसवंती झरायची. तिच्या हातचं पिठलं आणि गरगट्टं खायला देवांना अमृत सोडून स्वर्गातून खाली उतरावं लागत असे ! गरगट्टं म्हणजे डाळ, चिंच आणि आख्खे शेंगदाणे घातलेली घट्टसर सरसरीत पालेभाजी.

एक संध्याकाळ..

लेखक दिपक लोखंडे यांनी बुधवार, 06/09/2017 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
" अहो ऐकताय ना?.." " नाही.. कानात तेल ओतलयं मी.." " काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी.." " अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का?" " ओ.. झोपताय काय?.. आज काय आहे माहीत आहे ना?" " काय आहे?..." " अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे.." " मग?.." " मग काय?.. चला ना जाऊया आपण पण.." " छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण?.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा.." " काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी.." " बरं मग, तू जाऊन ये " " मी एकटी नाही जाणार.." " मग सोड ना, काय बिघडणार आहे.. लग्नाला तर जाणारच आहे ना आपण.." " पण?.." " हे बघ राधा..