Skip to main content

निरोपाची आठवण

लेखक प्रतिक कुलकर्णी यांनी गुरुवार, 14/09/2017 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
फायनल इयर हा कॉलेजलाईफ मधला एक वेगळाच काळ असतो. सीनियर्सना फेयरवेल देऊन झाली कि, आपलाही शेवट जवळ आल्याची जाणीव होऊ लागते. आयुष्यभर पुरतील अशा आठवणी पटापट जमा करण्याचा असा का काळ. सगळ्यांना मैत्रीचचं भरत येत असत. गेल्या तीन वर्षांमध्ये निर्माण झालेल्या ऋणानुबंधांची खास काळजी घेतली जाते. लांब गेलं तरी तुटू नये म्हणून त्यांना अगदी घट्ट करण्याचा प्रयत्न नकळतपणे चालू असतो. वर्गात अभूतपूर्व एकी निर्माण होऊ लागते. सगळे वेगवेगळे ग्रुप्स एकत्र येऊन, एकच मोठ्ठा ग्रुप तयार होतो. कॉलेजच्या पार्किंगमध्ये रेंगाळण वाढत. दर चार दिवसाआड कुठेना कुठे जायचे प्लॅन्स ठरत असतात.

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ६

लेखक जुइ यांनी गुरुवार, 14/09/2017 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५ आज काही मॉन्युमेंट्स पाहावी असे ठरवले होते. त्याप्रमाणे वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेने कुच केले. आजही हवेत गारवा जाणवत होता. सतत चालत राहिल्यामुळे खूप जाणवत नव्हते.

मिठी

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 14/09/2017 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
समोरंच एका मुलीनी मुलाला मारलेली निर्व्याज मिठी बघून वाटलं "सालं, आपल्यावेळी नव्हतं असं काही" आताही ती असती अन तिन हे बघितलं असतं तर हळूच हसंत म्हणाली असती "आपल्यावेळी नव्हतं बाई असं काही" मी उगाचंच आठवणींच्या गर्तेत.. दूर उडून चाललेल्या सावरीच्या कापसाच्या म्हातार्‍या पकडू पाहतोय मनांत पूर्वीच्याच अल्लडपणे.

संघर्ष : भाग ०२

लेखक दिपक लोखंडे यांनी बुधवार, 13/09/2017 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०१ पासून पुढे. राधा घाईघाईने खाली उतरून लगेच घरासमोर उभ्या असलेल्या रिक्षात बसली तिने रिक्षा चालकाला पत्ता सांगितला तिचे डोळे अजूनही डबडबलेले होते. तोच राधाचं लक्ष आपल्या मोबाईलकडे गेलं अनिकेतचा फोन होता. खरंतर राधा त्यावेळी कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नव्हती तरी तिने एक मोठ्ठा श्वास घेऊन फोन कानाला लावला. ‘हॅलो.’ दबक्या आवाजात राधा म्हणाली. ‘हॅलो राधा.

भूनंदनवन काश्मीर – भाग ५ (गुलमर्ग-मुघल गार्डन्स)

लेखक के.के. यांनी बुधवार, 13/09/2017 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
भूनंदनवन काश्मीर – भाग ५ (गुलमर्ग-मुघल गार्डन्स) ==================================== भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४ ==================================== हा भाग टाकायला जरा उशीरच झाला. .

सोने : चकाकती प्रतिष्ठा !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 13/09/2017 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
सराफांच्या दुकानांमध्ये सोनेखरेदीसाठी झालेली झुंबड जर आपण पाहिली, तर क्षणभर ‘भारत हा गरीब आणि विकसनशील देश आहे’ या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सोन्याचे वेड हे प्राचीन असून समाजातील सर्व स्तरांमध्ये कमीअधिक प्रमाणात आढळतेच. अर्थातच हे वेड स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अलंकार परिधान केल्याने स्त्री- सौंदर्याला उठाव येतो हे खरे; पण ते अलंकार महागड्या सोन्याचेच हवेत या अट्टाहासातून अखिल स्त्रीजातीची दोन वर्गांमध्ये सरळसरळ विभागणी झालेली दिसते.

महाबडबडगीत

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 13/09/2017 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
वस्त्र ढगांचे धुवून सागरी वाळत घालीन व्योमी धग सूर्याची परिटघडीला येईल माझ्या कामी कधि चंद्राचा घेउनी चेंडू करेन क्रीडा गगनी चांदणमेवा थोडा थोडा चाखिन अधुनी मधुनी प्रकाशवर्षांचे अंतर मी तोडिन प्रकाश वेगे अंतरिक्ष लंघून संपता कशास येईन मागे? भव्य स्वप्न हे माझे कधितरी येईल का सत्यात? ठाऊक नाही, पण तोवर मी झोपून पाहीन वाट!