Skip to main content

आपण IDIOT झालो आहोत का?

लेखक kool.amol यांनी सोमवार, 08/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच डॉक्टर्स डे साजरा झाला. डॉक्टर लोकांविषयी आपल्याकडे सर्व प्रकारच्या भावना आणि मतं आहेत. मी स्वतः डॉक्टर नाही. डॉक्टर होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक गुणवत्ता मी सिद्ध करू शकलो नाही पण माझे मित्र, मैत्रिणी आणि काही नातेवाईक डॉक्टर आहेत. मी जिथे काम करतो त्या टिम मध्ये मी सोडून सगळे डॉक्टर आहेत त्यामुळे ह्या क्षेत्रातल्या बातम्या, चर्चा रोज कानावर पडत असतात. त्यामुळे माझ्याकडे ह्या क्षेत्रातील थोडी माहिती असते. काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकारी मैत्रिणीकडून कोणाचा तरी उल्लेख IDIOT syndrome चा बळी असा करण्यात आला.

"प्रेतात्म्यांची जत्रा" एक सिने परीक्षण.

लेखक भागो यांनी सोमवार, 08/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
कार्निवाल ऑफ सोल्स हा एक विचित्र, अविस्मरणीय आणि विशेष म्हणजे अत्यंत कमी खर्चात बनवलेला भीती चित्रपट आहे. ही चर्चमध्ये ऑर्गन वाजवणाऱ्या एका स्त्रीची करूण कहाणी आहे. (चित्रपटात नायक नाहीये. ह्या नायिकेच्याच भोवती हा चित्रपट बेतला आहे.) तिला एका अमानवी चेहेऱ्याने पछाडले आहे. नायिका नुकतीच एका जीवघेण्या अपघातातून वाचली आहे. मरणारच होती पण वाचली. मोटारगाडीतून मैत्रीणींबरोबर प्रवास करताना तिची गाडी पुलाचा कठडा तोडून नदीत पडते. हा ह्या चित्रपटातील सुरवातीचा सीन आहे. सुरवात बघताना प्रेक्षकाला अशी भावना वाटते कि ह्या प्रिंटमध्ये काहीतरी गडबड आहे. आपण मधूनच सिनेमा बघत आहोत.

कृष्णाच्या गोष्टी-६

लेखक Bhakti यांनी रविवार, 07/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
*बलराम कृष्ण हरी शिक्षण A बालपण आणि किशोर अवस्था ही नंदाघरी गोकुळात गेले.

पहिलं प्रेम

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 06/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पहिलं प्रेम ------------ तो बारमध्ये शिरला. एकटाच. रात्री उशिराची वेळ. रस्त्यावरची गर्दी मंदावलेली. आठवड्याच्या मधला दिवस. त्यामुळे आतही गर्दी कमी. त्याने अगदी कोपऱ्यातलं एक टेबल धरलं आणि तो आत सरकून भिंतीच्या आधाराने बसला. त्याला आधाराची गरज वाटत होती. त्याने ऑर्डर दिली. पेगमध्ये कोल्ड्रिंक ओतल्यावर ग्लासच्या काचेवर पाण्याचे नाजूक थेंब जमा झाले. अन तस्सेच त्याच्या डोळ्यांतही. त्याचं सुरु झालं . थोड्या वेळाने एक वयस्कर माणूस आला. त्याच्याजवळ आला. “बसू का ?” त्याने विचारलं . “बसा “ , हा म्हणाला . तो बसला. वेटरने त्याची ऑर्डर आणून दिली. न सांगताच. याच लक्ष नव्हतं. अर्थातच तोही एकटा होता. शांत.

“साहेबांचा ताजमहाल”

लेखक rahul ghate यांनी शनिवार, 06/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिस चे किस्से उत्पादन क्षेत्रा मध्ये कामगार, माथाडी अश्या बऱ्याच घटकांचा सहभाग असतो , तसेच कनिष्ठ / वरिष्ठ व्यवस्थापक वर्ग पण खालून वर बढती घेत घेत आलेला असतो , त्यामुळे राहण्या , वागण्या, बोलण्यात थोडा अघळ पघळ पणा दिसतो, IT सारखा अत्याधुनिक कृत्रिम वातावरण नसते . अश्या वातावरणातून काही अफलातून किस्से घडतात , अशेच काही किस्से सादर करण्याचा मानस आहे.

रॉय !!!

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 06/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
घर सोडून आता तब्बल अठ्ठावीस तास उलटले होते. तीन लांबलचक विमानप्रवास आणि वीट आणणारे त्यातले स्टॉप ओव्हर्स सोसून हातपाय दगड झाले होते. अडीच-तीन तासांचा बस प्रवास अजूनही शिल्लक होता. पुराणकाळात नारद-मुनिंना अवगत असलेल्या टेलीपोर्टेशनचा शोध अजून का बरं कुणाला लावता येऊ नये. “नारायण-नारायण!!!” म्हणत अगदी तिन्ही लोकांत नाही तरी निदान पृथ्वीलोकांत कुठेही लीलया जाऊ शकण्याची किमया विज्ञानाला लवकरच साधता यायला हवी. तिकिटाच्या रांगेत माझ्या मागे उभा असलेला एक मोरक्कन आणि त्याच्यामागच्या दोन जॅपनीज तरुणी यांचीही गत माझ्यापेक्षा फार काही वेगळी नाही हे त्यांचेही थकले भागले चेहरे स्पष्टच सांगत होते.

केरळ कन्याकुमारी लेखमाला : पूर्वतयारी

लेखक श्वेता२४ यांनी शुक्रवार, 05/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.

     नमस्कार. खूप दिवसांनी मिसळ पाववरती येत आहे. निमित्त आहे आमच्या केरळ-कन्याकुमारी भटकंती लेखमालेचे....... खूप दिवसापासून केरळ माझ्या बकेट लिस्ट मध्ये होते. मिपावर केरळ वरती अनेक लेख आहेत. तसेच युट्युब वरती सुद्धा केरळ बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. माझ्या सासूबाई वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाल्या. त्यांना कुठेतरी फिरायला जायचे होते. आपण सर्वजण कुठल्यातरी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाऊयात याबाबतचे तू नियोजन कर असे सासूबाईंनी मला सप्टेंबर मध्ये सांगितल्यामुळे माझा आधीच तयार असलेला केरळ प्लान त्यांना सांगितला आणि आमचे दिवाळीनंतर केरळला जायचे निश्चित झाले.

२०१४ आधी आणी नंतर

लेखक पॅट्रीक जेड यांनी शुक्रवार, 05/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पडले पूल, पडले छत, २०१४ आधी पडत नव्हते का? मेले लोक चेंगराचेंगरीत, २०१४ आधी मरत नव्हते का? समस्या जुनी, पण आवाज नवा, कोण बदललं, कोण विचारेल का? चुकीच्या हातात सत्ता दिली, कळलं नाही, कोण भुललं का? नवीन वाद, जुने प्रश्न, उत्तरं मात्र राहिली तशीच. स्वप्न दाखवून, फसवणूक झाली, झाली चूक, जनता न शिकली. विचार करावा आपण, मंथन करावे, काय फरक, काय बदल घडले? दोष देऊन संपत नाही काही, दोष काढून, काम चालले. पडले पूल, पडले छत, २०१४ आधी पडत नव्हते का? सर्व मिळून शोधू उत्तर, की बदल खरोखर घडले का?

कारलं माझ्या आवडीचं!

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 05/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
जगातील सगळं सुख एकीकडे आणि परफेक्ट कारल्याची भाजी करण्याचं सुख एकीकडे!!

मंडपेश्वर लेणी, दहिसर

लेखक गोरगावलेकर यांनी बुधवार, 03/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात असूनही थोड्याश्या अपरिचित असलेल्या दोन लेण्यांना गेल्या वर्षी भेट दिली होती. आंबोली लेणी आणि कोंडिविते लेणी (जोगेश्वरी लेणी आणि महाकाली लेणी) अशाच एका तिसऱ्या लेणीला गेल्या आठवड्यात भेट दिली ती म्हणजे दहिसर (प) येथे असलेली मंडपेश्वर लेणी. सहाव्या शतकात निर्माण झालेले हे एक बौद्ध लेणे.