Skip to main content

करंज्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/11/2019 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी दिवाळीत करंज्या करायच्या नाहीत असे ठरवले आहे मुलीची कारखानीस नावाची सी के पी मैत्रीण आहे तिच्याशी बोलणे झाले आहे कानवले ही खास सी के पी डेलिकसी आहे कानवले--वालाची उसळ -गोळ्यांचं सांभार -हिंग बडीशेप मिश्रित चिकन मटण रस्सा -हि सी के पी खासियत तिच्या मार्ग दर्शनाखाली कानवले करण्याचा प्लॅन आखला आहे खूप मेहनतीचं कौशल्याचं अन नाजूक प्रकरण आहे कानवले करणे श्री समर्थ आहे कार्य सिद्धीस नेण्यास ..

"आप्पा कुलकर्णी"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/11/2019 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्या सोसायटीत रहातो तिथे "आप्पा कुलकर्णी" नावाचा एक सदस्य रहातो..आमचे ३५-४० वर्षाचे संबंध आहेत आप्पा व त्याचे मित्र गेली अनेक वर्षे एक उपक्रम दिवाळीत राबवतात.. तो म्हणजे स्मशानात काम करणारे जे कर्मचारी आहेत त्याना "दिवाळी फराळ" वाटप मृत्यु काळ वेळ दिवाळी दसरा पहात नाहि.. कर्मचा-याना ना दिवाळी ना दसरा... आप्पा व मित्र हे काम वर्षानु वर्षे करत आहेत.. ना गवगवा ना चमकेगीरी... सलाम

भरली वांग्याची भाजी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/11/2019 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला नोकरी लागेपर्यंत घरची परिस्थिती बेताची होती आई खूप सुगरण होती -तिने "भरली वांग्याची भाजी केली -मस्त झाली होती पुन्हा आईला म्हणालो ते तसली वांग्याची भाजी कर ना तिने केली पण चव ठीक नव्हती -मी आईला म्हणालो भाजी पहिल्या सारखी नाही झाली आई म्हणाले अरे महिना अखेर आहे तेल संम्पत आले आहे त्या मुळे तेल कमी वापरले मी काहीच बोललो नाही नोकरी लागली पहिला पगार झाला अन तिला त्या काळातला फेमस ब्रॅंड पोस्टमन रिफाईंड तेला चा डबा आणून दिला तिला खूप भरून आले -व तिने जवळ घेऊन केसावरुन मायेनं हात फिरवला

कविता : भेट मित्रांची…

लेखक bhagwatblog यांनी मंगळवार, 05/11/2019 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींना उजाळा भावनांचा उमाळा शब्दात जिव्हाळा दोस्तीचा सोहळा…. भेट मित्रांची… मित्रांची सतत मस्ती कधी मस्तीची सक्ती सख्याची जीवापाड दोस्ती कधी दोस्तीत कुस्ती…. भेट मित्रांची… मित्र कमी बोलणारा परी डोळ्यात जपणारा दोस्त शब्दात खेळणारा पण शब्दासाठी धावणारा…. भेट मित्रांची…

बुरहानपूर आणि महेश्वर - २ (अंतिम)

लेखक एक_वात्रट यांनी सोमवार, 04/11/2019 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस तिसरा - ०१ जून सकाळी सगळे आवरून आणि सामान गाडीत टाकून आम्ही निघालो. आजचा पहिला थांबा होता ‘दर्गाह-ए-हकिमी’. दाऊदी बोहरा संत ‘अब्दुल कादीर हकीमुद्दीन’ यांना ज्या ठिकाणी दफन केले गेले ती ही जागा आहे. जगभरातून दाऊदी बोहरा समाजाचे लोक या दर्ग्याला भेट द्यायला येतात. इथे मागितलेली प्रत्येक मन्नत पूर्ण होते असा या लोकांचा विश्वास आहे. विस्तीर्ण आकारात पसरलेल्या या जागेत एक मोठी बाग आहे, भक्तांच्या निवासासाठीच्या, जेवणासाठीच्या इमारतीही आहेत. एकूणची जागेची स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. मुख्य दर्गा संपूर्ण संगमरवरात बनवलेला आहे. मुख्य दर्ग्याचा घुमट पाहून ताजमहालची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.