Skip to main content

बट्ट्याबोळ-१

लेखक कपिलमुनी यांनी रविवार, 12/07/2020 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊनचा बट्ट्याबोळ जगभरात लॉकडाऊन हा वाढणाऱ्या पेशंटच्या संख्येच्या तयारीसाठी वापरला जात असताना आपल्या देशात मात्र हाच एकमेव रामबाण उपाय म्हणून वापरला गेला. कोणतेही प्लॅनिंग ना करता जाहीर केलेला लॉकडाऊन 1,2,3 असा मनमानेल तसा वाढवत नेला.

शेजारील काकी

लेखक श्रीकांतहरणे यांनी रविवार, 12/07/2020 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
शेजारील काकी, सगळ्या दुनियेसाठी कशाही असो, पण माझ्या घरातील सगळ्यांना त्या नेहमी वात्सल्य मायेने बघतात. आमची कधी काही तू तू मै मै होते पण त्यात, त्याचे आमच्या वरील वात्सल्य प्रेम कधी कमी झाले नाही. काकू मूळच्या कोकणातील. फणस जसा बाहेरून कडक आणि काटेरी, पण आतमध्ये एक्दम गुळगुळीत, कोमल तस काकूंच मन. सोसायटी मधील कुठेलेही काम असू देत. मदत करायला काकू सगळयांचा पुढे. कोणाकडून कशी कामे करून घ्यायची यात काकूंचा हात कोणी धरू शकणार नाही. कोणताही नोकर असो, की अधीकारी असो, त्याला त्याच्या कामाची जाणीव करून देणे हे काकूंचे काम. सोसायटी स्वच्छ, निरोगी कशी राहील याची नेहमी काळजी करणारे वक्तिमत्व.

कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 12/07/2020 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ? घर पुन्हा एकदा सॅनिटाईज होईल, अमिताभ बरा होईल तरीही प्रश्न शिल्लक रहातो सगळे नोकर चाकर व्यवस्था असून कोरोना अमिताभ पर्यंत कसा पोहोचतो ? प्रत्येक स्पर्शित जागा सॅनिटाईज व्हायला हवी प्रत्येक स्पर्ष सॅनिटाईज असायला हवा प्रत्येक माणूस दूर उभा रहायला हवा प्रत्येकाच्या नाकतोंडावर मास्क असायला हवा कुणितरी कुठेतरी गलथानपणा करतो अन्यथा कोरोना अमिताभपर्यंत कसा पोहोचतो ? केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ? . . . . . . * अनुषंगिका व्यतरीक्तची आवांतरे, व्

त्या पोराने

लेखक मनोज यांनी रविवार, 12/07/2020 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
येता गिर्‍हाईक दारावर त्याने तिला बाई म्हणावे? वेश्येच्या त्या पोराने कधी आईला आई म्हणावे ? चुरगळलेल्या पाकळ्यांना जरी मोहक तो सुगंध येतो हाती घेत अश्या फुलाला कधी कुणी मग जाई म्हणावे? नाही केली फसवा फसवी सरळ जमला व्यवहार आहे आरोप करत का लोकांनी केली दांडगाई म्हणावे? भाऊबीजेचा सण आल्यावर उगी तिला वाटत होते सरळ नजरेन पाहत कुणी आज मलाही ताई म्हणावे जगणे बत्तर असे नशीबी बाप नाही माहीत ज्याला या जगात त्या पोराने कुणा होऊ उतराई म्हणावे?

क्वाएट प्लीज... लेडीज अँड जेंटलमेन!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 11/07/2020 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
चंदा आए, तारे आए, आनेवाले सारे आये आए तुम्ही संग ना... आन मिलो सजना| जुलै महिन्याचा दुसरा आठवडा .... दुपारची वेळ.... बाहेर रिमझिमणारा पाऊस.... हातात मोठा मग भरून वाफाळता चहा आणि ही अप्रतीम ठुमरी. जुन्या आठवणींची हुरहुर लावणारी. ह्यावेळी खरोखरच एका सजणीने झुरवलं. तिच्या आठवणीने जीव वेडापिसा झालाय. तिचं आणि माझं नातं अगदी मी वयात येतानापासूनचं - त्याहीपेक्षा किंचित आधीचंच. हिरवळीवरून - पांढर्‍या शुभ्र पेहरावात ओंजळीने मोती उधळीत येणारी ती. तिच्या त्या निळ्या डोळ्यांना, सोनेरी केसांना, तिच्या तारुण्याने मुसमुसलेल्या अंगकांतीला, स्ट्रॉबेरीचा रंग ल्यालेल्या गालांना चिरतारुण्याचं वरदान.

पोस्ट वॉरंटी वाहन दुरूस्ती, रिपेअर सेंटर्स, गॅरेजेस इत्यादी बाबत चर्चा

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 11/07/2020 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
एका व्हाअ‍ॅ गृपमधील झालेल्या चर्चेचा धाग्याच्या रुपाने गोषवारा घेतला गेला आहे. आपली मते येथे मांडावीत जेणे करून पुन्हा चर्चा होवून मत मतांतरात नवे मुद्दे पुढे येतील. आपले जे काही वाहन असते भले ते दुचाकी असो, चारचाकी असो, तर ते वाहन वॉरंटी कालावधीत आपण अधिकृत देखभाल केंद्रात त्याची देखभाल करून घेत असतो. वॉरंटी कालावधी संपला की सर्वच कंपन्यांचे वार्षिक देखभाल करार असतात. असा करार केला तर, तिन अथवा चार प्रिव्हेंटिव्ह सर्वीसेस वर लेबर चार्जेस मध्ये सुट, स्पेअर पार्टवर सुट अशी ऑफर असते.

स्मृतीची पाने चाळताना: तीन

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 10/07/2020 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्याचं नामकरण कोणत्या विचारांनी केलेलं असतं, त्यांनाच माहिती. नाव गुलाब असणं आणि त्याच्या देखणेपणाची कोणतीही लक्षणे त्यात शोधूनही न सापडणं, याला विपर्यास शब्दाशिवाय आणखी काय म्हणता येईल? माहीत नाही. असंच काहीसं गुलाबबाबत घडलं. गुलाबचा ‘गुल्या’ झाला आणि तीच त्याच्या नावाची अमीट ओळख झाली. हा संक्षेप कुणी केला, केव्हा आणि कसा केला, कुणास ठाऊक. काळाच्या वाहत्या प्रवाहात गावात अनेक गोष्टी घडल्या आणि बिघडल्याही. बदलांच्या वाटांनी नव्या गोष्टी आल्या. त्यांच्या आवेगात टिकाव धरू न शकल्याने जुन्या गोष्टी शेवाळावरून घसरून पडावे, तशा निसटल्या. बदलला नाही तो ‘गुल्या’ शब्द. तसंही नावात काय असतं म्हणा!

राजयोग - २०

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 10/07/2020 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग-१९ *** नक्षत्रराय सैनिकांबरोबर कूच करीत होता, त्याच्या प्रवासात कुठेही अडथळा आला नाही. त्रिपुराच्या प्रत्येक गावात त्याचं राजा म्हणून स्वागत केलं गेलं. जसजसा राजा असण्यातला आनंद क्षणोक्षणी मिळू लागला, तसतशी त्याची तहान अजूनच वाढू लागली. चारी दिशांना पसरलेली शेतं, गावं, डोंगर, नदी सगळं काही माझंच आहे ही भावना वाढू लागली आणि त्याचबरोबर आपण स्वतःही असेच विशाल, शक्तिशाली आहोत असे वाटू लागले. मुघल सैनिकांचा जसा कल असेल, तशाच आज्ञा तो देऊ लागला.

वॉरंटी /  गॅरंटी

लेखक रानरेडा यांनी शुक्रवार, 10/07/2020 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
वॉरंटी /  गॅरंटी ( गॅरंटी सहसा कोणी देत नाही - कायदेशीर व्याख्या आहे काहीतरी, आणि इतर ही लफडी असावी. ) वॉरंटी  चे काही  प्रकार असतात १ ) ऑन साईट - तुमच्या जागी / घरी / ऑफिस मध्ये येवून सर्व्हिस दिली जाते २ ) कॅरि इन - तुम्हाला सर्व्हिस सेंटर मध्ये जावे लागते. ३ ) लॅपटॉप ला पाहिली नाही पण काही गॅजेट ना रिपलेसमेंट वॉरंटी असते - त्यात अ ) वस्तु बदलून दिली जाते - किंवा ब ) वस्तु बदलायला नसेल तर क्रेडिट नोट -  इतर गोष्टी मधून पैसे वगळले जातात . क) काही कंपनी पैसे ( इंनव्हॉईस किमत ) परत करतात .