Skip to main content

ये जेवण है, इस जेवण का....

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 01/01/2021 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
ये जेवण है, इस जेवण का यही है, यही है, यही है रंगरूप थोडी कम हैं, थोड़ी रोटीयाँ यही है, यही है, यही है पाव सूप ये ना कोसो, इसमें अपनी, मार है के पीट है उसे दफना लो जो भी, जेवण की सीट है ये स्वीट छोड़ो, यूं ना तोड़ो, हर फल इक अर्पण है ये जेवण है, इस जेवण का... धन से ना धनिया से, तूर ते ना गवार से दासों को घोर बंदी है, भरते के प्यार से बनिया लूटे, पर ना टूटे, ये कैसा लंघन है ये जेवण है, इस जेवण का...

परग्रहावरील बेट: भाग १ – पूर्वतयारी

लेखक निशाचर यांनी गुरुवार, 31/12/2020 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
"पण तू तर नेहमी म्हणायचीस कि तिकडे जायचं तर सातआठ महिने आधी प्लॅन करावं लागेल..." (पर आप तो हमेशा महंगीवाली टिकिया... काय कधी आठवेल सांगता येत नाही!) "जर विमानाची तिकिटं आणि हॉटेल्स त्याच किमतीत चार आठवडे आधी मिळत असतील तर..." हसू दाबत मी उत्तर देऊन टाकलं. पण नवरा एवढ्या सहज ऐकणार नव्हताच. दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. जुलै महिन्यात युरोपात हवामान छान असतं (किंवा तशी शक्यता जास्त असते!) त्यामुळे दोघांनीही जुलैत एक आठवडा सुट्टी घेऊन इटलीला डोलोमाइट्स पर्वतांत ट्रेकिंगला जायचं ठरलं होतं. जर्मनीहून ट्रेन किंवा विमानाची तिकिटं उपलब्ध होती.

स्वर्गीय कोकण ची - Bike Road Trip । आजरा-रामतीर्थ, आंबोली , हिरण्यकेशी, महादेवगड

लेखक व्लॉगर पाटील यांनी गुरुवार, 31/12/2020 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गीय कोकण ची - Bike Road Trip । आजरा-रामतीर्थ, आंबोली , हिरण्यकेशी, महादेवगड कोकण special Bike Road ट्रिप , पुण्यातून ट्रिप ला सुरुवात केली, कोल्हापूरचा मित्र सागर ने कोल्हापुरात join केलं आणि आम्ही निघालो तळ कोकणच्या दिशेने , ठरलं होत वाटेत दिसतील ते स्पॉट explore करायचं मग काय ३ दिवस , जवळपास १००० km चा प्रवास आणि स्वर्गीय कोकणातील भारी भारी भरपूर स्पॉट्स .. पहिल्या दिवसाच्या प्रवासातील काही स्पॉट्स आपल्या कोकण ट्रीपच्या पहिल्या व्हिडीओ मध्ये १. रामतीर्थ , आजरा कोल्हापूर जिल्ह्यातील आजारा या गावापासून २km अंतरांवर असलेला रामतीर्थ मंदिर आणि धबधबा .

तळ कोंकण २०१८ : भाग 2

लेखक गोरगावलेकर यांनी गुरुवार, 31/12/2020 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
तळ कोंकण : भाग १ गोव्याच्या हरमळ (अरंबोल) किनाऱ्याहून निघून तासाभरात (२७ किमी) वेंगुर्ल्याच्या सागर किनारी असलेल्या श्री सागरेश्वर मंदिरात पोहचलो. उभादांडा येथील या मंदिराला चहुबाजूने तटबंदी आहे. प्रवेशद्वारापाशी चौकोनी दीपमाळ असून मंदिराच्या गाभाऱ्यात जागृत स्वयंभू शिवलिंग आहे. दर्शन घेऊन समुद्र किनारी आलो. खूप सुंदर असा लांबलचक किनारा आहे.

देवीला बळी

लेखक पॉइंट ब्लँक यांनी बुधवार, 30/12/2020 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
महाबलीपुरम येथील पल्लवाकालीन गुहेमध्ये कोट्रावै ह्या देवीचं एक शिल्प आहे. हे दुर्गेचं तमिळ रुप मानलं जातं. कधी ती विष्णुदुर्गा स्वरुपात दिसते , म्हणजे ती विष्णुची बहिण म्हणुन विष्णूची आयुधे तिच्याकडे असतात आणि ह्या स्वरुपात ती रेड्याच्या डोक्यावर ती उभी असते. तर कधी तीच्या सोबत सिंह असतो तर कधी काळवीट.

यमकं बिमकं, कविता बिविता..

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 30/12/2020 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
तू म्हणालास , "यमकंबिमकं, कविता बिविता ऐकून होतो नुसता जाच माझ्यासाठी कधीतरी तुझीमाझी गोष्ट वाच." मला खुदकन् आलं हसू, आपली गोष्ट कशी वाचू? आगा नाही पिछा नाही, गोष्टीला त्या नावही नाही, अशी गोष्ट सांगतात का? आणि कुणी ऐकतात का? समजा जर सांगितली तर तुझं नाव घालू कसं? नावच जर बदललं तर मी पुढं बोलू कसं? तो तिला कुठं भेटला, सांगताना पापणी थरथरेल. कसा हात मागितला?
काव्यरस

हेवा

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 29/12/2020 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज अनेक दिवसांनंतर मिपावर लिहीत आहे. अधून मधून केवळ वाचक म्हणून हजेरी लावत होते. एकूणच कामांच्या जवाबदरीमध्ये काहीशी जास्तच व्यस्त होते. आज एक कथा घेऊन आले आहे. खरंतर 'हेवा' ही माझीच शशक आहे. यावर्षीच्या स्पर्धेमधली. फक्त ही शशक आता एक संपूर्ण कथा म्हणून तुमच्या समोर सादर करते आहे. आपले प्रतिसाद येतीलच याची खात्री आहे ******** हेवा स्वप्नाळू राधाच्या लग्न करताना आयुष्याकडून खूप काही अपेक्षा होत्या. आजवर तिने जितके सिनेमे पाहिले होते त्यात सकाळी नवरा बायकोला प्रेमाने उठवतो... स्वतः बनवलेला नाश्ता देतो... गरम-गरम चहा आणून देतो असंच दाखवलं होतं.

शाळा

लेखक सरिता बांदेकर यांनी शनिवार, 26/12/2020 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा सौ सरिता सुभाष बांदेकर “ एक साथ नमस्ते” ज्या मुलांचे आणि मुलींचे लक्ष होते त्यांनी मास्तरना नमस्ते केले.बाकीची मुलं , मुली आपल्यातच दंग होती.आज लता नवीन कानातले घालून आली होती. निम्म्या मुलींचे लक्ष तिच्या कानातल्याकडे होते.मुलांचे लक्ष खोड्या करण्यात होते. मास्तरांनी हजेरी घेतली. आज शंभर टक्के मुलं हजर होती. आज शाळेत शिरा मिळणार आहे रोजच्या सारखी खिचडी नाही.

कलापंढरी फ्लॉरेन्स

लेखक Rahul Hande यांनी शनिवार, 26/12/2020 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
७ फेब्रुवारी १४९७ चा दिवस इटलीतील एका शहरात एक अनोखी होळी रचण्यात आली. सॅव्हानारोला नावच्या धर्मगुरूने या शहरावर आपली धार्मिक दहशत कायम केली होती. त्याच्या आदेशानुसार त्याचे धार्मिक शिपाई 'ख्रिस्त अमर रहे','मेरी अमर रहे' च्या जयघोषात शहरातील प्राचीन पुस्तकं,हस्तलिखितं,शेकडो चित्रं,रेखाटनं,ऑईल पेंटिंग्ज,शिल्प,हस्तिदंती कोरीव काम केलेल्या वस्तू या होळीत टाकत होते. एका कलासंपन्न शहराचे वैभंव धगधगत्या अग्नीज्वाळांमध्ये बेचिराख होत होतं. शहरवासीयांची अलोट गर्दी या होळीच्या दर्शनासाठी जमलेली होती.या गर्दीत एक सतरा-अठरा वर्षाचा तरुण ही होता.