मार्गशीर्ष व. ४ स्वामी श्रद्धानंद यांचा खून !
आज काय घडले ...
शके १८४८ च्या मार्गशीर्ष व. ४ या दिवशी सुप्रसिद्ध गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक व हिंदु समाजाच्या उपेक्षित भागाकडे लक्ष वेधविणारे थोर गृहस्थ स्वामी श्रद्धानंद यांचा अमानुषपणे खून झाला.
स्वामींचा जन्म शके १७७८ मध्ये पंजाबांतील तळवण गांवी झाला. यांचे मूळचे नांव मुनशीराम असे होते.
शके १८४८ च्या मार्गशीर्ष व. ४ या दिवशी सुप्रसिद्ध गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक व हिंदु समाजाच्या उपेक्षित भागाकडे लक्ष वेधविणारे थोर गृहस्थ स्वामी श्रद्धानंद यांचा अमानुषपणे खून झाला.
स्वामींचा जन्म शके १७७८ मध्ये पंजाबांतील तळवण गांवी झाला. यांचे मूळचे नांव मुनशीराम असे होते.मार्गशीर्ष व. १ रामचंद्र गणेशांचा प्राणत्याग!
आज काय घडले...
मार्गशीर्ष व. १
रामचंद्र गणेशांचा प्राणत्याग!
शके १७०२ च्या मार्गशीर्ष व. १ रोजी मराठेशाहीतील सुप्रसिद्ध वीर रामचंद्र गणेश कानडे यांनी वज्रेश्वरीजवळ इंग्रजांशी लढता लढतां प्राणत्याग केला.
या वेळी इंग्रजांनी वसई या महत्त्वाच्या ठाण्यावर हल्ला करून ते हस्तगत करण्याचा विचार केला होता. दोनतीन दिवसांपूर्वीच किल्ल्यावर तोफा डागल्या गेल्या होत्या. गॉडर्डनें वसई घेण्याचा निश्चय केला होता, अशा आणीबाणीच्या प्रसंगी नानांनी जुना कसलेला सेनापति रामचंद्र गणेश यास वसईस मदतीसाठी म्हणून पाठविले. रामचंद्र गणेश घाटांतून जात असतां इंग्रज सेनानी हार्टले व मुसा नारन यांनी त्याला अडविले.
निळ्या टिक दाखवा हो।।
काही लोक WhatsApp वर मेसेज वाचल्याचे कळू नये म्हणून निळ्या टिक ऑफ करतात.त्यांना विनंती
मूळ गीत : निजरुप दाखवा हो
गीतकार: ग.दि.माडगूळकर
निळ्या टिक दाखवा हो।मॅसेज वाचल्याचे कळू द्या हो।
निळ्या टिक दाखवा हो।।
अपेक्षेने लिहितो मी; प्रतिसाद त्यास द्या हो।
निळ्या टिक दाखवा हो।।
कोणी इथे तळमळतो; त्याची चिंता सरु द्या हो।
निळ्या टिक दाखवा हो।।
दखल घेतलीसे माझी; हे मजला कळू द्या हो।
निळ्या टिक दाखवा हो।।
ती जागा (भाग -१)
लग्नानंतरच्या गोडगुलाबी दिवसांची मजा घेऊन रमा आणि श्री आपल्या कामाच्या शहरात पोहचले.आटोपशीर संसार म्हणून लहानच जुनी जागा त्यांनी भाड्याने घेतली .जागा अंधारी आणि बंदिस्त होती रमाला फारशी रुचली नाही ..पण संसारात नवरा-बायको एकमेकांसोबत असले तर बंदिस्त जागाही नंदनवन होत असते.
तिथे राहायला येऊन दोनच दिवस झाले होते.रमाला स्वयंपाक घरात ओट्यासमोर उभी असतांना पाठीमागे तिच्या केसांना कोणीतरी फुंकरीने उडवल्यासारख वाटलं “काय रे श्री ,बस कर की चेष्टा ..”लाडात रमा बोलली. पुन्हा तोच प्रकार घडला..रमा मागे वळून पाहायला लागली तर कोणीच नाही.”श्री ?” ..तो बाहेर मित्रांशी गप्पा मारत उभा होता.
मालवणचे देवधर: काही मौखिक आठवणींची नोंद
(नोंद: या आठवणी त्रोटक आहेत. एका संध्याकाळी दोनतीन तास चाललेल्या गप्पांवरून दुसऱ्या दिवशी जे व जितके आठवले तसे नोंदले आहे. यात जातिसंस्था, शिवाशीव वगैरे प्रथांचा उल्लेख काळानुरूप आला असला तरी त्यांचे उदात्तीकरण करण्याचा मुळीच हेतू नाही. कुणाला ते तसे उल्लेखही अनुचित वाटण्याची शक्यता आहे, त्यांची आधीच माफी मागतो)
***
संध्याकाळी आम्ही आमच्या कुटुंबातील Grand Old Man मनोहरमामा देवधर (मूळ गाव देऊळवाडा, मालवण, पण बरेचसे आयुष्य गुजरातेत काढले. आताही वास्तव्य तिथेच) यांच्या घरी गेलो होतो. हे खरेतर आईचे मामा, माझे आजोबाच. पण आम्हीही सगळे त्यांना मामाच म्हणतो. नव्वदीचे वय.
लाख चुका असतील केल्या...
निसटले वर्ष मला
पाठमोरेसे दिसले
त्याची बघून हताशा
माझे काळीज द्रवले
म्लान वदनाने त्याने
हलकेच विचारले
जगशील का रे पुन्हा
दिस चार माझ्यातले
विचारात मी पडलो
चार कोणते निवडू
आनंदात गेले ते, की
चुकांनी जे केले कडू
निवडले मग चार
चुका मोठ्या केल्या ज्यात
सुधारेन म्हणताना
गेलो आणखी गर्तेत
नवे वर्ष नव्या चुका
करण्याची आहे संधी
असे असता कशाला
भूतकाळा द्यावी संधी?
लाक्कुंदी आणि दांडेली - भाग १
एखाद्या ठिकाणाबद्दल तुम्ही कुठेतरी वाचता, कुणाकडून तरी ऐकता किंवा त्याची एखादी झलक पाहता आणि ते ठिकाण तुमच्या मनाच्या एका कोप-यात कुठेतरी आत जाऊन बसतं. हे ठिकाण ताजमहाल किंवा अजिंठा-वेरूळ सारखं प्रसिद्ध नसतं पण तरीही (की त्यामुळेच?) ते तुम्हाला भावलेलं असतं. भेट द्यायच्या ठिकाणांच्या यादीत त्याचा क्रमांक वरचा नसतो, पण तरीही ते कधीही विस्मरणात जात नाही. लाक्कुंदीच्या बाबतीत असंच झालं. इंटरनेटवर कुठेतरी या ठिकाणाबाबत वाचलं आणि तेव्हाच तिथं जायचं हे पक्कं ठरवून टाकलं.
मिसळपाव

