उद्याच्या बाजाराबाबत
नमस्कार,
अपेक्षेप्रमाणे शेअरबाजार खाली आला आहे. काल दुपारी झालेल्या पुलबॅक वर भाळून ज्या मूर्खांनी काल दुपारी खरेदी केली, त्यांनी स्वत:च्या मूर्खपणाला शिव्या द्याव्या.
कारण मार्केट प्रचंड ओव्हरबॉट होतं आणि त्याला पडायला काहीतरी कारण पाहिजे होतं. ते सेबीने दिलं इतकचं. नाहितर चिदुच्या (चिदंबरमच्या) गोड गोड साखरपेरी आश्वासनानंतर आज फॉलोअप बाइंग दिसलं असतं, पण तसं झालं नाही, ते होणार नव्हतं.
आज ते़जीमातेच्या महाआरत्या चालल्या नाहीत. कोणताही विधीनिषेध न बागळता एखाद्याने लुंगी सोडावी तस मार्केट आज "सुटलं".
आम्ही मंदीतच होतो आणि आहोत. जे कोणी तेजीत असतील त्यांचे स्टॉपलॉस हिट झाले असतील.
खोडसाळपंतांची गझल - रुचिपालट! :)
आमचे मनोगतीय मित्र श्री खोडसाळपंत यांनी अलिकडेच एक सुरेख गझल लिहिली आहे. गझल फारच छान आहे. आम्ही खोडसाळरावांचे प्रथमपासूनच फ्यान आहोत.
Taxonomy upgrade extras
पुण्यातील जागांचे भाव
नमस्कार मंडळी,
पुण्यातील जागांचे भाव आकाशाला भिडले आहेत. लोक पार तळेगाव, लोणावळा, पिरंगुट, सासवड, उंड्री, चाकण पर्यंत राहावयास गेले आहेत / जात आहेत. जागेच्या किमती २००० ते ६५०० च्याही वर गेलेल्या आहेत. आय्.टी. वाले सोडले तर इतरांच्या कुवतीच्या पलीकडे सध्या जागा घेणे झाले आहे. आय.टी. वाले सेकंड होम घेत आहेत तर इतरांस घरभाडेही परवडेनासे आहेत. विशेषतः स्थानिक लोकांस जागा घेणे अवघड झाले आहे. पुणे आता मुंबई होऊ लागले आहे काय? इतर शहरांतील लोकांचे काय अनुभव आहेत?
मध्यमवर्गीयांची संख्या वाढत असतांनाच दारिद्र्य रेषाही वर जात आहे का? आपण एखाद्या गृहयुद्धाकडे जात आहोत काय?
महिषासूर आणि दूर्गा (विनोदी ऍनिमेशन)
आपण जर खालील फ्लॅश अजून पर्यंत पाहीला नसला तर अवश्य पहा. मुलांनापण पहायला आवडतो. (मला फायरफॉक्स मधे बघता आले नव्हते)
http://www.dadazi.net/usa/mahis.swf
विकास
एन आर एम डे
नमस्कार,
म. टा. मधील खालील बातमी आपल्या माहीती करता:
प्रिय एनआरएम’ मित्रहो!,
[ Wednesday, October 17, 2007 07:15:57 am]
नमस्कार ‘ एनआरएम ’ मित्रहो !,
स. न. वि. वि. ,
पत्रास कारण शुभेच्छा दस-याच्या. आमच्या ‘ एनआरएम डे ’ च्या.
इंडोनेशिया , जावा , सुमात्रा बेटांवर भारतीय संस्कृती घेऊन जाणा-या कौंडिण्य ऋषींचा उल्लेख भारतीय इतिहास पुराणात आहे . त्यांच्याशी नातं सांगणारी कोंढाणा किल्ल्यासह अनेक स्थानं आपल्या महाराष्ट्रात आहेत .
मनातले
जुने हिंदी सिनेमे बघताना तर नेहमी वाटायचे "अरे! गप्प का? सांग ना हिरॉइनला ती तुला आवडते." आत्ता बोलला नाहीत तर नंतर बोंबलत बसाल, इडिअट्स का स्वतःला त्रास करून घेताय. :-) (शेवटी वैतागून जे तुमचे काम कुत्रा, कबूतर तुमच्यासाठी करु शकते ते तुम्ही स्व:ता का नाही करत?)
इथे तुमच्या मनात बराच काळ रेंगाळणारे, पटकन येऊन टोचणारे, हे असे का असते, लोक अस का करतात, आज अमुकने मुद्दामुन असे वागून कसे पकवले, आज असे घडले, ऐकले, प्रवासात काहीतरी दिसले, घडले ते शेअर करणे, संर्घषाच्या अश्याप्रसंगी काय करायचे (नातेसंबध, ऑफीसमधील टेंशन), अमूक गोष्टीला काय म्हणतात आठवत नाही कोणाला बरे माहीत आहे का?
आउटसोर्सिंग!
लोक काय काय आउटसोर्स करतील याचा नेम राहिलेला नाही. एकाच्या सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना काय आहे ते येथे ऐका..
परत NPR वरचाच कार्यक्रम आहे. मुलाखतकार रॉबिन यंग. कल्पना डेव्ह हुई. ही ध्वनीफित ऐकायला Real Player लागेल.
काहीतरी कारणाने मलाच वरच्या दुव्यावर ऐकता आले नाही, म्हणून दुसरा दुवा देते आहे - ताज ट्यून बघा.नमस्कार!
मंडळी मी मिसळपाव वरील नविन सदस्य. सदस्य बनण्या आधी पाहुणी म्हणुन
अधुन मधुन भेट देत होते पण मजा नाहि... आता या खमंग रश्यात पहिजे तशी डुबकि मारता येईल!
कार्यक्रम..
मंडळी,
थोडी स्वस्तुती करते आहे. इथे अमेरिकेत एक इंटरनेट रेडिओ आहे. तिथे मी निवेदिकेचं काम करते. माझे २-३ कार्यक्रम झाले आतापर्यंत. आता येत्या गुरूवारी माझा श्रीमती शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या जयंती निमित्त ( १२ आक्टो) कार्यक्रम मी सादर करणार आहे.
पॅसिफिक टाईम सकाळी ७.०० , ११.००
www.eprasaran.com
इथे मराठी चॅनेल.
भारतामध्ये हा कार्यक्रम गुरूवारी ७.३० ला संध्याकाळी ऐकता येइल.
कार्यक्रम मिसळपाव करांनी ऐकावा ही विनंती आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.
- प्राजु.
मिसळपाव