Skip to main content

नमस्कार!

लेखक पुरणपोळी यांनी मंगळवार, 16/10/2007 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी मी मिसळपाव वरील नविन सदस्य. सदस्य बनण्या आधी पाहुणी म्हणुन अधुन मधुन भेट देत होते पण मजा नाहि... आता या खमंग रश्यात पहिजे तशी डुबकि मारता येईल!

वाचने 8948
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

पुरणपोळीचं मिसळपाववर मनापासून स्वागत! मला पुरणपोळी खूप आवडते! :) तात्या.

आता सदस्य आहत तर झकास बेत होऊन जाऊ दे लवकर. डुबक्या पाहीजे तितक्या मारा पण अधूनमधून एक गरमागरम पुपो खिलवायची बर का! स्वागत!

तेव्हा जरा गोड धोड होऊ द्या बॉ ! म्हणजे ललित, कविता, लघूकथा,कांदबरीचे क्रमश लेखन, मराठी शुद्धलेखन काळाची गरज असे किंवा ( जगण्याच्या पुर्वपिठीका ;) ) वगैरे वगैरे इत्यादी ! :) मिसळपावच्या हॉटेलात आपले स्वागत आहे. अवांतर ;) ए पो-या टेबलवर फडकं मार अन एक मिसळ दे :) आजच्या दिवस पैसे नक्को घेऊ ! माझ्या खात्यावर लिहून ठेव !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

होणार ..झक्कास बेत होणार्..जरा कुर् डई तळते, कटाची आमटि बनवते, बटाट्याची भाजी करते.. मग करु पंगत..

In reply to by पुरणपोळी

जरा कुर् डई तळते, कटाची आमटि बनवते, बटाट्याची भाजी करते.. मग करु पंगत.. वा वा! पुरणपोळी, तुमचा बेत छानच आहे. कुरडई, कटाची आमटी आणि बटाट्याची भाजी! वा वा वा! थांबा, इतक्यात पानं घेऊ नका. सगळ्यांना बोलावतो पंगतीला आणि मुख्य म्हणजे आमचे तात्या जागेवर दिसत नाहीत, त्यानाही बोलावतो मग सर्व मिसळपावकरांची पुरणपोळीच्या पक्वान्नाची करू एक जोरदार पंगत! ;) राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

In reply to by पुरणपोळी

वा छान वास सुठलाय तोंडाला अगदी पाणी सुटलय जरा दोन तीन दिवसांनी पंगत ठेवा सध्या नेमके नवरात्राचे निर्जळी उपवास चालु आहेत जगदंब !जगदंब !जगदंब !जगदंब ! (उपाशी ) बोका

कर्णा..अरे काय हे.. येच पगंतिला..म्हन्जे तुला कळेल कशाशि काय खायच ते..

स्वागत आहे... :)