Skip to main content

मरण...

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी सोमवार, 08/02/2021 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
मरण... रिपोर्ट वाचून झाल्यावर, यमधर्म दिसे दारावर, मग आली भानावर, केलीच पाहिजे आवराआवर... तशी होती ती गोलमटोल, हळूहळू होत गेली अबोल, चेहऱ्यावर दिसे हसरा भाव, मनात सलत असे घाव... कोणी म्हणत नव्हते सरक, पण वागण्यात सर्वांच्या जाणवे फरक, मावळली गालीची हसरी खळी, आता आळीमिळी गुपचिळी... आयुष्यभराच्या आठवणींचा, कसा सोडवायचा गुंता, सतावत सारखे हेच विचार, अन् मनात दाटे चिंता... कळलं नाही तिला शेवटी, काय झाली चूक, बदल दिसे शरीरावर, मन झालं मूक... झोपली नव्हती ती, झाली होती क्लांत, दवाखान्याच्या शय्येवर, तिला मिळाली होती उसंत.. आकाशात दूर कुठेतरी, तेजस्वी तारा निखळला, गाली तिच्या एक, चुकार
काव्यरस

बगूमामा

लेखक मालविका यांनी सोमवार, 08/02/2021 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
बगूमामा खर तर आईचा मामा आणि माझे मामाआजोबा. पण अगदी लहान वयात त्यांना आजोबा म्हणणं जीवावर यायचं. मी आईसारखचं बगूमामा म्हणायचे. यथावकाश समज आल्यावर मी आमचं नातं समजून घेऊन त्यांना आजोबा म्हणायला लागले. परवा आजोबा गेल्याच कळलं आणि डोळे भरून आले. कितीतरी आठवणी उचंबळून आल्या. आजोबांना कोकण भारी प्रिय. इकडे यायचं म्हणजे आजोबा केव्हाही तयार. अगदी कितीतरी वर्ष आजोबा २ व्हिलर घेऊन पार्ल्यातून चिपळूणला यायचे. शेवटी आता तुम्ही २ व्हिलर वरून एवढा प्रवास करायचा नाही अशी बंदी घातली तेव्हा ते थांबले. कुठलंही काम करायला घ्या आजोबा उत्साहाने तयार. माझी आजी तर त्यांची लाडकी.

कन्यादान एक शब्द चित्र

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 08/02/2021 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द तोकडे पडले डोळ्या पाणी दाटले भावनांची उंची मोठी शब्द ओठीच थांबले पसरली शांती चहूकडे कोलाहल माजला मना मनाच संवाद मनाशीच ग थांबला अशांत ही मने फक्त डोळे बोलके पाऊल झाले जड पडे हलके हलके लेक चालली सासुरी शब्द तोकडे पडले आई बापाच्या मनातले बासुरीचे सुर होते तिथेच थांबले ८-१२-२०

हाकामारी

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 07/02/2021 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट लहानपणची लहानपणी ऐकली होती एक गोष्ट हाकामारी तीच नाव खुप होती दुष्ट खुप घाबरलो होतो ऐकल्यावर पण खरी होती कळले मोठे झाल्यावर एक दिवशी आई म्हणाली लवकर घरी ये हाकामारी येईल रस्त्यावर दिसलास तर तुला उचलून नेईल विचारल हाकामारी म्हणजे ग काय ? कधीतरी येतो तीचा फेरा गावावर आणी फुली मारते दारावर हवेत येती ,मुलं धरती नसतात तीला पाय आशी म्हणली होती तेव्हा माझी माय साऱ्या लहान थोरांना आहे तीचा धाक तीला फक्त तोंड आसत नसतात तीला पाय आवाज देईल तुला पण ओ नको देऊ नाहीतर घेऊन जाईल तुला पकडून तुझा पाय आठवतं मला आस म्हणाली होती माय जरी मोठा झालो तरी सगळ आठवतं हाकामारीच्या नावाने आजुन

चित्रपट: The Truman Show

लेखक लई भारी यांनी रविवार, 07/02/2021 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी प्राईम वर ब्राउज करत असताना हा चित्रपट दिसला. नेहमीप्रमाणे जरा रेटिंग वर नजर टाकून बघायला घेतला. कथेतले रहस्य पहिल्याच फ्रेम मध्ये प्रेक्षकांना कळून जाते आणि उरलेला चित्रपट, हे रहस्य मुख्य पात्राला कळते का यासंदर्भात आहे.  जिम कॅरी ने साकारलेला ट्रुमन म्हणजे एका टीव्ही शो मधले पात्र आहे. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याला माहीतच नाही आहे की आपल्या भोवती जे जग आहे ते सर्व scripted आहे. त्याच्या भोवती एक बेट तयार केलं आहे जे खर तर एक मोठ्ठा dome आहे.

पौष व. १० श्रीशिवरायांचा वाढता प्रताप! शके १५८१ च्या पौष व. १० रोजी श्रीशिवराय यांनी चालून आलेले आदिलशाहीचे सरदार रस्तुमजमान व फाजलखान यांचा पराभव केला.

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 07/02/2021 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
पौष व. १० श्रीशिवरायांचा वाढता प्रताप! शके १५८१ च्या पौष व. १० रोजी श्रीशिवराय यांनी चालून आलेले आदिलशाहीचे सरदार रस्तुमजमान व फाजलखान यांचा पराभव केला. अफझलखानाच्या वधानंतर श्रीशिवरायांचे महत्त्व फारच बाढून बादशहाचा एक मोठाच डाव फसल्यासारखा झाला होता. आतां विजापूरकरांच्या ताब्यातील प्रांत व किल्ले सोडविणे हेच एक ध्येय शिवाजी महाराजांच्या समोर होते. २८-११-१६५९ रोजी मोठ्या युक्तीने पन्हाळा किल्ला शिवाजी राजांच्या हातांत आला. या समयी कोल्हापूर प्रांतांत विजापूरच्या एका सुभ्याचे काम रस्तुमजमान नांवाचा सरदार पहात असे. त्याच्या प्रांतांतील पन्हाळा किल्ला फारच मजबूत होता.

आज काय घडले... पौष व.८ "बचेंगे तो और भी लढेंगे!"...

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 07/02/2021 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... पौष व.८ "बचेंगे तो और भी लढेंगे!"... शके १६८१ च्या पौष व.८ रोजी राणोजी शिंद्यांचे पराक्रमी चिरंजीव व पानपतच्या संग्रामांतील आघाडीचे वीर दत्ताजी शिंदे यांचे निधन झाले. सन १७६० च्या ३ जानेवारीस दत्ताजी दिल्लोस आले. स्वतःचे शौर्य व फौजेचा दम यांजवर विश्वास ठेवून अब्दालीस जेर करू असा विश्वास त्यांना होता. यांची बायको भागीरथीबाई हिने नारोपंत, बुंदेले, जनकोजी यांच्यामार्फत यांना युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. पौष व.८ रोजी दत्ताजी फौजेनिशीं गिलच्यावर चालून गेले.

आज काय घडले... पौष व. ७ स्वामी विवेकानंद यांचा जन्म!

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 07/02/2021 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... पौष व. ७ स्वामी विवेकानंद यांचा जन्म! शके १७८४ च्या पौष व. ७ रोजी भारतीय तत्त्वज्ञानाचा सर्व जगभर प्रसार करणारे थोर पुरुष स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. विवेकानंदांची पूर्वपरंपरा अध्यात्मिक वैभवाने नटलेली आहे. 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' या उक्तीप्रमाणे विवेकानंद या श्रेष्ठ व्यक्तीच्या कुलाचा इतिहासहि उज्ज्वल असाच आहे. विवेकानंदांचे आजे बाबू दुर्गाचरण दत्त यांनी ऐन वयांतच संन्यास घेऊन परामार्थवृत्ति स्वीकारली होती. दुर्गाचरणांचे चिरंजीव विश्वनाथ बाबू मोठे विद्वान् होते. त्यांची ज्ञानलालसा अतुलनीय अशीच होती. त्यांची पत्नी भुवनेश्वरी ही देखील आदर्श आर्य स्त्री होती.