Skip to main content

विसरणे - हसु आणि आसु

लेखक शितल यांनी रविवार, 13/04/2008 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अहो॑चा विसरणे हा ३६ गुणा॑पैकी एक गुण. ते कधी आणि काय आणि कसे विसरतील याचा नेम नाही. नविनच लग्न झाल्यावर मी खिचडी केली होती, त्या॑ना डिशमध्ये घालुन दिली , मग मी इतर कामाला लागले, हे मला विचारत आले अग! तु माझी खिचडी खाल्ली का ? मग आम्ही दोघे ही ती खिचडी शोधु लागलो, एकदाची ती पु़स्तका॑च्या कपाट मिळाली. दुसरी गंमत. आम्ही तिसर्‍या मजल्यावर राहत होतो, तर हे, त॑द्रीत ४ मजल्यावर गेले आणि बेल कशी दिसत नाही म्हणून मग हसत खाली आले. क॑बरेला मोबाईलचे कव्हर आणि मोबाईल घरी हे तर वरचेवर असायचे.

संडे स्पेशल (मँगो सुफ्ले)

लेखक स्वाती राजेश यांनी रविवार, 13/04/2008 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
विजुभाऊंच्या आंब्याच्या बनात बसून खाण्याकरता :))))))) मँगो सुफ्ले साहित्यः ४ पिकलेले आंबे २ टे.स्पून पाणी १ टे.स्पून जिलेटीन (पावडर) २ अंडी (पिवळे व पांढरे वेगळे करणे) अर्धा कप दुध अर्धा कप साखर दिड कप क्रिम सजावटी साठी वाळलेल्या खोबर्‍याचे थोडे भाजलेले पातळ काप १.पिकलेल्या आंब्याच्या चौकोनी फोडी कराव्यात. त्यातील २/३(दोन तृतीयांश) फोडी सुफ्ले डीश मधे तळाला पसराव्यात. २.पाण्यात जिलेटीन विरघळून घ्यावे.(एका बाऊलमधे पाणी घेऊन त्यात जिलेटीन घालणे.
Taxonomy upgrade extras

आजकालचे मराठी चित्रपट

लेखक अघळ पघळ यांनी रविवार, 13/04/2008 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आजकाल गाजलेल्या इंग्रजी चित्रपटांवर अधारीत (म्हणजेच कॉपी मारलेले) चित्रपट काढायची टूम हिंदीतून मराठीमध्ये पण आली आहे. व्हॉट विमेन वॉन्ट आणि माय कझिन विनी ह्या दोन इंग्रजी चित्रपटांवर आधारीत अग बाई अरेच्च्या आणि कायद्याच बोला हे दोन चित्रपट बरेच गाजले. ह्या नविन लाटेविषयी आपल्याला काय वाटते? मराठी शिणेमांचा दर्जा सुधारण्यासाठी हे गरजेचे आहे का? -अघळ पघळ

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग २ ... नाट्यसमीक्षक व्हा ...

लेखक भडकमकर मास्तर यांनी शनिवार, 12/04/2008 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
समजा तुम्हाला गायन वगैरे कलेत रस नसेल, तर एक थोडेसे हटके करीअर आहे त्याबद्दल मी सांगतो...

आठवण सुद्धा...

लेखक मी अश्विनी यांनी शनिवार, 12/04/2008 13:03 या दिवशी प्रकाशित केले.

घेता घेता नशा चढेल

देता देता प्रेम वाढेल

बोलता बोलता शब्दच संपेल

बघता बघता नजर अडकेल

भेटता भेटता मनच गुंतेल

निघता निघता पाऊल थबकेल

चालता चालता वाटच संपेल

पाहता पाहता नजर पाणावेल

घेता घेता श्वासही थांबेल

वळून बघता वाटेल, इथं सारंच संपेल

या निरगाठी तोडता ह्रदय नक्की तुटेल

सारंच संपताना नंतर आठवण सुद्धा रडेल..!
--- मी अश्विनी

Taxonomy upgrade extras

एक ऐकशील?

लेखक मी अश्विनी यांनी शनिवार, 12/04/2008 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
तू येशील आणिक जाशील
काही देशील ,काही घेशील
पहाटेच्या साखरस्वप्नांना
गुलाबी बनवून जाशील!

भरती-ओहोटीचा खेळ होईल
किनारा परत एकटा राहील
तेव्हा जपलेल्या खुणांना
सांग नातं कधी देशील?

अर्थ, संदर्भ गोठून जातील
जेव्हा तुझे शब्द ऐकू येतील
पण एकटं असताना
तेच तर माझी साथ देतील!

मग अशीच तू वेळ ठरवशील
भेटण्यासाठी इथं येशील
घड्याळातल्या काट्यांना
सांग तेव्हा तू कसं बांधशील?

वेळ संपली, आता तू निघशील
पण आता एक करशील?
पुन्हा आपण भेटताना
निदान ह्या नात्याचं नाव सांगशील?
--- मी अश्विनी
Taxonomy upgrade extras

नको मारू खडा रे सख्या

लेखक फटू यांनी शनिवार, 12/04/2008 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
(1993 च्या आसपास कधीतरी आलेल्या दलाल या मिथुन चक्रवर्ती अभिनीत टुकार हिंदी चित्रपटातील "ठेहरे हुए पानीमें" या भावस्पर्शी गीताचा स्वैर मराठी अनुवाद...) नको मारू खडा रे सख्या संथ निवांत या पाण्यावर उमटतील रे तरंग त्याचे माझ्या स्तब्ध या मनावर तुझ्यासाठी अनोळखी मी अन् तुही तसा परका मला कसं जाणल तू दु:ख माझं घाव जगापासून लपलेला सा~यानाच वेड असतं रे फुलांचं कुणी प्रेम करत नाही काट्यांवर मीही अशीच एक अभागी काटा नसू दे रे त्याची सावट तुझ्यावर तूच सांग रे सख्या मला आता कसा घ्यायचा स्वप्नांचा झोका अपुर्‍या राहतील इच्छा मनीच्या चालत नसते कधी वाळूत नौका नको मारू खडा रे सख्या संथ निवांत या पाण्याव

महात्म्याला आदरांजली.

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 11/04/2008 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
Jyotiba Fule
आज भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि आद्य महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे समाजसुधारक श्री ज्योतीबा फुले यांची जयंती. त्यांना शतशः नमन. महाराष्ट्रात जेव्हा वाईट रूढींचा बोलबाला होता आणि सामाजिक कुरितींनी कळस गाठला होता तेव्हा त्या अंधारातून ज्योतीबांनीच महाराष्ट्राला व त्यायोगे संपूर्ण देशाला नवी दिशा दिली. त्याकाळात त्यांनी सुरू केलेल्या अनेक कार्यांपैकी एकेक कार्य करीत पुढे लोक मोठे बनत गेले.