Skip to main content

नकलाकार.....

लेखक उदय सप्रे यांनी शनिवार, 19/04/2008 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
नकलाकार..... कधी अभिनय कधी नकला अशा कला करतो साकार आहे वेड्यावाकड्या आयुष्याला आपल्या तो नेहेमीच देतो आकार आहे मेजकं तेव्हढंच सर्वांचं उचलून ते रंगवणारा कलाकार आहे सगळ्यांच्या नकला सादर करणारा मराठीत मात्र कलाकार आहे ! ------------------------------------- उदय गंगाधर सप्रे-ठाणे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

हात द्या, मात द्या ...

लेखक अजय जोशी यांनी शनिवार, 19/04/2008 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
हात द्या, मात द्या वा कुणी काट द्या सोसतो कालचा आजही नाट द्या भावना ओतल्या घागरी साठल्या धावण्या शब्द हे सागरी लाट द्या दान जे चोरले भासलो क्रूर मी सज्जना पाहण्या मोकळी वाट द्या मानपाना दिली पांघरा शाल ही येतसे लाटण्या तेच बोभाट द्या भ्रांत या जीवनी साधले नेमके शांतता द्या वरी, आंत गोंगाट द्या थाट मांडू नका बोलण्या पोरका जेवण्याही नको कोरडे ताट द्या वासरे लागली दूध चाटावया पीडितां एक अश्रू तरी दाट द्या आज जोश्यांस या काय रे पाहिजे ? मागणे थोडके शेवटी खाट द्या

उरून राहता येतं !

लेखक उदय सप्रे यांनी शनिवार, 19/04/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
उरून राहता येतं ! हातात काठी आली म्हणून कुणी वृ ध्द होत नाही वय लहान असूनही सर्वांना कुठे तरुण राहता येतं? चांदणं आधी मनांत फुलावं लागतं अलगद् मगच पौर्णिमेच्या चंद्राचं सौख्य पाहता येतं ! मनाचा गाभारा बुलंद असेल तरच दृष्टीचा फायदा उगीचच का रवींद्र जैनच्या संगीतात सुरांना नाहता येतं? कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! येणार्‍या हर अनुभवांत काव्य दडलेलं असतं हे समजणार्‍यालाच काव्य सराहता येतं ! कैफ दु:खाचाही असा बेधुंद असावा , की चुकून आलंच

दुरावा!

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 19/04/2008 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुरावा!!
विमानतळावरचा आगमन लाऊंज माणसांनी अगदी फुलून गेला होता. नुकतीच मुंबईहून आलेली एअर इंडियाची फ्लाईट लागली होती. प्रवासी इमिग्रेशन, कस्टम्स आटोपून बंद दरवाजातून हळूहळू बाहेर येत होते. असेच एकदा दरवाजा ढकलून आजी आणि आजोबा बाहेर आले. आजोबा बॅगा लादलेली जड गाडी हळूहळू ढकलत होते. आजी संधिवातामुळे हळूहळू चालत होत्या. दोघांचेही चेहरे प्रवासाने दमलेले, किंचित बावरलेले. त्यांची ही पहिलीच विदेशवारी होती. भिरभिरती नजर काहीतरी शोधत होती.

धर्म आणि संयुक्त राष्ट्रसंघ

लेखक विकास यांनी शनिवार, 19/04/2008 04:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज पोप बेनेडीक्ट न्यू यॉर्कमधे संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युएन) मुख्यालयात गेले होते आणि सार्वजनीक भाषण केले. त्यांची ओळख करून देताना युएन सरचिटणीस बान की मुन यांनी कॅथलीक चर्च आणि युएन मधे साम्य आहे असे सांगीतले (सेवा या अर्थी). स्वतः पोप हे मानवी अधिकारांवर बोलत असताना " धार्मिक हक्कांबद्दल" पण बोलले. यात कोणी फार गैर बोलले असे वाटले नाही. पण एक प्रश्न नक्कीच पडला की असे इतर कुठल्याही धर्मगुरूला बोलावून इतकी प्रसिद्धी दिली जाईल का?