Skip to main content

फिशपाँड....

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 19/05/2008 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एका प्रतिसादात ऋषिकेशने वापरलेला कंडा हा शब्द बघितला. खूप दिवसांनी हा शब्द समोर आला. तसा हा शब्द खूपच जुना. भाईकाकांनी पण हा शब्द वापरला आहे, पूर्वरंग मधे, मलाय भाषेत त्यांना हा शब्द 'मुलगी' ह्या अर्थी सापडला होता. मी सुद्धा आठवायचा प्रयत्न करायला लागलो की आमच्या वेळेला काय शब्द फेमस होते ते... पण छया: काही आठवायला तयार नाही. पण तेवढ्यात एकावरून एक असे काहितरी जुने जुने आठवायला लागले आणि अचानक आमच्या शाळेत १०वी च्या शेवटी झालेला 'सेंड ऑफ' चा कार्यक्रम डोळ्यासमोर आला. खासकरून त्यातले काही फिशपाँड्स... त्यात काही 'नेहमीचे यशस्वी' घिसेपिटे होतेच, उदा.

मनाचिया अंगणात.....

लेखक उदय सप्रे यांनी रविवार, 18/05/2008 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
मनाचिया अंगणात मनाचिया अंगणात दरवळतो हा वसंत संगतीस नाहिस तू , ठुसठुसते हीच खंत ! गुरफटलो अवचित मी , मोकळ्यां केसांत तुझ्या तप भंगले महर्षिंचे , मी कुठला होय संत? भिजलेल्या रात्रींच्या आठवणी त्या अनंत जगण्याचे श्वास ज्यांस नसे आदी नसे अंत ! संवेदनांच्या पल्याड , जाऊन मी तिष्ठतोय होशील ना माझी मग, जन्माची सरताच भिंत ? -----------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे------१८ मे, २००८------------ आम्हांस इथे ही भेटा..... कलास्वाद : http://uday-saprem.blogspot

साबुदाणा, रविवारची दूपार आणि मी

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 18/05/2008 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
आई बाबा पुण्याला गेले होते तेव्हाची ही गोष्ट! घरावर मी आणि माझा धाकटा भाऊ दोघांचच राज्य होतं. भावाने चतुराईने टिव्हीच्या रिमोटवरचं वर्चस्व अबाधित ठेवलं होतं. अगदी बाथरूमला जातानाही रिमोट बरोबर घेऊन जात होता म्हणा ना! त्यामुळे चालु कार्यक्रम आवडता असुनही, त्याने लावलेला कार्यक्रम कसा बघणार, असा प्रश्न इगोचा असल्याने मी टिव्ही बघु शकत नव्हतो. माझे मित्र (ज्यांबरोबर फिरताना रविवार कमी पडत असे) आता एकच मिळणार्‍या रविवारी झोपलो नाहि तर ऑफिसात लागलेली सवय मोडेल या कारणाने दुपारच्या झोपा काढत होते.

आलू पराठे

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 18/05/2008 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
स्टफ्ड आलू पराठे आपण नेहमी करतो पण ते जरा वेळखाऊ आणि किचकट काम असते.सारण न भरताही आलूपराठे चांगले होतात.वेळ थोडा कमी लागतो आणि कमी किचकट काम ! साहित्य - ४/५ मध्यम आकाराचे बटाटे,एका पेराएवढं आलं,२/३ लसूण पाकळ्या,२/३ हिरव्या मिरच्या,मीठ चवीनुसार,तेल, मावेल तेवढी कणिक. कृती - बटाटे उकडून घ्या,साले काढून कुस्करा, आले लसूण मिरचीचे वाटण करुन त्यात घाला.मीठ व चमचाभर तेल घाला.मावेल तेवढी कणिक घाला.पाणी अजिबात घालू नका.जरा घट्टसर मळा, गोळा जास

अरे काय हे!

लेखक पिवळा डांबिस यांनी रविवार, 18/05/2008 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
अरे काय, हे काय मांडलयंत काय तुम्ही लोकांनी? आम्ही हल्ली मिपावर हजर असतो तेंव्हा काहीतरी बेसुर्‍या चर्चा, प्रेमभंगाच्या कविता, निर्बोध रेसेपी (आम्हाला निर्बोध, कारण कुकिंगमधलं आम्हाला काही कळत नसल्यामुळे हो!) वगैरे टाकता आणि आम्ही जरा दोन-तीन दिवस दूर गेलो की अशी छान-छान चित्रं लोड करतां!! अरे ओंकार, चतुरंग, भाग्यश्री, सतलज! अरे काय सुरेख चित्रं काढली आहेत रे तुम्ही लोकांनी! कायहो केशवसुमार? देवाने इतकी चांगली कला तुमच्या बोटांत ठेवली आहे आणि विडंबनं कसली करता? आणि कुठे गेलं ते आमचं ईनोबा?

कातरवेळ...

लेखक नि३ यांनी रविवार, 18/05/2008 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
उन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत भर उन्हात पाउस घेऊन आभाळ मनात दाटत तरी सुदधा पावल चालत राह्तात मन चालत नाही घामाशीवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही. इतक्यात कुठुन एक ढग सुर्यासमोर येतो इतक्यात कुठुन एक ढग सुर्यासमोर येतो ऊन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो .