फिशपाँड....
आत्ताच एका प्रतिसादात ऋषिकेशने वापरलेला कंडा हा शब्द बघितला. खूप दिवसांनी हा शब्द समोर आला. तसा हा शब्द खूपच जुना. भाईकाकांनी पण हा शब्द वापरला आहे, पूर्वरंग मधे, मलाय भाषेत त्यांना हा शब्द 'मुलगी' ह्या अर्थी सापडला होता. मी सुद्धा आठवायचा प्रयत्न करायला लागलो की आमच्या वेळेला काय शब्द फेमस होते ते... पण छया: काही आठवायला तयार नाही. पण तेवढ्यात एकावरून एक असे काहितरी जुने जुने आठवायला लागले आणि अचानक आमच्या शाळेत १०वी च्या शेवटी झालेला 'सेंड ऑफ' चा कार्यक्रम डोळ्यासमोर आला. खासकरून त्यातले काही फिशपाँड्स...
त्यात काही 'नेहमीचे यशस्वी' घिसेपिटे होतेच, उदा.
मिसळपाव
