Skip to main content

शंकरपाळे

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 21/05/2008 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
शंकरपाळे खूप प्रकारांनी करता येतात,म्हणजे पाक करुनकरतात,रवा +मैदा घालून करतात. खुसखशीत शंकरपाळ्यांची ही एक अगदी सोपी कृती.. साहित्य-१ वाटी दूध,१ वाटी पिठीसाखर,३/४ वाटी तूप,१/२ चमचा मीठ,१ ते २ टे-स्पून कणीक,मावेल तेवढा मैदा, तळणीसाठी तूप/तेल कृती-तूप,साखर,मीठ एकत्र करून फेसून घ्या.त्यात कणीक,दूध आणि मावेल तितका मैदा घालून भिजवा.तो गोळा ३०-३५ मिनीटे झाकून ठेवा. नंतर लाटून शंकरपाळे कापा व तळा.

एका तळ्यात होते....

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 21/05/2008 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
शहाण्याने गप्पच बसावे दीडशहाण्यांनी बजावले ...............................मुर्खांनी विवादात त्याला ...............................दिड शहाणा ठरवले ह्याला दूरदृष्टी नाही असे आंधळ्यांना दिसले ...............................बिच्यार्‍याचा आवाज बसला ...............................मुके ठणाण बोंबलले कोणाचे ऐकतच नाही बहिर्‍यांनी ऐकवले ...............................ह्याचे अंगणच वाकडे ...............................गात लंगडे नाचले वेड्यांनी वेड पांघरून पेडगावला पाठवले ...............................चोरांनी उचलून बांधून ...............................तुरुंगात डांबले इतका का मी वाईट
Taxonomy upgrade extras

काही सुधाराव्याशा वाटणार्‍या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा...

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 21/05/2008 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
१. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे तो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९९५ ऑक्टोबर ला आल्यापासून मग अनेक वर्षे की काय तो एका थिएटराला चालला... आम्ही १९९५ मध्ये सुट्टीत पाहिल्यानन्तर पुन्हा कॉलेज ग्रुपबरोबर परत पाहिला... इतरांना जाम आवडला...

पण काहितरी बदलतयं...

लेखक मनिष यांनी मंगळवार, 20/05/2008 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी तसा चिडणारा, कपाळाला आठी घेउन वावरणारा सगळे घाव, वेदना न विसरता जगणारा एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा पण काहितरी बदलतयं… तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं तिची हसरी नजर मलाही हसवतेयं ‘सगळं छान होईल’ ती मला समजवतेयं तिच्या भाबडेपणा, तिचा विश्वास, तिची श्रध्दा सगळंच अपरिचित आणि तिचं माझ्यावरील प्रेम अगदिचं अनपेक्षित तू काय पाहिलसं माझ्यात हा प्रश्नही अनुत्तरीत आणि तिच्या डोळ्यात प्रश्नच हरवतात हा शोधही अवचित पण काहितरी बदलतयं… कपाळावरील आठी जाऊन स्मित हळुच फुलतयं ती भरेलही कदाचित सगळ्या जखमा असं उगाचंच वाट

मी पाहिलेले मयत

लेखक आंबोळी यांनी मंगळवार, 20/05/2008 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण ७-८ वर्षापूर्वीची कथा. आषाढातला रविवार. पाउस धो धो कोसळत होता. दुपारची जेवणे होउन जरा पडापड होतेय तेवढ्यात फोन वाजला. गावाकडे चुलत आजी वारल्याची बातमी आली. सगळी आवराआवर करुन आम्ही घरातले सगळे २० मैलावर आसलेल्या गावी निघालो. गावाकडचा आमचा दुमजली वाडा एकदम टिपिकल आहे. दगडी पायर्‍या. दींडी दरवाजा , तटबंदी,पायर्‍यांना लागुन डाव्याबाजुला दगडी कट्टा. पायर्‍यांच्या उजव्या बाजुला मोकळे वावर. तिथे म्हशींचे गोठे. गोबरग्यासची टाकी. दरवाज्यातून आत गेले की मोठे अंगण. खालचा सोपा, वरचा सोपा, माजघर, स्वयंपाकघर. ७-७ फूटी मातीच्या भिंती. भिंतीतून वर जायला जिने. मागच्याबाजुला २ एकराचे परस.

(पीस)

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 20/05/2008 14:22 या दिवशी प्रकाशित केले.

मिलिंद फणसें  पीस बघून मोहरले पण आम्हाला 'पीस' बघून आलेला अनुभव फार भयंकर होता.

मेथी पापडनु शाक

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 20/05/2008 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
मेथी पापडनु शाक साहित्य : मेथीचे दाणे ५ टी स्पून ,किंचीत आंबट दही १ वाटी , पाणी अर्धा वाटी , कच्चे पापड ५, आवडत असल्यास टोमॆटो २ , मोहोरी , हळद एक चमचा , मीठ , तीखट , तूप/ तेल फ़ोडणी साठी साधरण एक तास अगोदर मेथीचे दाणे भिजत ठेवावे,दही घोटुन घ्यावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात फ़ोडणीसाठी तूप/तेल(२/३ चमचे) तापवत ठेवावे.चांगले तापले की त्यात मोहोरी टाकावी , ही फ़ोडणी झाली की त्याच भांड्यात घोटलेले दही. थोडे पातळ करण्यासाठी त्यात थोडे पाणी टाकावे. त्यात भिजवलेले मेथीचे दाणे टाकावे हळद , तिखट चवीपुरते घालावे.

गुलाम वजीर!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 20/05/2008 03:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्‍यांची चाल ओळखता येण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असावंच लागतं असं नाही. लौकिकार्थानं अक्षरशत्रू असलेला मीर सुलतान खान बुद्धिबळातल्या भल्याभल्यांना अक्षरशः शत्रू वाटला असला तर नवल नाही! हिंदुस्थानात जे काही महान बुद्धिबळपटू होऊन गेले त्यात सुलतान खानचा क्रमांक आपल्याला बराच वर लावावा लागेल. सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या मिठ्ठा प्रांतात १९०५ साली जन्मलेला, 'मीर सुलतान खान' असं एखाद्या नबाबाप्रमाणे भारदस्त नाव असलेला, हा महान बुद्धिबळपटू प्रत्यक्षात 'नबाब मलिक उमर हयात खान' ह्या पंजाब प्रांतातल्या एका सरंजामशहाच्या पदरी एक यकःश्चित गुलाम होता!