मिलिंद फणसें पीस बघून मोहरले पण आम्हाला 'पीस' बघून आलेला अनुभव फार भयंकर होता.
पाहिले मी काल, आवडलीस तू
काय नखरा, काय रुपडे, 'पीस' तू
अर्थ भलते लावले शब्दांतले
चंडिका होउन मग थरथरलीस तू
लोक जमले ऐकुनी आरोह तो
येव्हढे जोरात ओरडलीस तू!!
विस्कटूनी लावली माझी कुडी
ह्या 'घडी'साठीच ना टपलीस तू?
काल लाथांनी मला कुटला वरी
गूढ वर तू का पुन्हा हसलीस तू?
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी?
ठेवला आहेस मज ओलीस तू!
मी असे लाचार नवरा शेवटी
शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4025
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा...
लय भारी..
अर्थ भलते लावले शब्दांतले
चंडिका होउन मग थरथरलीस तू
लोक जमले ऐकुनी आरोह तो
येव्हढे जोरात ओरडलीस तू!!
सह्ह्ह्ही.
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
केशवा
मानले बॉ तुला....
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी?
ठेवला आहेस मज ओलीस तू!
मी असे लाचार नवरा शेवटी
शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू...
अरे वैश्विक सत्य सांगून मोकळा झालास की रे......
लाख दंडवत रे तुला.
है शाब्बास रे केशवा!
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी?
ठेवला आहेस मज ओलीस तू!
मी असे लाचार नवरा शेवटी
शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू...
एकदम दे दणादण! ;)
चतुरंग
ऐकुनी आरोह.....
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी?
ठेवला आहेस मज ओलीस तू!
मी असे लाचार नवरा शेवटी
शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू...
जबरदस्त.....
मदनबाण.....
झक्कास....
एकदम ग्रेट.......
वा!
मी असे लाचार नवरा शेवटी
शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू...
वा वा! सुंदर रे केशवा....
आपला,
(मिपाकर) तात्या.
हाहाहा
पाहिले मी काल, आवडलीस तू
काय नखरा, काय रुपडे, 'पीस' तू
अर्थ भलते लावले शब्दांतले
चंडिका होउन मग थरथरलीस तू
लोक जमले ऐकुनी आरोह तो
येव्हढे जोरात ओरडलीस तू!!
हाहाहा
(वाचक)बेसनलाडू
एकदम
एकदम ढींचॅक......
धन्यवाद!!
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी) केशवसुमार
मस्तच!
लोक जमले ऐकुनी आरोह तो
येव्हढे जोरात ओरडलीस तू!!
क्या बात है!!
मी असे लाचार नवरा शेवटी
शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू...
मार डाला!!!
मस्त!