Skip to main content

संडे स्पेशल (दाल फ्राय, जिरा राईस)

लेखक स्वाती राजेश यांनी गुरुवार, 29/05/2008 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
दाल फ्रायः साहित्यः पाव कप मुग डाळ पाऊण कप पाणी १ चिमूट हळद वरील एकत्र करून मऊ शिजवून घोटणे. ३ टे.स्पून तेल १ च.जिरे २-३ सुक्या मिरच्या १/२ च.आलं पेस्ट १ च.लसूण पेस्ट १/४ कप बारीक चिरलेला कांदा १/४ कप बारीक चिरलेला टोमॅटो १/२ टे.स्पून कसुरीमेथी १ चिमूट हळद २ टे.स्पून कोथिंबीर १/८ च.अनारदाणा मसाला(पावडर) १ च.बटर मीठ १.३ टे.स्पून तेलावर, जिरे परतणे.

वटहुकूम...

लेखक आणिबाणीचा शासनकर्ता यांनी गुरुवार, 29/05/2008 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सभासदांना सप्रेम नमस्कार वि वि, भाषाशास्त्र, भाषाशुद्धी, भाषेचा विकास, भाषेचे व्याकरण, शुद्धलेखन व त्याचे नियम, संस्कृतचा मराठी भाषेवर कसा प्रभाव आहे, इत्यादी विषयांवर मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर आजपासून लेख व प्रतिसादाच्या रुपात काहीही लिहिण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. मिसळपाव डॉट कॉमला सर्व भाषंबद्दल अत्यंत आदरच आहे परंतु प्रत्येक संकेतस्थळाची काही घोरणे असतात व त्यानुसारच वरील वटहुकूम आम्ही जारी करत आहोत.

गाजरहलवा

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 29/05/2008 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य-७ते८ गाजरे,१/२ ते ३/४ वाटी साखर, १०%फॅटवाले दूध १/२ते ३/४ खोका किवा आटीव दूध १ ते १.५कप ,१चहाचा चमचा साजूक तूप, वेलचीपूड,बदाम,पिस्ते इ.चे तुकडे कृती-साले काढूनएका गाजराचे ३ ते ४ तुकडे करा,ती उकडून घ्या.

स्वप्नपरी

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 29/05/2008 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते ती स्वप्नपरी ती ती धुंद कळी ती ती रातराणी ती माझी ती मुग्ध बासरी मंद हासरी प्रिया सखी फुलराणी श्वासात गंध ओठात चंद्र मग रात धुंद ही होते प्रणयास रंग रेशमी संग मग कळी फुलुनि येते ती स्वप्नपरी ती --- जागती रात धुंदीत गात कसली पहाट मग होते जुळवीत सूर नादात चूर स्वप्नात रोज ती येते ती स्वप्नपरी ती ---
Taxonomy upgrade extras

गुलाबाचे काटे

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 29/05/2008 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे मैत्री मध्ये आपुल्या या भांडणच होती फार रुसुनिया कित्येकदा शब्दांचीच मारामार गुलाबाचे फुल देता काटे तुला बोचतात शब्द तुझे प्रेममय रातदिन टोचतात शब्दाविना फुलाविना तुझे माझे आहे नाते म्हणुनच गुलाबाच्या काट्यांचीही ओढ वाटे
Taxonomy upgrade extras

भासा सूद्धी

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 29/05/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
भासा सुद्धी चे हे कैसे कैसे चाळे चालले आहेत सध्या संस्थालावर ? लळीतांचा सुकाळु तेथ आनंदाचा दुष्काळु.... घालोन येकमेकांच्या गळ्यात गळु .... आनन्दे वोरडोनी अक्कल पाजळु... दुसर्‍याते असूद्ध म्हणोनी त्याते बहुत घोळु ऐसे शेवाळु हिरवाळु आम्ही बरळु लोका येई पोटाते गोळु आम्ही इये मराठीचे भासा वळु ऐसी मनोगते रोजच खेळु......... कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु...
Taxonomy upgrade extras

बाकी शून्य ...कादंबरी परीक्षण

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 29/05/2008 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
जय सरदेसाई नावाच्या सांगलीतल्या एका हुशार , संवेदनशील माणसाची शाळेपासून ( १९७० ते १९८६) इंजिनियर होईपर्यंत...मग पुढे आयुष्यातील एक से एक वळणांची ही एक बरीचशी इण्ट्रेष्टिंग गोष्ट...( लेखक कमलेश वालावलकर ,राजहंस प्रकाशन ,पृष्ठे ४२५, किंमत १७० रु.) जयची शाळा, मित्र, अभ्यासातली हुशारी, दहावी बोर्डात येणे, खच्चून अभ्यास, बी ई करताना नाटकाचा नाद लागणे, लेखनाचा छंद, सिनेमात जायचा निश्चय, डीग्री घेतल्यानंतर मराठी सिनेमात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम,पुण्यामध्ये फिल्म बनवणे शिकायसाठी आगमन, पार्टटाईम पत्रकारिता, दिल्लीची बिनधास्त पत्रकार मैत्रीण, नाशिकमधल्या एका कंपनीत मार्केटिंगचा जॉब, प

भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 28/05/2008 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे. मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले :) म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते.