संडे स्पेशल (दाल फ्राय, जिरा राईस)
दाल फ्रायः
साहित्यः
पाव कप मुग डाळ
पाऊण कप पाणी
१ चिमूट हळद
वरील एकत्र करून मऊ शिजवून घोटणे.
३ टे.स्पून तेल
१ च.जिरे
२-३ सुक्या मिरच्या
१/२ च.आलं पेस्ट
१ च.लसूण पेस्ट
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप बारीक चिरलेला टोमॅटो
१/२ टे.स्पून कसुरीमेथी
१ चिमूट हळद
२ टे.स्पून कोथिंबीर
१/८ च.अनारदाणा मसाला(पावडर)
१ च.बटर
मीठ
१.३ टे.स्पून तेलावर, जिरे परतणे. त्यात सुक्या मिरच्या,आलंपेस्ट्,लसूणपेस्ट, कांदा घालून परतणे.नंतर टोमॅटो घालून चांगले परतणे.कसूरी मेथी व हळद घालून वरील घोटलेली डाळ घालणे व पाणी घालणे.कोथिंबीर, अनारदाणा मसाला, बटर व चवीनुसार मीठ घालून उकळणे.
२.कढईत ३ परत ३ टे.स्पून तेल, पाव च.जिरे,१ सुकी मिरची,१/२ च.मिरची बी परतणे.
दालफ्रायवर कसुरीमेथी,१ चिमूट तिखट घालणे व वरील फोडणी घालणे.गरम जिरा राईस बरोबर सर्व्ह करणे.
टीपः कृती १ नंतर व फोडणी द्यायच्या अगोदर स्मोक देतात....(कोळसा तापवून) पण ते काही दर वेळी शक्य होत नाही. पण त्यामुळे त्याची चव खमंग लागते.
जिरा राईसः
साहित्यः
१ वाटी दिल्ली राईस
७ वाट्या पाणी
१ टे.स्पून तेल
मीठ
फोडणी साठी: दिड टे.स्पून तेल, २ च.जिरे, २ हिरव्या मिरच्या, १/२ च. लसूण पेस्ट(ऐच्छीक), १/४च.अजिनोमोटो
जाड बुडाच्या पातेल्यात ७ वाटी पाणी, १/२ टे.स्पून तेल घालून उकळी आल्यावर १ वाटी तांदुळ घालणे, गॅस मोठा ठेवणे. झाकाण न ठेवता उकळणे. शिजल्यावर चाळणीत घालून नळाखाली धरून गार करणे. २ तास निथळणे.
२ तासाने वरील फोडणी करून त्यात भात परतणे. कोथिंबीर घालणे व सर्व्ह करणे.
वाचने
19113
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
वाव
वरदा,
आता अजुन प्रश्न
In reply to आता अजुन प्रश्न by वरदा
उत्तर....
In reply to उत्तर.... by स्वाती राजेश
हम्म्म..
In reply to आता अजुन प्रश्न by वरदा
काळजी! :)
In reply to काळजी! :) by विसोबा खेचर
तात्या
In reply to तात्या by वरदा
मस्त उत्तर!
>> आपण
आपण
अरे वा
अगदी सही डिश.
मस्त!
सुंदर पाकृ!
भात..
छान पाकृ.
In reply to छान पाकृ. by चित्रा
एक्झॅक्टली
अरे वाह
In reply to अरे वाह by आवडाबाई
कसेही...
In reply to अरे वाह by आवडाबाई
ढाबा डाल..
छान..
In reply to छान.. by स्वाती दिनेश
अरे वा
आंबट...
In reply to आंबट... by प्रभाकर पेठकर
दोन्ही..
In reply to दोन्ही.. by स्वाती दिनेश
छे: छे:...
In reply to छे: छे:... by प्रभाकर पेठकर
ओके..