Skip to main content

शिक्षणाचे मानसशास्र: गोष्ट सांगा आणि बीजगणित शिकवा

लेखक राजा वळसंगकर यांनी रविवार, 21/02/2021 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी घेऊ का विचारायला म्हणून सायली बंगल्याचे गेट उघडून आत गेली. दरवाज्यावर बेल होती, पण ती वाजली नाही, म्हणून सायलीने दरवाज्यावर थाप मारली. थाप हलकीच होती पण दरवाजा थोडा उघडला, बहुतेक तो लॉक केला नव्हता. कुणी आहे का घरी म्हणत तिने दरवाजा अजून थोडा उघडून विचारलं, पण काही उत्तर आले नाही. सायलीने आता दरवाजा पूर्ण उघडला आणि आत डोकावलं... **************************************** ना मी शिक्षक आहे ना गणित तज्ञ ना कथाकार. मी इन्स्ट्रक्शनल डिझायनर - इ लर्निंग कोर्सेसचे स्क्रिप्ट लिहिणारा व्यावसायिक. त्या कलेचा/विद्येचा/ज्ञानाचा उपयोग करून शैक्षणिक साहित्य निर्मितीचे प्रयत्न करतोय. अभिप्राय, सूचना, बकेट लिस्ट ... जरूर कळवा. स्तुती आणि उत्तेजना बरोबर मनातलं लिहायला हरकत नाही. गणिताचे शिक्षण गोष्टीचा आधार घेतच पुढे कसे जाईल हा कळीचा मुद्दा... **************************************** पुण्याचा दक्षिणेकडे चांदणी चौकातून बाणेरकडे जाताना उजवीकडे मोठ्या 6 मजली बिल्डिंग आहेत, त्यातल्या एका बल्डिंग मध्ये सायली राहाते. बिल्डींगच्या मागच्या बाजूला एक मोठी बंगल्याची सोसायटी आहे. मोठ्या बिल्डिंग मुळे रस्त्यावरून दिसत नव्हती. सोसायटी टेकडीच्या पायथ्या पर्यंत उभी आडवी ऐसपैस पसरली होती. सोसायटीतील घरं छोटी पण टुमदार होती. प्रत्येक घराच्या बाजूला मोकळी जागा होती. कुपणाला झुडपं, वेली, फुलांची झाडे लावून घरं आपापली स्वतंत्र ओळख सांगत होती. सि एच इ एम आय डी एल ऑफिसर्स को ऑप सोसायटी असं काहीस लांबलचक नाव होतं. त्यामुळे सगळे त्याला केमिड सोसायटी म्हणायचे. केमिड सोसायटीतून टेकडीतल्या खाणीपाशी जायला एक पाऊल वाट होती. निचरा नसल्यामुळे खाणीमधे पावसाचे पाणी साठले होते. पाण्यात शेवाळे तर इतकं होते की पाणी दिसायचेच नाही, एक हिरवा गालिचा घातल्यासारखे वाटायचे. खाणीच्या आतली बाजू सरळ एकसांध काळा दगडाची भिंत बांधल्या सारखी तुळतुळीत दिसायचा. खाणींच्या बाजूने वर जायला पाऊलवाट होती. तिथुन वर गेलं की डाव्या बाजूला चतुःश्रींगीची टेकडी आणि उजव्या बाजूला वेताळ टेकडी. सरळ पुढे खाली गोखलेनगर. सायली शनिवार रविवार संध्याकाळी तिच्या चार बेस्ट फ्रेंडसच्या ग्रुपबरोबर टेकडीवर जायची. बिल्डिंगमधे आणि आजूबाजूला मुलं बरीच होती पण सायलीच्या बेस्ट फ्रेंड ग्रुपमधे चोघेच होते. कधीकधी परीक्षा आणि क्लासमुळे चौघांच्या वेळा जुळत नव्हत्या, पण सायलीला एक्सप्लोर करायला आवडायचं म्हणून ती एकटी सुद्धा टेकडीवर जात होती. खूप लोक टेकडीवर जायचे त्यामुळे सायलीच्या आई काही तिला ग्रुपबरोबर जाऊ द्यायची. पण आज ती एकटीच होती. चारच्या सुमारास बोर झालं म्हणून टेकडीवर निघाली. ऊन खूप होत म्हणून अर्ध्यातूनच मागे वळली. त्यात तिला खूपच तहान लागली होती. केमिड सोसायटीच्या पहिल्याच घरात बाहेर पाण्याचा नळ होता. पाणी घेऊ का विचारायला म्हणून सायली बंगल्याचे गेट उघडून आत गेली...

वार्‍याने पेटते रान आता हे ..

लेखक गणेशा यांनी रविवार, 21/02/2021 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
घामाच्या चिंब भरलेल्या सदर्‍याला ठिगळे अनेक रंगबेरंगी.. पोटाच्या खळगीसाठी उगाच चालली बेसुमार झीज पायाची .. वार्‍याने पेटते रान आता हे कशास विचार फुका.. होरपळले शेत जरी हे ढेकळाचा रंग काळा तो काळाच.. ठिंणगी बनलेला विचार तुझा तू दूर आकाशातील तारा .. ओसाड ह्या जगण्यावरती उगा बुजगावण्यांचा पहारा.. दगडाला कुठे फुटतो पाझर ? कुठे शोधु देवपण त्याच्यात ? जन्मलो मातीत या पुन्हा मातीत मिटण्यासाठी... -- शब्दमेघ (शीघ्रकाव्य, २१-०२-२०२१)
काव्यरस

▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ █ बरबादीचा आलम █ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 21/02/2021 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्यातल्या रोजनिशीतल्या घडामोडी 1.व्यवस्था ही शहर तुम्हाला अशीच चालवाचीयत तर तस सांगा, लोकांना जेरीस आणून आपण मात्र सुशेगाद जगायचं, आपल्या सोयीच्या गोष्टीसाठी सगळे नियम धाब्यावर बसवायचे, निवडणुका, प्रकाशन सोहळे, जय्यत तयारीने होणारे खाजगी समारंभ यासाठी कुठे असते सोशल डिस्टसिंग. लोकांना दररोज करावा लागणारा सार्वजनिक बस वाहतुकीचा प्रवास हा सध्या "आज कूछ तुफानी करते है " या कॅटेगरीतला.

प्रवासी

लेखक आर्णव यांनी रविवार, 21/02/2021 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
ती पहाट निरागस होती, क्षितिजावर होती लाली नादातुन निर्मित झाली, अनंत अगम्य भूपाळी भोवताल न्याहळत होतो, अमृत प्राशन करताना अमरत्व ओढुनी आलो, होतो मी कोणे काळी असंख्य मनोहर स्वप्ने, ते लांब गहिरे श्वास अतर्क्य, अबाधित होता, विचार-कृती सहवास आनंद सोहळ्यामध्ये, मी भिजलो अनंत काळी अद्वैत भोगले होते, मी काही वेळ सकाळी दिवसा चित्र पालटले, मयसभा संपली आता सत्य उलगडत गेले, मज प्रारब्धाची गाथा जीव तोडून जोडून पळलो, दिवसा मी रानोमाळी दिवसाचा जोशच न्यारा, दिवसाची नशा निराळी ती चाहुल नश्वरतेची, नाशाचे गूढ इशारे ते रणरणते निखारे, भयाण वादळी वारे मिरवले मुखवटे खोटे, रमताना माया जाळी धुक्यात

आपलेच दात.....

लेखक मका म्हणे यांनी शनिवार, 20/02/2021 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी दुधाचे दात पडून त्या जागी नवीन यायचे. वाईट वाटायचं एखादा दात पडून गेला की काही वेळ कधी कधी तर, असा पडलेला दात, आठवण म्हणून जपून ठेवायचो दिवसेंदिवस सवयीने जीभ तिथं जायची आणि मग आता तिथे काहीच नाही हे लक्षात आल्यावर परत यायची काही दिवस तर तो एक चाळाच होऊन बसला होता मनाला मग पुन्हा त्या जागी एक नवीन दात दिसायला लागायचा हळुहळु.. हा दात इतर आधीच असलेल्या दातांमध्ये स्वतःला सामावून घ्यायचा याचा आकार, ठेवण निराळी असायची हा अधिक तजेलदार, बळकट आणि सशक्त असायचा, इतरांच्या तुलनेत आरशात स्वतःला पाहताना या नवीन दातामुळे चेहऱ्याला आलेल्या वेगळेपणाकडे लक्ष जायचं... काही नवे, काही जुनेच असे घेऊ

थोडासा रुह-ओमानी हो जाय...

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 20/02/2021 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
थोडासा रुह-ओमानी हो जाय... "मरू"स्थळ हे नाव सार्थ ठरवणारे "वाळ"वंटी प्रदेश अजिबात आवडत नसल्यामुळे प्रत्यक्षात तर दूरच पण नकाशात देखील त्या प्रदेशात मी कधी फिरकत नाही. मनुष्य "जगू" शकेल अश्या सर्व साधनांचा अभाव असलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या "मरु"भूमीला कसल्या आधारावर "सहारा" नाव दिले असावे याचा विचार करताना गम्मत वाटते. शाळेत असताना भूगोलाचे शिक्षक आणि त्यांची शैली इतकी रुक्ष होती की त्यापुढे अशी मरुस्थळेदेखील हिरवी-गार वाटावीत.

मराठेशाहीचे अखेरचे सेनापती - बापू गोखले

लेखक kvponkshe यांनी शुक्रवार, 19/02/2021 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नजीक तळेखाजण येथे पिरंदवणे (तळेखाजण वाडी) येथे गोखले घराणे वसले होते. लष्करी पेश्याची कोणतीही परंपरा असण्याची शक्यता नसलेल्या या घराण्यात १७७१ मधे नरहर उर्फ बापू गोखले याचा जन्म झाला. बापुंचे वडील गणेशपंत, चुलते मोरोपंत व लक्ष्मणपंत हे शेतकरीच असावेत. बापूंच्या आई विषयी माहिती मिळत नाही.पितृसहवास बापुना किती लाभला&nbsp

प्रवास (भाग 8) (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 19/02/2021 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास भाग 8 पोलीस स्टेशनमध्ये शिरताच राठींनी भिकुला लॉक अप मध्ये टाकले आणि अनघा-मनाली-मंदार-नवीन यांना घेऊन ते त्यांच्या केबिनमध्ये आले. त्यांनी एका हवालदाराला या मुलांसाठी पाणी आणायला संगितले आणि त्यांना समोर बसवत म्हणाले;"तुम्हाला जे माहीत आहे ते सगळं सांगा आता." नवीन बोलायला सुरवात करणार होता; इतक्यात अनघाने इन्स्पेक्टर राठींना विचारलं;"इन्स्पेक्टर, आनंद कुठे आहे? मला एकदा त्याला बघायचं आहे." राठी शांतपणे म्हणाले;"तुम्ही अनघा न? आनंद...." राठींना बोलू न देता मनाली एकदम म्हणाली;"इन्स्पेक्टर, त्यानेच तुम्हाला पाठवलं नं आमच्यासाठी. मला वाटलंच.