Skip to main content

रवा डोसा

लेखक वैशाली हसमनीस यांनी गुरुवार, 19/06/2008 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
रवा डोसा साहित्य---प्रत्येकी एक कप रवा,मैदा,तांदूळ पीठ,कांदा बारीक ,मीठ, जिरे, काजूकाप,तेल,डोसा तवा क्रुती-वरील मिश्रणात पाणी घालून ते अगदी पात्तळ करावे.तवा तापवून घ्यावा.तयार मिश्रण साधारणपणे अर्धा कप तव्यावर ओतावे.बाजूने तेल सोडावे.मिश्रण पात्तळ असेल तरच जाळी पडेल.डोसा कोणत्याही चट्णीबरोबर खावा.

स्वयंपाकी देता का हो कोणी ??

लेखक अभिरत भिरभि-या यांनी गुरुवार, 19/06/2008 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंपाकी देता का हो कोणी ?? ।। श्री अन्नपुर्णा देवी प्रसन्न ।। बंग़ळूर ज्येष्ठ कृष्ण १ पोटासाठी दाही दिशा म्हणत अनेक मिपाकरांप्रमाणे आम्ही बेन्गळुरी चाकरी पत्करली त्याला आता जवळपास दोन वर्षे होत आली. आता रोज हाटेलातले चापायला मिळणार म्हणुन झालेला आनन्द अजुनही आठवतो. नव्याच्या नवलाईने पहिला महिना पनिर अमृतसरी, दाल साग, दहीवाले आलु वगैरे मनसोक्त ओरपले. पुण्यात असताना ही मन्डळी फ़ारशी चाखली नव्हती. तसे हे प्रकार बरेच आवडले अजुनही आवडतात. पण फ़ुल्ल मिल्स अर्थात पूर्ण जेवणाची सर यापैकी कशालाच नव्हती.

मिसळपाव राज्यस्तरिय दंगल

लेखक आनंदयात्री यांनी गुरुवार, 19/06/2008 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, परवा दिनांक २१ जुन २००८ रोजी मौजे पुणे येथे आपल्या लाडक्या मिसळपाव वरिल रथी, अतिरथी, महारथी मल्लांची दंगल आयोजित करण्याचा मानस आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन दस्तुरखुद्द मिपाच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचे सरदार तसेच आद्य सात्विक कट्टा प्रणेते महारथी छोटा डॉन उर्फ ह.भ.प. बाबा सात्विक महाराज बंगळुरकर उपस्थित रहाणार असुन ब्रह्मानंदी टाळी लागल्यावर मिपाच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या रम्य कथा ते सांगणार आहेत. या काथ्याकुटाचा उद्देश इच्छुक मल्लांची (अन मल्लीणींची पन ;) ) नावनोंदणी तसेच आखाड्याची जागा अन सोयीची वेळ ठरवणे हा आहे.

संवाद

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 19/06/2008 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात याय्चे ते कागदावर उतरवायचो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंत-यापासुन सुरु व्हावं तसं. जसे सुरु होतात तसेच संपतातही हा प्रकार जरा वेगळा असल्यामुळे मि.पा.

फादरस डे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 19/06/2008 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचा आशय असा आहे की आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले "मूड" संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही.ह्या कवितेत तिच मध्य कल्पना आहे. फादरस डे वाटेत एका अनोळख्याला जवळ जवळ आपटलो "माफ करा"असे म्हणून मी त्याच्या पासून सटकलो "करा माफ"मला पण म्हणत थांबला तो क्षणभर औचित्याच्या वागण्याने सुखावलो आम्ही दोघे वरवर आपल्या घरी स्थिती असते निराळी लाहान थोरासी चटकन आपण वागतो फटकून झाली त्यादिवशी गम्मत होतो कामात मी दंग चिमुकल्या माझ्या मुलाने के

ए मालिक तेरे बंदे हम! (रौशनी - अवांतर..!)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 19/06/2008 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मडळी, आज रौशनी -५ हा भाग शैलेन्द्र यांनी प्रतिसाद देऊन वर आणला आणि मी पुन्हा एकदा रौशनीच्या आठवणीत गुंतलो. दिवस थोडासा अपसेटच गेला. मंडळी, रौशनीचं लेखन बरंच म्हणजे बरंच लांबलं आहे हे अगदी कबूल! तसं माझं लेखन सुरू आहे, पूर्णही होत आलं आहे आणि मी ते वेळोवेळी सेव्हही करून ठेवलं आहे. आता लेखन जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच ते प्रसिद्ध करीन म्हणजे वाचकांची गैरसोय होणार नाही. असो.. मंडळी, रौशनी हा माझ्या आयुष्यातील एक वेगळाच अनुभव. ही बया खूपच वेगळी होती.

कालाय तस्मै नम:

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 19/06/2008 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ म्हणाली दुपारला ही संध्याकाळ, रोज कुजबुजत असते काळोखाशी ऐकून हे, दुपार सांगे तिला (सकाळला) घेऊन तूं पण जाशी की पहाटेला रोज फिरायला अन, देई निरोप तुला ती (पहाट) लगेच,पाहुनी सूर्याला ऐकूनी त्यांचा संवाद दिवस म्हणे रात्रीला दोष असे हा सूर्याचा करी तो उदय अन अस्थ दिवसाचा ऐकून हे, रात्र सांगे दिवसाला दोश नको देऊं तूं सूर्याला दोष असे हा पृथ्वीचा गर,गर फिरुनी सूर्याभोवती जन्म दिला तिने ह्या सर्वांना पाणावल्या डोळ्याने म्हणे पृथ्वी सूर्याला भलेपणाचे "दिवस"संपले जन्म देऊनी ह्या सर्वांना अन मिळे दोष आपल्या दोघांना स्तिथप्रद्न्य तो सूर्यनारायण समजावी त्या माउलीला आठवशी त्या सुभाषीताला कालाय त

(शेठहो, थांबा जरा...!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 18/06/2008 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णी ह्यांची 'शब्दहो, थांबा जरा...!' ही गझल वाचून नवीन 'अर्थव्यवस्थेतील' काही दृश्ये आमच्या डोळ्यांसमोर तरळून गेली! ;) ......................................... शेठहो, थांबा जरा...! ......................................... शेठहो, थांबा जरा! ते गुंफणे 'अर्था'त गाणे! आजच्यापुरते तरी घ्या, घ्या तुम्ही थोडे दमाने!! 'व्यक्त' असता नेहमी... 'अव्यक्त'ही थोडे असू द्या ! का अशी खालून थैली? 'येथे' नको 'तेथे' असू द्या ! लक्ष ठेवी का शिपाई?
Taxonomy upgrade extras