Skip to main content

आली गौराई अंगणी....

लेखक धोंडोपंत यांनी बुधवार, 02/07/2008 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी, शके १९३० - मंगळवार, १ जुलै २००८ सकाळी नेहमीप्रमाणे कन्सलटेशन सुरू होते. तेवढ्यात मोबाईल खणाणला. ऍड्रेस बुकातला नंबर दिसत नव्हता म्हणजे नेहमीच्या संपर्कातील व्यक्ती नसावी. आमची महत्वाच्या समस्येबद्दल जातकांबरोबर चर्चा चालू होती म्हणून कट केला. लगेच पुन्हा फोन. पुन्हा कट. तिसर्‍यांदा फोन आल्यावर पर्याय नव्हता. कोणीतरी भयंकर संकटात असेल तरच असे दोनदा फोन कट केल्यावर तिसर्‍यांदा फोन करतं. फोन उचलला. समोरून ते गृहस्थ किंचाळले, "अहो पंत, फोन काय कट करताय सारखा. मी कितीवेळ ट्राय करतोय. एक तर इथे पावसामुळे पाणी साचलाय. घरचा फोन बंद आहे.

ज्यूलीची श्रद्धा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 02/07/2008 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
" मी एक साधारण माणूस आहे.फक्त मी ज्याच्यावर विश्वास ठेवते,ज्यांच्यावर माझी श्रद्धा आहे त्यांवर मी लक्ष ठेवते." "ज्युली तू किती ग्रॆट आहेस " असं मी तिला म्हणालो. त्याचं असं झालं, माझी मोठी वहिनी गोव्याची.पेडण्याला तिचे आईवडिल राहायचे.लहानपणी माझ्या वहिनी बरोबर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या माहेरी अनेक वेळा गेल्याचं आठवतं. उन्हाळ्यात विशेष करून गोव्यात फळफळावळ,फुलं आणि मासे यांची लयलूट असायची.मांडकूर आंबा मला खूपच आवडायचा.तसं पाहिलं तर आंब्यांचा राजा हापूस आणि त्यात वाद नाही.हापूस आंबा नीट पिकल्यावर त्याचा जो गंध दरवळतो तो कुणाकडून लपून राहणार नाही.तसंच हा हापूस आंबा नीट पिकल्यावर कापला की त्

व्याकरण आणि वृत्त

लेखक संदीप चित्रे यांनी मंगळवार, 01/07/2008 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी व्याकरण -- विशेषतः वृत्ते (भुजंगप्रयात, मंदाक्रांता इ.) ह्यांची सोपी माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे का?

ही केशरी संध्याकाळ

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 01/07/2008 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी-शीव शंकर वशिष्ट) ही केशरी संध्याकाळ छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार ते दोन दोन विहंग उडून गगनी होती धूंद लक्षावधी गगने येवूनी करिती माझ्या मनी आक्रंद सप्तरंगात मी हरवली झुळझुळ झऱ्यात मी न्हाहली छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार फुलांचा सुगंध घेवूनी हा वारा येवूनी बिलगे माझ्या शरिरा रंगात मिसळूनी रंग गगनी दिसती हे पतंग विहार करिती एकमेका संग ही केशरी संध्याकाळ छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार श्रीकृष्ण सामंत

पाब्लो नेरूदा - I do not love you... अनुवाद

लेखक मनिष यांनी मंगळवार, 01/07/2008 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
पाब्लो नेरूदा’ हे नोबेल पारीतोषक विजेते कवी. विसाव्या शतकातील (१९०४ - १९७३) एक अतिशय प्रभावशाली आणि श्रेष्ठ कवी. त्यांच्या कविता बर्‍याचदा अतिशय गुढ (surrealist?), इंटेन्स अशा आहेत. त्या मुळ स्पॅनिश भाषेत लिहिल्या असून त्यांचे इंग्लिश अनुवाद सहजपणे उपलब्ध आहेत. माझा हा मराठी अनुवादही अशाच एका इंग्लिश अनुवादावरुन घेतला आहे, त्या अर्थाने तो double-indirection असा आहे; तो कितपत जमला आहे, ते अवश्य सांगा...मला त्यातली वाक्यरचना फार गुंतागुंतीची झाली आहे असे वाटते, पण ती सहज, सोपी अशी नाही रुपांतरीत करता येत आहे!

पायसम

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 01/07/2008 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
पायसम साहित्य--एक वाटी बारीक शेवया(जाड असल्यास अर्धा वाटी),एक लिटर दूध,दीड वाटी साखर,पाव वाटी साबूदाणा,वेलचीपूड,काजूकाप,पिस्ता कृति-प्रथम साबूदाणा पाण्यात अर्धा तास भिजवावा,दूध आटवत ठेवावे,शेवया उकळत्या पाण्यात एक मिनिट टाकून त्यातील पाणी काढून टाकावे,नंतर आटवत ठेवलेल्या दूधात शेवया व साबुदाणा घालावा,चवीनुसार साखर घालावी,साखर नीट विरघळेपर्यंत दूध हालवित रहावे,थंड झाल्यावर वेलचीपूड,काजूकाप,पिस्ताकाप घालावेत. हा पदार्थ अतिशय रुचकर लागतो.

मामाच्या गावाला

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 01/07/2008 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
जायचेना आपल्याला, मामाच्या गावाला आगगाडीत बसून, गंमत बघायला
गाडीच्या प्रवासात, मी जागाच रहाणार बर्थवरून सारखा, खालीवर खेळणार
मला नको टिफीनचा, चिवडा लाडू कोरडा बोलाव फेरीवाल्याला, घे गरम वडा
इतका वेळ इथे, गाडी थांबली कशाला? उतरून खाली धक्का, मारू मी डब्याला?
पुलावरून जातांना, धडधड आवाज होती पडणार नाही ना खाली, मला वाटते भीती
Taxonomy upgrade extras