मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ही केशरी संध्याकाळ

श्रीकृष्ण सामंत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
(अनुवादीत. कवी-शीव शंकर वशिष्ट) ही केशरी संध्याकाळ छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार ते दोन दोन विहंग उडून गगनी होती धूंद लक्षावधी गगने येवूनी करिती माझ्या मनी आक्रंद सप्तरंगात मी हरवली झुळझुळ झऱ्यात मी न्हाहली छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार फुलांचा सुगंध घेवूनी हा वारा येवूनी बिलगे माझ्या शरिरा रंगात मिसळूनी रंग गगनी दिसती हे पतंग विहार करिती एकमेका संग ही केशरी संध्याकाळ छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार श्रीकृष्ण सामंत

वाचने 2569 वाचनखूण प्रतिक्रिया 4

शितल Tue, 07/01/2008 - 23:03
फुलांचा सुगंध घेवूनी हा वारा येवूनी बिलगे माझ्या शरिरा रंगात मिसळूनी रंग गगनी दिसती हे पतंग विहार करिती एकमेका संग हे कडवे मस्तच

In reply to by अरुण मनोहर

अरुण मनोहर , आपल्याला कविता आवडली हे वाचून बरं वाटलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com