Skip to main content

पायसम

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 01/07/2008 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
पायसम साहित्य--एक वाटी बारीक शेवया(जाड असल्यास अर्धा वाटी),एक लिटर दूध,दीड वाटी साखर,पाव वाटी साबूदाणा,वेलचीपूड,काजूकाप,पिस्ता कृति-प्रथम साबूदाणा पाण्यात अर्धा तास भिजवावा,दूध आटवत ठेवावे,शेवया उकळत्या पाण्यात एक मिनिट टाकून त्यातील पाणी काढून टाकावे,नंतर आटवत ठेवलेल्या दूधात शेवया व साबुदाणा घालावा,चवीनुसार साखर घालावी,साखर नीट विरघळेपर्यंत दूध हालवित रहावे,थंड झाल्यावर वेलचीपूड,काजूकाप,पिस्ताकाप घालावेत. हा पदार्थ अतिशय रुचकर लागतो.

वाचने 4265
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

वाह! मस्तच लागतं हे! पण, त्यात साबूदाणा घालुन केलं नाहीए कधि, करुन बघायला हवं! -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

पायसम आपले फारच आवडते. धन्यवाद.

वा! पायसम हा मस्तच प्रकार आहे. आपल्याला लई आवडतो..:) धन्यवाद वैशाली. तात्या.

आम्हाला एकदा बोलवा ना तुमच्याकडे जेवायला वैशालीताई...सगळ्या दाक्षिणात्य पाक्रु मस्त देताय तुम्ही..... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

:SS या ना वरदाताइ,आमच्याकडे जेवायला मलेशियात यावे लागेल,चालेल तुम्हाला?

वैशाली ताई (सगळ्यांना ताई म्हटले तर आमचि पंचाईत :-)), मी आता मेलबोर्नला मलेशियाला मार्गे जाणार आहे, तेव्हा येतो तुमच्याकडे.मला आमंत्रणाची आवश्यकता नाही. असो, कोणी भारतात आहे का?