Skip to main content

दिवा

लेखक आंबोळी यांनी शुक्रवार, 18/07/2008 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा स्वाती फडणीस यांची "गोडवा" आणि बेसनलाडू यांची "सोडवा" मांडी घालून तसाच ठेउ, खांदा खांदा देत राहू ! खांदेपालटाला तिरडी जरा, खाली उतरवून ठेवू !! काळ्या करड्या लाकडात, जलद आग लाऊ ! धूर ज्वाला निरखत , जीवनाचा अंत पाहू!! चल पुन्हा घराकडे , पाणी अंगावर घेऊ! गेलेल्याच्या आठवणी, दिवा माजघरी लावू !! ======================= आंबोळी.............. १८-०७-२००८

बैल

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 18/07/2008 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच बैल असतो कोणीतरी फटके टाकत असतो आणि आपण पळत असतो फक्त दोनवेळा अन्न आणिउतम निवार्‍यावर खुष असतो मालकाच्या एखाद्या इशार्‍या सरशी ऊर फुटेतोवर धावत असतो. आपण सगळेच बैल असतो मालकाने यावे आपल्या गळ्याखालची पोळी खाजवावी त्यानी आपली पाठ झाकावी कधी काळी गुळपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो आपण सगळेच बैल असतो आपल्याल आपण बडवले गेलो आहोत याची काही लाज नसते ती जाणीवच थिजलेली असते उन्नत ध्येय वगैरे जाणीव कधीच निजलेली असते वेसण काढुन टाकली तरी आपण तसेच असतो फार तर नव्या मालकाच्या शोधात असतो आणि नव्या मालकाकडे गेलो की जुना कसा चांगला होता याची गाणी गात बसतो आपण सगळेच बैल असतो
Taxonomy upgrade extras

तृप्ती

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 18/07/2008 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा गोडवा , जोगवा आणी सोडवा ---------------------------------------------------------------------- तृप्ती . घरी पण असेच राहू, काव काव नको करु ! कामावरच टेन्शन जरा, खाली उतरवून ठेवू !! उद्याच्या करड्या दुनियेत, जलद झेप घेऊ ! नाती पैसा सांभाळत, जीवनाचे ध्येय गाठू !! चल पुन्हा एकदा, जेवण बाहेर घेऊ ! व्हेज नॉन्वेज हॉटेलात, तृप्ती शोधत राहू !! -------------------------------------------------------------------------
Taxonomy upgrade extras

तृप्ती

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 18/07/2008 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा गोडवा , जोगवा आणी सोडवा ---------------------------------------------------------------------- तृप्ती . घरी पण असेच राहू, काव काव नको करु ! कामावरच टेन्शन जरा, खाली उतरवून ठेवू !! उद्याच्या करड्या दुनियेत, जलद झेप घेऊ ! नाती पैसा सांभाळत, जीवनाचे ध्येय गाठू !! चल पुन्हा एकदा, जेवण बाहेर घेऊ ! व्हेज नॉन्वेज हॉटेलात, तृप्ती शोधत राहू !! -------------------------------------------------------------------------
Taxonomy upgrade extras

कृतज्ञता.....गुरुपौर्णि,एनिमित्त लिहिलेला एक लेख

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 18/07/2008 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार "मिपा" कर आणि मिपा चे समस्त वाचक ! तात्यांनी वर पु.ल.,पंडीत भीमसेन जोशी,कुसुमाग्रज आणि बाबूजी यांच्या फोटोसोबत गुरुपौर्णिमेची एक छान सुरुवात करून दिलीच आहे , त्याचीच जाणीव म्हणून मी मागे लिहिलेला एक लेख माझ्या हस्ताक्षरात इथे प्रसिध्द करत आहे. ही माझी तमाम समाजाला गुरु म्हणून विनम्र अशी मानवंदना आहे !

गं! राहू मी कसा भानावरी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 18/07/2008 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी--हसरत जयपुरी) पाहूनी तुला मजसमोरी केस तुझे भूरभूरती वाऱ्यावरी पदर तुझा तू न सांवरी गं! राहू मी कसा भानावरी नयन तुझे बिलोरी जांबापरी ओठ तुझे थरथरत्या मैखान्यापरी गं! राहू मी कसा भानावरी पाहूनी तुला मजसमोरी हंसणे तुझे जणू वीज चमकणे श्वास तुझे जणू गुलाबी गंध दरवळणे इतर बहकती पाहुनी तुझे ते चालणे पाहूनी तुला मजसमोरी गं! राहू मी कसा भानावरी श्रीकृष्ण सामंत

जोगवा

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 18/07/2008 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा स्वातीताईंची कविता गोडवा जोगवा . घडी भर असेच राहू, बदा बदा नको लिहू! हातामधली लेखणी जरा, खाली उतरवून ठेवू!! जलद विडंबकांचा, कसा आता सूड घेऊ! नीती मती सोडून, प्रतिभेचा तळ गाठू!! चल पुन्हा एकदा, वाचकांना 'पेन' देऊ! आणि वर प्रतिसादाचा, जोगवा मागत राहू!! ======================= केशवसुमार.............. १७-०७-२००८

(सोडवा)

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 18/07/2008 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
सोडवा . राशीला या आलाय राहू, कवितेचा लकडा नका लावू! (गद्यामधल्याच ओळी सगळ्या, खाली-वरती रचून ठेवू!!) श्रोत्यांच्या या करड्या दर्यात, कविता मारुन सूर घेऊ! फुलेपाकळ्या,चंद्रचांदण्या निवडत-चिवडत सरसर पोहू!! विडंबन पडता पुन्हा एकदा, कविता दुसरी उधार घेऊ! तोंड पोळता,बोट चेपता "सोडवा,सोडवा" म्हणत राहू!! ======================= बेसनलाडू.............. १७-०७-२००८ प्रेरणा: स्वातीताई फडणीसांचा गोडवा (हा कलाविष्कार)

गोडवा

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 18/07/2008 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
गोडवा . घडी भर असेच राहू, धाव धाव नको धावू! डोक्यावरच टोपलं जरा, खाली उतरवून ठेवू!! निळ्या करड्या दर्यात, जलद सूर घेऊ! नाती ज्ञाती निरखत, जीवनाचा तळ गाठू!! चल पुन्हा एकदा, पेन उधार घेऊ! खार्‍या खर्‍या पाण्यात, गोडवा शोधत राहू!! ======================= स्वाती फडणीस.............. १७-०७-२००८

फराळी मिसळ - फोटो

लेखक चकली यांनी गुरुवार, 17/07/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
फराळी मिसळीचे फोटो - सर्व मि पा करांकरता! एक -> साजूक तुपावरची बटाटा भाजी दोन -> ऑल टाइम फेव.