Skip to main content

`लेलें'च्या निमित्ताने....

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 19/07/2008 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
`लेलें'च्या `शोधा'त अनेकजण सहभागी होऊ इच्छितात, हे त्या कथेवरील प्रतिक्रियांवरून लक्षात आलं. `.... त्यामुळे हे लेले कोणीही असु शकतात, अगदी आपल्यातही एखादा लेले असेल!' हे केदार जोशींचं मत अगदी पटलं, आणि वाटल, आपण सगळेच त्या `आपल्यातल्या' लेलेंना शोधू या. मागं मी समतोल फाऊंडेशनविषयी लिहिलं होतं. अनेकांनी त्यांना मदत करायची इच्छा व्यक्त केली होती. आज त्यांचा व्याप वाढतोय.

(सिनेमातल्या हिरोंची पूर्वी भरली सभा)

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 19/07/2008 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमातल्या हिरोंची पूर्वी भरली सभा, दाऊद होता सभापती मधोमध उभा. दाऊद म्हणाला, दाउद म्हणाला, "मित्रांनो, खंडणीत सूट, खंडणीत सूट ! तुमचे -आमचे सर्वांचे जुळेल सूत ! या हिरोगीरिचे कराल काय? संजय म्हणाला " ढिशांव ढिशांव करुन मी मारीन लोंका " सल्लू म्हणाला,"ध्यानात ठेवीन, ध्यानात ठेवीन मी ही माझ्या गाडीने असेच करीन असेच करीन" शाहरुख म्हणाला," खुषीत येईन तेव्हा, क_क करीत राहीन." प्रिती म्हणाली, "नाही ग बाई, राणीसारखे माझे मुळीच नाही, खूप खूप रागवीन तेंव्हा क्रिकेट खेळीन, क्रिकेट खेळीन". तुषार म्हणाला, "होईल गोची तेव्हा माझ्या बहिणीची मलाच बंडी." अक्षय
Taxonomy upgrade extras

दे दे गं! सजणी आधार तुझ्या हाताचे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 19/07/2008 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी - समीर) असेल जर तुझ्या मनात यायचे दे दे गं! सजणी आधार तुझ्या हाताचे ठरविले मी हरक्षणी तुजसम रहायचे घे घे रे! सजणा आधार माझ्या हाताचे साथ देई मोर मोरणीला अन घन वर्षाला साथ देई नाव नदीला अन पवन ऋतूला असेल जर तुझ्या मनात यायचे दे दे गं!

अद्दल

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 19/07/2008 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा वर हल्ली विडंबनकारांची मुख्य तक्रार म्हणजे सुमार कच्च्या मालाचा होणारा भडीमार. प्रतिसाद थोडे कविता फार, अशी गत आहे. ज्याला त्याला वाटत असतं आपल्या कवितेचे विडंबन व्हावे. आता तर अष्टप्रधान मंडळात दोन प्रधान विडंबनकार आहेत. मग त्यांना तुम्हा सर्वसधारण सदस्यांना नाराज कसे कसे चालेल ? नवा ताजा दर्जेदार कच्चा माल मिळायला वेळ लागेल.

विडंबक

लेखक कोलबेर यांनी शनिवार, 19/07/2008 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा बैलभाऊंची विजु कविता..... सॉरी विजुभाऊंची बैल कविता..

ने मजसि ने...

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 19/07/2008 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख यापूर्वी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध झाला आहे. परंतु आज गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या गुरुजींना आदरांजली म्हणून हा लेख मला मिपावरही टाकावासा वाटला म्हणून तो मी टाकत आहे. आपल्यापैकी काही मंडळींनी हा लेख वाचलाही असेल. असो, आजचा दिवस थोडासा बेचैनीतच गेला! बाबूजींना या लेखाद्वारे माझी विनम्र आदरांजली! नमस्कार मंडळी, आज गुरूपौर्णिमा. माझी काही दैवते आहेत. त्यांना मी माझ्या गुरूस्थानी मानतो. बाबुजी(स्व.सुधीर फडके), अण्णा(भीमसेनजी) ह्या माझ्या प्रातःस्मरणीय व्यक्ती. २००२ सालची गुरूपौर्णिमा. सकाळची वेळ. गुरूपौर्णिमेनिमित्त दादरला बाबुजींना भेटायला जायचे होते.

प्रो.देसाई म्हणतात........

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 18/07/2008 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
"लोक अलिकडे जरा आपमतलबी,हलक्या मनाचे आणि सहनशिलतेचं वावडं, जास्त असलेले झाले आहेत.इतके लोक संतापी झालेले मी पाहिलेले आठवत नाहीत.कुणी भगवी टोपी घातली कां कुणी हिरवी टोपी घातली म्हणून लोक कोणत्याही थराला जातील असं मला तरी आठवत नाही.जरा गर्दीत कुणाला चुकून धक्का लागला तर अशा थराला प्रसंग जातो हे पण मला आठवत नाही. काय झालं आहे या लोकानां?" प्रोफेसर देसाई मला त्यादिवशी अगदी वैतागून सांगत होते. मला म्हणाले, " जराशी सहनशिलता नक्कीच कामी येते.बरेचसे लोक हल्लीच्या जमान्यात फारच टेन्शन ठेवून असतात.तसंच ते कुठला ही प्रसंग असो त्याला तोंड द्दयायला फारच कमी सोशिक झाले आहेत.असले लोक लवकर म्हातारे होणार.

पानसेबाई

लेखक संदीप चित्रे यांनी शुक्रवार, 18/07/2008 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
“अरे व्वा ! शाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले. आपल्या तिसरीच्या बाई अजून कुणालाच 'चेंगट' किंवा 'शुंभ' म्हणाल्या नाहीयेत !” पानसेबाईंची पहिली आठवण मनात ठसलीय ती अशी !! कोवळ्या वयाचं मन अगदी टीपकागद असतं ! चांगलं-वाईट जे कानावर पडेल तर अगदी आतपर्यंत शोषलं जातं. दुखऱ्या शब्दाने टच्चकन पापणीत येतं आणि हसऱ्या शब्दाने डोळ्यांत आभाळ मावतं ! आमच्या पानसेबाई दिसायला कशा होत्या सांगू? अशा छान शिडशिडीत होत्या. रंगाने तांदळापेक्षा गव्हाजवळच्या होत्या. पाठीचा कणा ताठ होता. चालणं झपझप नि हालचाली झटपट होत्या. आवाज खणखणीत होता पण बोलणं मात्र मृदू होतं. खरंतर नुसतंच आवाज खणखणीत होता हे सांगून भागणार नाही.