Skip to main content

आमच्या १० वी ची पंचविशी..

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 23/07/2008 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला क्रिकेटचा विश्वचषक जिंकून जितकी वर्षे झाली ना तितकीच वर्षं आम्हाला १० वीचा चषक जिंकून(की हारून?)झाली. त्यामुळे पेपराततल्या रौप्यमहोत्सवाच्या बातम्या वाचून आमच्या मित्रमंडळींना आठवण झाली की आपल्या १०वीने पंचविशी गाठली की! मग एकेकाचे विरोप यायला सुरूवात झाली.मागच्या २ ,३ बॅचनी १० वीची पंचविशी कशी कशी साजरी केली त्याची वर्णनं समजायला लागली.

शाळा

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 23/07/2008 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा अथांग सागर यांच्या आठवणी या कवितेमुळे आम्हाला ही शाळेची आठवण झाली ------------------------------------------------------------------------- शाळे समोरुन जाताना बालपण मनात गवसत वर्गात डोकाऊन पहाताना आठवणींनी मन भरतं मागे वळुन पहाताना वाटत तिथेच आहोत आज तेच सर्व मित्र अन् तोच बसायचा बाक आठवणी असतात अभ्यासाच्या मार दिलेल्या गुरु़जींच्या मधल्या सुट्टीत गंमत भारी होती शाळा माझी न्यारी. माझ्याही आहेत अनेक आठवणी शाळे मधल्या गमतीच्या खेळामधल्या मस्तीच्या सहलीतल्या सफरीच्या ह्रदयात त्या रुजल्या आहेत कायमच्या घर करुन बसल्या आहेत
Taxonomy upgrade extras

देवाची मुलाखत

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 23/07/2008 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नात साक्षात ईश्वर दिसला म्हणला माग काय मागायचे तुला देवा एक मुलाखत द्या मला का कलीयुगात जगाला विसरला? तुम्हीच तर वचन दिले गीतेतून दुष्टांच्या विनाशा याल परतून काय मिळाले ह्या विश्वासातून? धर्म रसातळाला चालला जगातून
अजाण आहेस तू, ईश्वर हसला अरे माझे बोल आठवतात मला धर्माची ग्लानी कुठे झाली म्हणायला? पुन्हा मी धरतीवर अवतरायला
संकटात का होइना, लोक हात जोडतात धर्माच्या नावाने दान करतात चर्च, मशीदी, मंदीरात ध्यान करतात तरीही धर्म बुडतोय का म्हणतात?
Taxonomy upgrade extras

...उर्फ सुगरणीचा सल्ला ३

लेखक मेघना भुस्कुटे यांनी बुधवार, 23/07/2008 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
हे आधीच्या लेखांचे दुवे - http://www.misalpav.com/node/2432 http://www.misalpav.com/node/2540 आईची आठवण या चित्रपटीय गळेकाढू प्रकरणातला माझ्याबाबतीत सर्वांत खरा आणि महत्त्वाचा भाग असेल, तर तो इतकाच की घरी मिळणारं आयतं, चवीपरीचं आणि पारंपरिक अन्न घराबाहेर राहिल्यावर मिळेनासं झालं. बाहेरचं खाणं ही माझ्यातल्या मुंबैकरणीला अगदी सवयीची नि आवडीची गोष्ट खरीच. पण किती झालं तरी ताकातली उकड, भाजणीची थालिपिठं, भरली वांगी, लसणीसकट दरवळणारं कुळथाचं खमंग पिठलं या गोष्टी बाहेर कशा मिळणार?

लोकसभेतील चर्चा

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 23/07/2008 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी नुकतेच एका इंग्रजी लेखकाचे एक 'क्रिप्टिक' वाक्य वाचले. ते खाली दिले आहे. Parliament is so strange. A man gets up to speak and says nothing. Nobody listens..... and then everybody disagrees. पार्लमेंट ही किती अजब जागा आहे! एक सदस्य बोलायला म्हणून उभा राहतो. कांहीच (महत्वाचे) सांगत नाही. कोणीसुध्दा (तो काय बोलतो आहे ते) ऐकत नाही ....... आणि सारेच त्याच्याशी असहमत होतात. काल आणि परवा आपल्या लोकसभेच्या खास अधिवेशनाचा 'आँखो देखा हाल' पाहतांना ते वचन पुन्हा पुन्हा आठवत होते.

जर असं झालं तर....

लेखक सरपंच यांनी बुधवार, 23/07/2008 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज आत्ता मिसळपावचे मुखपृष्ठ दिसत नाहिये ! त्या जागी पान सापडले नाही असा मजकूर येत आहे. मात्र त्याच वेळी संकेतस्थळ योग्य पद्धतीने चाललेलं आहे. असं होण्याचं कारण असं की मिसळपाव वर अचानक गर्दी वाढली की त्या सर्वांना सेवा देता यावी म्हणून मग जी जड पाने आहेत ती बाजूला ठेवलीजाऊन सर्वांना सेवा देता यावी हा या मागचा उद्देश्य आहे. पहिलं पान हे सर्वात जड असल्यामुळे आज ते दिसत नाहिये. मात्र थोड्या वेळाने ते आपसुक दिसायला लागेल. जर का पुन्हा असं झालं तर आपल्याला वरच्या उजव्या मेन्युमधुन मिसळपाव वर सहज वावरता येईल. आज त्यात सदस्य प्रवेशाचा मेन्यु सुध्दा जोडला आहे.

"रौशनी "

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 23/07/2008 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
बी रोमन इन रोम असे कुणीसे म्हंटले आहे. त्याचा अर्थ प्रत्येकजण आपआपल्या मकदुराप्रमाणे घेतो.माझ्या पुरता तरी तो आपले गाव सोडले की थोडे शिष्ठाचार बाजुला ठेवुन द्यावे. थोडे मोकळेढाकळे वागावे असा आहे. नव्या गावात जेथे कोणी आपल्याला ओळखत नाही तिथे थोडे वेगळे कपडे वापरले नेहमीचा कपड्यातला ईस्त्रीचा कडकपणा बाजुला ठेवुन झब्बा सलवार सारखा मोकळेपणा वागण्यात येतोच. अन्यथा एरव्ही अंबाडा दोनवेण्या तेल लावुन चापुनचोपुन असणारी काकुबाई हील स्टेशनला जीन्स घालुन बागडताना दिसली नसती. ही सगळी गणीते पुण्याला लागु होत नाहीत.

माधुरी.....

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 23/07/2008 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाच्या मनात जरी एक माधुरी असते तरी, माधुरीला कुणा एकाचंच होता येतं पण जीवनसंगिणीला माधुरीसारखं वागवून पहा, किती जणांना श्रीराम होता येतं !

आमचे मित्र श्रीयुत "मी,माझं,मला"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 22/07/2008 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं आपण नेहमी एखाद्दा गोष्टी बद्दल, प्रश्न करावे,साशंक व्हावं,शोध करावा,पटकन विश्वास ठेऊ नये अशा वृत्तीचं असावं.पटकन विश्वास ठेवायला किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला मी नेहमीच नकार देतो.